शासकीय शाळांमध्येही बसवणार CCTV, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय

CCTV in Government School: शासकीय शाळांमध्ये येत्या वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera in Government schools) बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास निधी/ स्थानिक स्वराज्य संस्था/सीएसआर/ किंवा लोकसहभागातून निधी गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत ११ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या स्वच्छ्तागृहात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुलींच्या सुरक्षेसंदर्भात कडक पाऊले उचलण्यात आली असून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली.

सीसीटीव्हीचे धोरण
येते शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) बसविण्याचे आणि ते सुरु असतील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. एकूण ६५ हजार शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपैकी आतापर्यंत १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

accused arrested : ११ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा अखेर गजाआड; २४ तासांत ठोकल्या बेड्या

पहिली ते नववी, अकरावीच्या शाळा एप्रिलपर्यंत पूर्णवेळ सुरू राहणार
सखी-सावित्री समित्यांची स्थापना
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींकरीता निकोप आणि समतातूल्य वातावरण निर्माण करण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी-सावित्री समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

हेही वाचा :  आयकर विभाग अंतर्गत खेळाडू पदांची भरती

NTRO job 2022: ‘ही’ भाषा येत असेल तर परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, ४८ हजारपर्यंत पगार
तक्रारीचा पाठपुरावा

शाळा स्तरावरील सखी-सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला, शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी), पोलीस पाटील, महिला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला पालक प्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. शाळांमध्ये काही आक्षेपार्ह प्रकार आढळल्यास या समितीच्या माध्यमातून त्याची तक्रार शाळा व्यवस्थापनाकडे करण्यात येईल. तक्रारींचे निवारण होईपर्यंत समितीतर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती, २८ हजारपर्यंत मिळेल पगार
दर्शनी भागावर मोबाइल नंबर
यासोबतच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत का? सखी-सावित्री समित्यांची स्थापना करण्यात आली आहे का? हे पाहण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्तांची असणार आहे. यासोबत शाळेतील एका महिला शिक्षिकेवर मुलींना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असणार आहे. पोलीस काका, पोलीस दीदी ही संकल्पना राबविण्यात येत असून यांचे नंबर शाळेच्या दर्शनी भागावर ठळकपणे दर्शविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टात ७ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
RailTel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …