केस प्रत्यारोपण करताना किती खर्च येतो,शस्त्रक्रियेनंतर कशी काळजी घ्यावी आवश्यक जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

टक्कल पडण्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी केस प्रत्यारोपण एक जीवन बदलणारे पाऊल ठरू शकते. ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये टाळू किंवा शरीराच्या इतर भागातून केस काढून टक्कल पडलेल्या भागात प्रत्यारोपण केले जाते. हे काम केवळ पात्र तज्ञांनीच केले पाहिजे. हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी लोकांनी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जे लोक सिगारेट किंवा मद्यपान करतात त्यांना प्रत्यारोपणाच्या काही आठवड्यांपूर्वी या गोष्टींपासून दूर राहावे लागते. प्रत्यारोपणानंतरही अनेक आठवडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. केस प्रत्यारोपण करण्यासाठी किती वेळ लागतो हे आज आपण तज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

​शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी?

पुण्यातील प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ सचिन पवार म्हणतात की, केस प्रत्यारोपण करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने पात्र प्लास्टिक सर्जन किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या प्रक्रियेच्या सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, एखाद्या व्यक्तीने अल्कोहोल आणि सिगारेट पूर्णपणे सोडू द्यावे. प्रत्यारोपणानंतरही अनेक आठवडे या गोष्टींपासून दूर राहावे. तुम्हाला कोणताही आजार असल्यास किंवा तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर डॉक्टरांशी चर्चा करा आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्यारोपणाच्या काही दिवस आधी केसांना तेल आणि इतर जेल लावू नका. प्रत्यारोपणाच्या दिवशी केस फक्त शॅम्पूने धुवा आणि चांगले कोरडे करा. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

हेही वाचा :  मलायका ते जान्हवी सर्व अभिनेत्रींवर नवीन वर्षात चढेल या कपड्यांची जादू

​हेअर ट्रान्सप्लांट कोणी करावे

ज्या लोकांच्या डोक्यावर डाग असतील किंवा ज्या लोकांचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील असे लोक हेअर ट्रान्सप्लांट करु शकतात. हेअर ट्रान्सप्लांट दोन प्रकारे केले जाते. यामधील एका प्रकारात डॉक्टर रुग्णांच्या डोक्यावर जिथे जास्त केस आहेत ते काढून दुसरीकडे लावले जातात. खोट्या केसांचे नमुने डोक्यावर लावले जातात. त्याच प्रमाणे ही संपूर्ण प्रक्रिया बेशुद्ध अवस्थेतच केली जाते. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

​हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी किती खर्च येतो

हेअर ट्रान्सप्लांट करताना १८०० ते २००० केसांचे ग्राफ्टिंग करायला सुमारे ५ ते ७ तास लागतात. त्यापेक्षा जास्त केसांचे ग्राफ्टिंग एका वेळेला कधीही करू नये. यामुळे धोका निर्माण होऊ शकते. हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा कमीत कमी खर्च ५५ हजार रुपये असतो. त्यामुळे कमीत कमी खर्च म्हणजेच २५ किंवा ३० हजारात करण्याचे दावे करणाऱ्या केंद्रांपासून सावध राहा यामुळे तुमच्या डोक्यावरील त्वचेला सुद्धा त्रास निर्माण होऊ शकतो. (वाचा : – Juice for Glowing Skin : वेटलॉस सोबतच डाग विरहित, चमकदार त्वचा हवी असेल तर हे ४ ज्युस ठरतील वरदान)

हेही वाचा :  मुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर कधीपर्यंत भरावा लागणार टोल?; जाणून घ्या सविस्तर

​हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी?

  • केसांचे प्रत्यारोपण हे फक्त आणि फक्त प्लास्टिक सर्जन किंवा त्वचारोगतज्ज्ञाकडूनच करून घ्यावे. यामुळे तुम्हाला होणारा धोका कमी होईल.
  • प्रत्यारोपण ऑपरेशन थिएटरमध्येच करण्याचा आग्रह धरावा.
  • सहायक किंवा शिकावू डॉक्टर्स कडून हे काम करुन घेऊ नये यामुळे तुम्हाला दिर्घकाळासाठी त्रास होऊ शकतो.
  • प्रत्यारोपण १०० टक्के यशस्वी करण्याचे अवास्तव दावे करणाऱ्या केंद्रांपासून सावध राहा. ते यशस्वी होण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के एवढेच असते. (वाचा :- पिंपल्सला करा कायमचं बाय बाय, नितळ त्वचेसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेली ही योगासने ठरतील फायदेशीर)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …