Hi, Hello आणि Video Call… ईशा आणि मृदुलाच्या प्रेमात पडला, ISIच्या जाळ्यात अडकला

Pakistan ISI Network : पाकिस्तानकडून अनेकवेळा भारताविरुद्ध षडयंत्र (Conspiracy) रचलं गेलं आहे. भारतीय तरुणांना मायाजालात अडकवायचं आणि त्यांच्याकडून देशातील गुप्त माहिती काढून घ्यायची. पाकिस्तानची असंच एक षडयंत्र उघडकीस आलं आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI च्या नापाक कारवायांचा पर्दाफाश झाला आहे. राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने ऑपरेशन सरहद (Operation Sarhad) अंतर्गत पाकिस्तानची (Pakistan) पोलखोल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून गोपनीय कागदपत्रांची (Confidential Document) माहिती काढून घेतली. 

आरोपीने सांगतिलं नेमकं काय घडलं?
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रवी प्रकाश मीणा असं असून सरकारी नोकरीच्या तयारीसाठी त्याने 2012 मध्ये जयपूरमध्ये (Jaipur) रेंटचं घर घेतलं. 2013 मध्ये त्याने परीक्षा दिला आणि 2014 मध्ये मेरिट लिस्टमध्ये त्याचं नावही आलं. 1 जून 2015 मध्ये त्याला नवी दिल्लीत त्याला पोस्टिंग मिळावलं. या ठिकाणी तो भारतीय लष्करात (Indian Army) कारकुनी कामं करत होता.

फेसबुकवर ईशाचा मेसेज आला
2020 मध्ये रवी फेसबूकवर ईशा बंसल आणि मृदुला वर्मा नावाच्या मुलींच्या संपर्कात आला. ईशाने त्याला Hi, Hello चा मेसेज टाकला. यावर रवीनेही प्रतिक्रिया. हळूहळू दोघांमध्ये संभाषण वाढत गेलं. ईशाने आपण उदयपूरमध्ये राहात असून आपले वडिल स्पेनमध्ये एका कंपनीत कँटिन चालवत असल्याची माहिती दिली.

हेही वाचा :  गर्लफ्रेंडचा मृतदेह खड्ड्यात पुरला आणि त्यावर मीठ टाकलं... आरोपीचं लॉजिक पोलिसांच्याही डोक्याबाहेर

ईशाने व्हिडिओ कॉलही केला
रवीला ईशाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, यासाठी त्याने ईशाला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं. रवीच्या सांगण्यावरुन त्या मुलीने व्हिडिओ कॉल केला, त्यामुळे रवीचा तिच्यावर विश्वास बसला. पुढे ती वरचेवर व्हिडिओ कॉल करु लगाली. याचदरम्यान मृदुला नावाच्या आणखी एका मुलीने फेसबूकवर ओळख करत रवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

विश्वास संपादन केला
3 मे 2022 रोजी ईशाने रवीला फोन करत आपल्याला भारतीय लष्करात नोकरी मिळाल्याचं सांगितलं. नोकरी मिळाल्याने ईशाने मिठाई खाण्यासाठी रवीला तीन हजार रुपये पाठवले. विशेष म्हणजे हेच कारण देत मृदुलानेही त्याला पैसे पाठवले. ईशा आणि मृदुला दोघींनी त्याला लग्नाचं वचन दिलं. पण त्या दोघी आयएसआयच्या एजंट आहेत हे रवीला माहितीच नव्हतं.

रवीकडून गुप्त माहिती मागवली
आतापर्यंत रवी ईशा आणि मृदुलाच्या प्रेमाच्या जाळ्यात पूर्णपणे फसला होता. दोघींच्या सांगण्यानुसार रवी त्याच्या विभागातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून त्या दोघींना पाठवू लागला. जवळपास 40 कागदपत्रांचे फोटो ईशाला पाठल्याची माहिती रवीने पोलिसांनी दिली. यात संरक्षण मंत्रालयाच्या अनेक गोपनीय कागदपत्रांचा समावेश होता. 

रतन खानही अडकला जाळ्यात
रवी प्रमाणेच रतन खान नावाचा तरुणही आयएसआयच्या जाळ्यात अडकला होता. रतन खान नातेवाईकांना भेटण्यासाठी सात वेळा पाकिस्तानला जाऊन आला. पाकिस्तानात असताना एका हॉटेलमध्ये त्याची ओळख खलीफ नावाच्या व्यक्तीशी झाली. खलीफने त्याला पाकिस्तानसाठी काम करण्याची ऑफर केली. रतनखानने भारतात परतल्यानंतर भारतीय सेनेच्या वाहनांचे फोटो आणि व्हिडिओ खलीफला पाठवले. 

हेही वाचा :  Pune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्...

वाहनांबरोबरच भारतीय सीमेजवळच्या स्थानिक गावातील महत्वाची ठिकाणी, रेल्वे, ब्रिज यांचेही फोटो त्याने खलीफला व्हॉट्सअॅपवर पाठवले. यासाठी खलीफने पाकिस्तानहून रतन खानला एजेंटच्या मदतीने सोन्याची अंगठी भेट पाठवली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …