नाकाचा आकार तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या

Nose Shape Personality Test: एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर जेव्हाजेव्हा मत विचारलं जातं, तेव्हा अनेक निकष विचारात घेतले जाता. अमुक एक व्यक्ती बोलते कशी, वावरते कशी, तिच्या किंवा त्याच्या बसण्याची पद्धत अशा एक ना अनेक गोष्टींचा यात समावेश असतो. मुळात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तर्क लावणं आणि ते प्रत्यक्षात खरेही असणं ही बाब जेव्हा लक्षात येते तेव्हा कमाल वाटतं. आपल्या निरीक्षण क्षमतेचं तोंड भरून कौतुक करावंसं वाटतं. तुम्ही कधी असं काही करून पाहिलं आहे का? (Interesting facts your nose shape tell about personality)

तज्ज्ञ मंडळींनी अतिशय रंजक अशा विषयावर लक्ष देत चक्क नाकाच्या आकारावर संशोधन केलं. दोन्ही नाकपुड्यांचा आकार, त्यांच्यामध्ये असणारं अंतर, नाकाची उंची, नाकाच्या शेंड्याचा आकार वगैरे वगैरे मुद्दे इथं महत्त्वाची भूमिका बजावताना दिसले. 

3000 वर्षांपूर्वीपासून चेहरा पाहून सांगितले जात आहेत व्यक्तीचे स्वभावविशेष 

physiognomists अर्थाच चेहरा वाचून भविष्य सांगणारी मंडळी साधारण 3000 वर्षांपूर्वीपासून या तंत्रामध्ये नाकासह चेहऱ्यावरील इतर गोष्टींटे बारकावे टीपत अनेक तर्क लावत होते. चला तर, मग तुमचं नाक कसं आहे यावरून तुमच्या मनात काय दडलंय हे जाणून घेऊया… 

हेही वाचा :  डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना

– चित्रात दाखवल्याप्रमाणं पहिल्या आकारानुसार तुमचं नाक असल्यास तुम्ही एक गंभीर व्यक्ती आहात. आव्हानं स्वीकारण्यात तुम्हाला आनंद वाटतो. नेतृत्त्वंक्षमता तुम्हाला पुढे नेते. मनात चाललेली वादळं तुम्ही लपवून ठेवता, निर्णय घ्यायला घाई करत नाही. 
– दुसऱ्या चित्रात दिसत असल्याप्रमाणं तुमच्या नाकाचा आकार असेल, तर समजा की गर्दीतही तुम्ही स्वत:चं वेगळेपण यशस्वीपणे सिद्ध करता. स्वत:चं मत उत्तमपणे शब्दांत मांडला. चारचौघात मनातलं स्पष्टपणे बोलता. 
– प्रचंड तीक्षण बुद्धी, संयम, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शिस्त हे गुण तिसऱ्या आकृतीमध्ये दिसतंय त्या आकाराचं नाक असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात. 
– चौथ्या आकारात दिसतंय तसं काहीसं वाकडंतिकडं नाक असल्यास तुम्ही समोरच्या व्यक्तीशी दिलखुलास बोलणाऱ्यांपैकी आहात हे स्पष्ट होतं. तुमच्या मनात कोणतीही कटकारस्थानं नसतात. शिवाय तुच्छ वागणुकीची तुम्हाला चीड येते. 
– पाचव्या आकृतीप्रमाणं तुमचं नाक काहीसं जाड असेल तर, तुम्ही अतिशय वेगानं विचार करण्याऱ्यांपैकी एक आहात. एका सकारात्मक आयुष्याच्या दिशेनं तुम्ही कायम वाटचाल करता. 

– सरळ रेषेत पण तरीही लहानसं नाक असल्यास तुमच्या वागण्यातील निरागसपणा कायमच सर्वांची मनं जिंकतो. तुम्ही प्रचंड आशावादी असता. मनात अनेक स्वप्न बाळगून तुम्ही जीवनाच पुढे जात असता. 
– सातव्या आकृतीत दिसत असल्याप्रमाणे नाक काहीसं लंबगोलाकृती असेल तर समजा तुम्ही एक उत्तम व्यावसायिक किंवा कायदेतज्ज्ञ होऊ शकता. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याच मनानं यशाच्या वाटा चालू लागता. 
– आठव्या आकृतीत दाखवल्याप्रमाणं लहानसं नाक असल्यास तुम्ही आपल्यासोबतच्या व्यक्तींना पुढे नेणाऱ्यांपैकी एक आहात. सर्वांशी मैत्रीपूर्ण वागण्याचा स्वभाव तुम्हाला पुढे नेतो. 
– नवव्या आकृतीप्रमाणं नाक पसरट असल्यास समजा, की तुम्ही कधीच कोणाच्या हाताखाली काम करण्यासाठी तयार नसता. स्वत:चा मार्ग तुम्हीच तयार करता. तुमच्या मनात बऱ्याच गोष्टी सुरु असतात. 

हेही वाचा :  Optical Illusion : या सत्र्यांच्या फोडीत लपलंय एक फळ...तुमच्या तीक्ष्ण नजरेने फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा...

(वरील माहिती सर्वसामान्य निरीक्षणांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …