Gudi Padwa 2023: कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी खाऊन शरीरातील विषारी पदार्थ काढा बाहेर

Uses Of Neem: वर्षानुवर्षे कडुलिंबाचा पाला हा आयुर्वेदानुसार अत्यंत फायदेशीर मानला जातो. तसंच पारंपरिक उपचारांचा हा एक भागही मानला जातो. कडुलिंबाच्या कडू स्वादाबाबत सर्वांना माहीत आहे. मात्र त्याचे तितकेच परिणामकारक फायदे आहेत. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी याबाबत इन्स्टापेजवरून माहिती दिली आहे.

कडुलिंबाचे मूळ, पाने, गोंद, बी आणि तेल सर्वांचाच आरोग्यासाठी उपयोग करता येतो. युरिन, त्वचा रोग, अ‍ॅसिड या सर्व त्रासांवर फायदेशीर ठरतो. कडुलिंबाच्या पानाचा कसा वापर करावा आणि याचा शरीराला कसा फायदा होतो याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

डॉ. दीक्षा भावसारने सांगितले फायदे

कडुलिंबाचे फायदे

कडुलिंबाचे फायदे

Benefits Of Neem: कडुलिंबाचे आरोग्यासाठी फायदे अनेक आहेत.

  • अगदी मुळापासून ते पानापर्यंत सर्वच उपयोगी ठरते.
  • पचनशक्ती सुधारण्यासाठी
  • थकव्यापासून आराम
  • घाव भरण्यासाठी फायदेशीर
  • पोटातील जंत घालविण्यासाठी
  • मळमळ आणि उलट्यांवर गुणकारी
  • सूज कमी करण्यासाठी मदत
  • नैसर्गिक डिटॉक्सिफायर, पित्त संतुलित ठेवते

शरीराच्या बाहेरीला आरोग्यासाठी कसा उपयोग

शरीराच्या बाहेरीला आरोग्यासाठी कसा उपयोग

पेस्ट स्वरूपात त्वचेवर जखम झाल्यास कडुलिंबाची पावडर अथवा पाणी, मधासह पेस्ट तयार करून लावावे
आंघोळीसाठी – कडुलिंबाची पावडर अथवा कडुलिंबाची पाने गरम पाण्यात मिक्स करून याचा वापर करावा
कोंड्यासाठी उपयुक्त – केस धुण्यासाठी थंड पाण्यात कडुलिंबाची पावडर मिक्स करा आणि वापरा. कोंड्याची समस्या जाण्यास मदत मिळते.
हर्बल काढा – संक्रमणादरम्यान काढ्यासाठी याचा उपयोग करता येतो. तसंच अनल फिस्टुला अथवा बद्धकोष्ठतेसाठीही याचा उपयोग करता येऊ शकतो.
मुरूमांसाठी – कडुलिंबाच्या पावडरचा अँटीअ‍ॅक्ने हर्ब्स म्हणून उपयोग होतो. चंदन, गुलाब, हळद, मंजिष्ठा, मुलेठीसह मिसळून याचा फेसपॅक वापरता येतो आणि मुरूमं घालविण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  Gudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO

(वाचा – World Salt Awareness Week: पुढच्या दोन वर्षात होऊ शकतो २० लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू, कारण ठरेल मीठ)

शरीराच्या आतील भागांसाठी उपयोग

शरीराच्या आतील भागांसाठी उपयोग
  • २ आठवडे ७-८ कडुलिंबाची पाने रोज खावी
  • कडुलिंबाच्या पाल्याची गोळी एक महिना खाऊ शकता
  • २-३ आठवडे १०-१५ मिलिलीटर कडुलिंबाचा रस पिऊ शकता

उत्तम पचनक्रियेसाठी – कडुलिंबाच्या पानाने पचनक्रिया उत्तम होते हे फारच कमी लोकांना माहीत आहे. तसंच कडुलिंबाची पाने तुमच्या लिव्हरची कार्यप्रमाणाली सुधारण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय कडुलिंबामुळे बॅक्टेरिया मरून पचनक्रियेस मदत मिळते.

डायबिटीस नियंत्रणात – डायबिटीस असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य प्रमाणात याचे सेवन करावे. रिकाम्या पोटी कडुलिंबाचा रस अथवा गोळ्या खाल्ल्यास मधुमेह कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी – रिकाम्या पोटी रोज सकाळी कडुलिंबाच्या पाल्याच्या गोळ्या १ महिना खाल्ल्या आणि योग्य व्यायाम केल्यास, वजन कमी होण्यास मदत मिळते.

(वाचा – झोपेत वरून पडल्याचा होतोय का भास? हे आहे महत्त्वाचं कारण, World Sleep Day च्या निमित्ताने जाणून घ्या)

त्वचेसाठी उपयोग

त्वचेसाठी उपयोग

कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियाल गुणधर्म असून शरीरातील हानिकरक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. रक्तशुद्धीसाठी गुढीपाडव्याला हे खाल्ले जाते. वर्षभर आरोग्य चांगले राहावे म्हणून हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी याचे सेवन करण्यात येते. तुमची त्वचा नैसर्गिक स्वरूपात चांगली राहावी यासाठी याचा फायदा होतो.
कडुलिंब चावल्याने त्वचा शुद्ध होण्यास मदत मिळते आणि आतूनही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर आल्याने त्वचेवर मुरूमांचा त्रास होत नाही. तुम्हाला कडूपणा जाणवत असेल तर मधासह याचे सेवन करू शकता.

हेही वाचा :  फोनमधील महत्वाचा Data Leak होण्याची भीती वाटतेय ? या चुका टाळा, डिव्हाइस राहील नेहमी सेफ

(वाचा – H3N2 Virus इन्फ्लुएन्झाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, मुलांमध्ये दिसली अशी लक्षणे तर सावध व्हा)

काय सावधानता पाळावी

काय सावधानता पाळावी

कडुलिंबाचे सेवन खालील गोष्टींच्या बाबतीत अजिबात करू नये. हे कायम लक्षात ठेवाः

  • प्रेग्नंट महिला आणि लहान बाळांना जन्म दिलेल्या महिलांनी खाऊ नये
  • गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असणारे जोडपे यांनी खाऊ नये
  • कडुलिंबाच्या पानाचा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा
  • आरोग्यासाठी कडुलिंबाचा खूपच चांगला फायदा होतो. मात्र त्याचे प्रमाण आपल्या डॉक्टरांकडून नक्की ठरवून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …