हा पदार्थ लंचमध्ये खा,बसल्या बसल्या पोट-मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल,जिम-डाएटला कराल गुडबाय

भारत ही राजमा चावलची पंढरी आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. भारतात rajma chawal मोठ्या प्रमाणात सेवन केला जातो. खास करून उत्तर भारतात तर हा पदार्थ रोजच्या आहारात देखील आढळतो. तुम्हा वाचकांपैकी बरेच जण देखील राजमा चावलचे डाय हार्ड फॅन्स नक्कीच असतील. तर मंडळी, तुम्ही राजमा चावल खात असाल तर अगदीच उत्तम. कारण हा एक उपयुक्त पदार्थ आहे हे फार कमी लोकांना ठावूक आहे. राजमा चावल खाण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत.

खास करून जर तुम्ही Weight Loss Fast Diet साठी प्रयत्न करत असाल तर राजमा चावलचे सेवन योग्य ठरू शकते. देशातील सुप्रसिद्ध डाएटिशियन मॅक सिंग म्हणतात की, भात किंवा राजमा हे वजन वाढवणारे पदार्थ आहेत असे अनेकांना वाटते पण तसे नाही. उलट जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बिनधास्त राजमा चावल खाऊ शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

काय सांगतात डाएटिशियन?

काय सांगतात डाएटिशियन?

मॅकच्या मते, हा भारतीय पदार्थ अन्न फायबर, प्रोटीन आणि पोटॅशियम यांसारख्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. नियमितपणे राजमा चावल खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होतेच, परंतु रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. तुम्हाला अजूनही विश्वास बसत नसेल तर हा लेख पूर्ण वाचा. या डिशने तुमचे वजन कसे कमी करू शकता तेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हेही वाचा :  120 किलोच्या मुलाची वेटलॉस स्टोरी वाचून व्हाल हैराण, चपाती आणि भात न सोडताच घटवलं तब्बल 37 किलो वजन!

(वाचा :- Mental Health: या 8 लोकांपासून राहा चार हात दूर,हिसकावतात शांती व सक्सेस लाईफ, या लोकांना ओळखण्याची पद्धत काय?)​

मोठ्या प्रमाणात असतात फायबर

मोठ्या प्रमाणात असतात फायबर

राजमा चावल हा पदार्थ हा फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. त्यात विरघळणारे फायबर भरपूर असते यामुळे राजमा चावल खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरले राहते व तुम्हाला लगेच भूक लागत नाही वा दुसरे काही खाण्याची तीव्र इच्छा होत नाही. शिवाय यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी होते. म्हणूनच मंडळी राजमा चावल खाल्ले पाहिजेत, जेणेकरून हे फायदे तुम्हाला मिळतील.

(वाचा :- अंथरूणात पडल्या पडल्या लागेल डाराडूर झोप, आडवं पडूनच करा विज्ञानात सिद्ध झालेला हा उपाय, 8 तासांनीच व्हाल जागे)​

प्रोटीनचा जबरदस्त स्त्रोत

प्रोटीनचा जबरदस्त स्त्रोत

राजमा हा वनस्पतींपासून मिळणा-या प्रथिनांचा अर्थात प्लांट प्रोटीन एक चांगला स्रोत आहे आणि प्रथिने हे पोट भरणारे आणि भूक शमन करणारे घटक म्हणून काम करतात हे आपण सर्वजण जाणतोच. राजमा चावलची चव आणि क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही ते दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता बरं का! राजमा आणि चावल मध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो ऍसिड्स असतात. जी शरीराच्या कार्यासाठी खूप महत्त्वाची असतात. हेच कारण आहे की जाणकार सुद्धा आहारात अवश्य राजमा चावलचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

हेही वाचा :  जिमला न जाता अगदी घरबसल्या खा हे ५ पदार्थ, वजनात आपोआप दिसेल फरक

(वाचा :- आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ म्हणजे शरीरात बनलं भयंकर अ‍ॅसिड,मुळापासून अ‍ॅसिडिटीचा नाश करतात हे 3 सोपे उपाय)​

डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय

डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय

राजमा या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. म्हणजेच फक्त 24 आहे. पण हो, सफेद भाताचा GI जास्त असतो हे सुद्धा लक्षात घ्या, मात्र राजमा चावलमध्ये राजमाचा ग्लायसेमिक इंडेक्स भारी पडतो आणि त्याचा फायदा आपल्याच शरीराला होतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते. म्हणूनच राजम चावल हे वेटलॉस जर्नीमध्ये मधुमेही रुग्णांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

(वाचा :- Cholesterol Remedy: फक्त 2 रूपयांत अक्षरश: रक्तातून गाळून निघेल पूर्ण कोलेस्ट्रॉल,हार्वर्डने शोधला स्वस्त उपाय)​

शरीरातील पाण्याचे वजन होते कमी

शरीरातील पाण्याचे वजन होते कमी

राजमा हा पदार्थ पोटॅशियमचा देखील एक उत्तम स्रोत आहे, फक्त 100 ग्रॅम राजमामधून 405 मिलीग्रॅम पोटॅशियम प्रदान केले जाते. शिवाय राजमा चावल शरीरातील पाण्याचे वजन कमी करण्यास मदत करते आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी देखील एक उत्तम हेल्दी फूड म्हणून राजमा चावल सिद्ध झाले आहे. तुम्हाला सुद्धा वाटलं होतं का की या मसालेदर पदार्थाचे एवढे फायदे असतील?

(वाचा :- ब्लड सर्क्युलेशन 100% वेगाने धावून क्रॅम्प्स, वेदना, कंबर-मानेत भरलेली चमक 2 मिनिटांत छुमंतर,ऋजुताचा कमाल उपाय)​

हेही वाचा :  Ratan Tata Birthday: अरबपती रतन टाटांची स्टाईलही सामान्य माणसांशी जोडणारी

शरीरासाठी हलका आहार

शरीरासाठी हलका आहार

राजमा चावल हा एक हलका पदार्थ आहे आणि अनेकांचा सर्वात आवडता पदार्थ सुद्धा आहे, त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ खाता तेव्हा गुड वायब्रेशन आणि आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच तुमच्या डायट मध्ये राजमा चावलचा अवश्य समावेश करा.
(वाचा :- Hanuman Phal Benefits: नावाइतकंच शक्तीशाली आहे हे छोटंसं फळ, पोट साफ ठेवण्यासोबतच कॅन्सर व डायबिटीजचा करतं नाश)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

वजन कमी करण्याचा जबरदस्त उपाय राजमा-चावल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …