राजस्थान रॉयल्सकडून युजवेंद्र-धनश्रीला खास शुभेच्छा, जॉस बटलर झाला सासरा, पाहा VIDEO

Chahal Wedding Anniversary : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हे आज यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने राजस्थान रॉयल्सने आपला स्टार स्पिनर चहलचं खास अभिनंदन केलं आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका बॉलीवूड गाण्यावर एडिटेड व्हिडिओ शेअर करून चहलला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये जोस बटलरला धनश्रीचा सासरा असं मजेशीर वर्णन केलं आहे.

राजस्थान रॉयल्सने चहलला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हम साथ साथ है या सिनेमातील गाण्याचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये धनश्रीची ओळख तिच्या नवीन सासू-सासरे आणि ननंद-नंदोई यांच्याशी करून दिली जात आहे. यामध्ये धनश्रीचा सासर जोस बटलर बनला आहे, तर धनश्रीची ननंद आर अश्विनची पत्नी बनली आहे. राजस्थान रॉयल्सचे या मजेशीर पद्धतीने अभिनंदन करण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडली असल्याने हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा VIDEO-


आयपीएलमधील स्टार फिरकीपटू चहल

हेही वाचा :  2022 वर्षात कसोटीमध्ये पंतसह बुमराहची हवा, बीसीसीआयनं खास पोस्ट शेअर करत सांगितली आकडेवारी

युजवेंद्र चहल इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसत आहे. गेल्या वर्षीच तो या फ्रँचायझीशी जोडला गेला आहे. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळताना दिसला होता. आयपीएल 2023 साठी राजस्थानने चहलला संघात कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत तो आयपीएलच्या 16 व्या हंगामातही या फ्रँचायझीसाठी कमाल कामगिरी करेल अशी आशा फॅन्सना आहे. IPL 2023 चा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावासाठी सर्व फ्रँचायझी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …