अभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट, अशी झाली अवस्था जाणून घ्या किंमत आणि सर्व काही

जीवनशैलीत झालेला बदल, प्रदूषण या सर्व गोष्टींचा परिणाम त्वचेवर आणि केसांवर होत असतो. असंतुलित आहार रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केस गळण्याची समस्या लोकांना खूप सतावत आहे. तरुण वयातही लोक टक्कल पडण्याचे बळी ठरत आहेत. ही समस्य अनेक सिलेब्रिटींना देखील सतावत आहे.तर सुंदर दिसण्यासाठी अनेक जण हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब करत आहेत. नुकतेच विनोदी प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवनेही केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट केले आहे. राजपाल यादवने हेअर ट्रान्सप्लांट केले आहे आणि त्याचा अनुभव शेअर करताना त्याने या प्रक्रियेदरम्यान काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हेअर ट्रान्सप्लांट कसे केले जाते आणि यादरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- @ rajpalofficial)

हेअर ट्रान्सप्लांट कसे केले जाते?

हेअर ट्रान्सप्लांट हे एक तंत्र आहे ज्यामध्ये फॉलिकल्स मिळविण्यासाठी दोन मुख्य प्रकारे केली जाते. एक म्हणजे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट (FUT) आणि दुसरे म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE). यामध्ये ज्या ठिकणीचे केस वाढले जातात त्या ठिकाणीचे केस काढून टक्कल पडले आहे तेथे लावले जातात. (वाचा :- Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

हेही वाचा :  Personality Test: नाकाचा आकार तुमच्या व्यक्तीमत्त्वासोबतच मनातलंही सांगतो; थट्टा नाही....

​फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन

फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शनमध्ये, डोक्याच्या मागील भागातून किंवा ज्या भागात जास्त प्रमाणात केस असतात. अशा भागातून केस काढले जातात. ज्या भागात केस ट्रान्सप्लांट केले जात आहेत त्या भागात तज्ञ सुईने लहान छिद्र करतात. या छिद्रांमध्ये केस घातले जातात. या संपूर्ण प्रक्रियेला ४ ते ५ तास लागतात. केस ट्रान्सप्लांट नंतर १० दिवसांनी डोक्यावरील टाके काढले जातात. (वाचा :- Skin Infection : हिवाळ्यात ‘या’ चुकीच्या सवयींमुळे त्वचा सोलली जाते, असू शकतात गंभीर आजार)

​हेअर ट्रान्सप्लांट करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • हेअर ट्रान्सप्लांट करताना काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला अभिनेता राजपाल यादवने दिला आहे. ज्या ठिकाणी तुमचे केस ट्रान्सप्लांट केले जात आहे तेथे योग्य क्रिटिकल हेअर टीम आहे की नाही याची पडताळणी करा.
  • केस ट्रान्सप्लांट करताना, फक्त योग्य डॉक्टर निवडा.
  • केस ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी, त्या तंत्राची संपूर्ण माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला होणाऱ्या त्रास आणि वेदनांची कल्पना येईल. (वाचा :- CID च्या दयाची झाली अशी अवस्था, व्हिडिओमध्ये सांगितले कशी झाली केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि किती झाल्या वेदना)
हेही वाचा :  लॅपटॉपवर काम करतांना चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका जवळ, ठेवल्यास लॅपटॉप होणार कायमचा खराब, पाहा डिटेल्स

​हेअर ट्रान्सप्लांट करताना येणारा खर्च

हेअर ट्रान्सप्लांट करताना साधारणपणे ३०,००० ते ७०.००० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. पण शहर आणि डॉक्टरांच्या अनुभवावरुन त्याच फरक पडू शकतो. (वाचा :- भयानक, सौंदर्य वाढवण्यासाठी मुली चेहऱ्याला लावतात पीरियड ब्लड, डॉक्टरांनी सांगितले सत्य)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर …

‘आधी लगीन लोकशाहीचं मग…’ विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, …