Hug Day 2023: मिठी मारल्याने नातीच सुधारतात असं नाही, आरोग्याला मिळतात हे ४ फायदे

Hug Day: Valentine Week मधील १२ फेब्रुवारी हा हग डे म्हणून साजरा केला जातो. जोडीदाराला मिठी मारणे हे अत्यंत भावनिक आहे. आपल्या मनातील भावना स्पर्शाने अधिक चांगली कळते. कधी कधी शब्द भावना व्यक्त करायला कमी पडतात. पण तेच काम मिठी एक क्षणात करते. Hug Day च्या निमित्ताने आपला जोडीदार, भाऊ, बहीण, आई-बाबा कोणालाही एक प्रेमाची मिठी द्या आणि बघा जादू. हे केवळ भावनिकच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. मिठी मारण्याचे काय आरोग्यदायी फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​ताणतणाव होतो दूर​

​ताणतणाव होतो दूर​

अभ्यासानुसार, आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारल्यानंतर स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचा स्तर हा कमी होतो आणि त्यामुळे शरीरात असलेला ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. मिठी मारल्याने ताण कमी तर होतोच मात्र व्यक्तीची स्मरणशक्ती चांगली राहण्यासही मदत मिळते. प्रेमाच्या या आठवड्यात नक्कीच तुम्ही हे करून पाहू शकता.

​मूड चांगला होतो​

​मूड चांगला होतो​

रिसर्चनुसार, नियमित मिठी मारल्याने मूड नेहमी ताजातवाना राहातो. वास्तविक आपल्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने तुमच्या मेंदूमधील सेरोटोनिन हार्मोन अधिक प्रमाणात Produce होते आणि मूड चांगला राहातो. याशिवाय मिठी मारल्यानंतर काम करण्याची क्षमताही वाढते

हेही वाचा :  ठाण्यात मेट्रो काम सुरु असताना 30 फूट उंचीवरुन कामगार पडला, जागीच मृत्यू.. मनसे आक्रमक

(वाचा – वेळीच ओळखा लहान मुलांमधील जंत संसर्ग, लवकर निदान होणे गरजेचे)

​हृदयासाठी फायदेशीर​

​हृदयासाठी फायदेशीर​

मिठी मारल्याने शरीरातील लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिनची पातळी वाढते. इतकंच नाही तर मिठी मारल्याने ब्लड प्रेशरही कमी होते आणि हृदय चांगले राखण्यास याची मदत मिळते. एका रिसर्चनुसार, जे जोडीदार एकमेकांना नियमित मिठी मारतात, त्यांचे ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

(वाचा – डायबिटीस रुग्णांना इन्शुलिनची कधी गरज भासते? वयानुसार किती असावे इन्शुलिनचे प्रमाण )

​मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी​

​मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी​

तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी नेहमी मारत असाल अथवा ते तुम्हाला नेहमी जातायेता मिठी मारत असतील तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही एकमेकांना साथ देत असल्याचे समजून येते. यामुळेच तुमची मानसिक पातळी ढासळत नाही आणि काहीही झालं तरी आपला जोडीदार हा आपल्यासोबतच असणार हे कळते. नियमित मिठी मारल्याने मानसिक स्वास्थ्य अत्यंत चांगले राहाते.

(वाचा – अॕडिनोव्हायरसचा त्रास मुलांमध्ये ताप येणे, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका)

​डोकेदुखी बंद आणि चांगली झोप​

​डोकेदुखी बंद आणि चांगली झोप​

असं म्हणतात ती कपल्स जर एकमेकांना मिठी मारून झोपले तर त्यांना एकटे झोपण्यापेक्षा अधिक चांगली झोप येते. याच्या मागे असं कारण सांगण्यात येते की, एकमेकांच्या मिठीत झोपल्याने कपल्स निर्धास्त झोपतात आणि झोपही पूर्ण होते. तुम्ही कायम एकमेकांबरोबर राहण्याचे ठरवले असेल तर मिठी मारणं तुमच्यासाठी सोयीस्कर ठरते. यामुळे डोकेदुखीही थांबते.

हेही वाचा :  Chocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो 'चॉकलेट डे', होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?

मिठी मारण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्ही जाणून घेतले. तर मग आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराला तुम्ही मिठी मारली की नाही?

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …