Flying Dutchman Ship: 400 वर्षांपासून सुमुद्रात भटकणारं शापित जहाज; जो व्यक्ती जहाज पोहतो तो…; काय आहे रहस्य?

Flying Dutchman Ship: रहस्यांबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र आपल्या जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून लागलेला नाही. असंच एक रहस्य म्हणजे, शापित जहाजाचं. फ्लाइंग डचमन ( Flying Dutchman ) असं या जहाजाचं नाव आहे. असं मानलं जातं की, जवळपास गेल्या 400 वर्षांपासून हे जहाज समुद्रात फिरतंय. हे जहाज फार रहस्यमयी असून यासंबंधी अनेक गोष्टीही पसरल्यात आहेत. 

या जहाजाला पाहणं मानलं जातं अशुभ

400 वर्षांपासून हे भटकणारं जहाज पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, समुद्रात जर हे जहाज कोणी पाहिलं तर कोणी पाहिलं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भरपूर अडचणी येतात. दरम्यान अनेकांनी फ्लाइंग डचमन शिप पाहिली असल्याचं म्हटलंय. मात्र यामध्ये किती सत्य आहे, याची पडताळणी अजून केलेली नाही. 

प्रसिद्ध लेखक “निकोलस मॉन्सेरेट” यांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात हे शापित जहाज पाहिल्याचा दावा केला आहे. या जहाजासंदर्भात अनेक समजुती असून यावर शो आणि सिनेमे देखील बनवण्यात आले आहेत. 

वादळात फसलं होतं जहाज

असं मानलं जातं की, 1641 मध्ये जहाजाचे कॅप्टन हेन्रिक वेन हॉलंडहून ईस्ट इंडीजच्या दिशेने निघाले होते. यावेळी वाटेत त्यांनी काही बदल केले. त्यांनी जहाज केप ऑफ गुड होपकडे वळण्यास सांगितलं. मात्र कॅप्टनच्या हा निर्णय जहाजात बसलेल्या प्रवाशांना मान्य नव्हता. त्यावेळी प्रवासी खूपच नाराज झाले. अशातच या जहाजाला भीषण वादळाचा सामना करावा लागला होता. या वादळाचा फटका प्रवाशांना बसला.

हेही वाचा :  ED Raid In Maharashtra : दागिने आणि रोकड पाहून अधिकारीही चक्रावले; नागपूर आणि मुंबईत ईडीची मोठी कारवाई

या वादळाचा तडाखा इतका बसला ही ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. असं म्हणतात की, ज्या प्रवाशांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यांनी  मरताना या जहाजाला शाप दिला. तेव्हापासून जहाज समुद्रात भटकत असल्याचं म्हटलं जातं. महत्त्वाचं म्हणजे या जहाजाचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. 

फ्लाइंग डचमन या जहाजाबाबत शोध देखील घेण्यात आला, मात्र तरीही याचं रहस्य संशोधकांना समजू शकलेलं नाही. त्यामुळे फ्लाइंग डचमॅन हे आजही एक रहस्य आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …