Ertiga आणि Innova ला आता विसरा; मार्केटमध्ये आली Toyota ची स्वस्त 7 सीटर कार, किंमत वाचलीत का?

टोयोटाने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त सात सीटर कार Toyota Rumion ला अधिकृतपणे लाँच केलं आहे. टोयोटाची ही नवी कार मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रसिद्ध एमपीव्ही Ertiga वर आधारित आहे. या कारमध्ये टोयोटाने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. दरम्यान ही कार एकूण 3 व्हेरियंट्स आणि 6 ट्रिम्समध्ये सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. 

कंपनीच्या पोर्टफोलियोत ही सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल 7 सीटर कार आहे. या कारची अधिकृत बुकिंग आता सुरु झाली आहे. ग्राहक 11 हजारांची टोकन अमाऊंट देऊन ही कार बूक करु शकता. यामधील सीएनजी व्हेरियंटची किंमत 11 लाख 24 हजारांपासून सुरु होत आहे. ही कार 26 किमीचा मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. 

ही कार लाँच केल्यानंतर टोयोटाकडे आता सर्वाधिक एमपीव्ही गाड्या झाल्या आहेत. ज्यामध्ये इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस, वेलफायर यांचा समावेश असून, आता रुमियन सहभागी झाली आहे. 

कशी आहे Toyota Rumion – 

टोयोटा रुमियनला आरामदायी तसंच सर्व फिचर्स आणि चांगला परफॉर्मन्सची अपेक्षा असणाऱ्या कुटुबांच्या इच्छेप्रमाणे डिझाईन करण्यात आलं आहे. कारमधील मोठे केबिन आणि इंटिरियरमध्ये दिले जाणारे अॅडव्हान्स फिचर्स ग्राहकांनी सहजपणे ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव देतील. कंपनीने या कारमध्ये पेट्रोल इंजिनसह नियो ड्राइव्ह तंत्रज्ञान (इंटीग्रेटेड स्टार्टर जेनरेटर – आईएसजी) आणि ई-सीएनजी तंत्रज्ञान दिलं आहे. 

हेही वाचा :  Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह त्रिग्रही योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

इंजिन आणि परफॉर्मन्स

Toyota Rumion मध्ये कंपनीने 1.5 लीटरच्या क्षमतेचं K-सीरिज इंजिन वापरलं आहे, जे आर्टिगाप्रमाणे CNG पर्यायासह उपलब्ध असेल. पेट्रोल मोडमध्ये ही कार 75.8 kw क्षमतेचं पॉवर आऊटपूट आणि 136.8 Nm चा टॉर्क जनरेतट करते. तर सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 64.6 kw ची पॉवर आणि 121.5 Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 5-स्पीड मॅन्यूअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडण्यात आलं आहे. 

मायलेज

कंपनीचा दावा आहे की, नवं नियो ड्राइव्ह आणि ई-सीएनजी तंत्रज्ञान या कारला चांगला मायलेज देण्यात सक्षम बनवतं. टोयोटाचा दावा आहे की, याचं पेट्रोल व्हर्जन 20.51 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी व्हेरियंट 26.11 किलो प्रतिकिलो पर्यंतचा मायलेज देतं. ही कार पेट्रोल (नियो ड्राइव्ह) आणि सीएनजी म्हणजे दोन्ही इंधन पर्यायात उपलब्ध असणार आहे.

फिचर्स काय?

Toyota Rumion वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेसह 17.78 cm स्मार्ट प्ले कास्ट टच स्क्रीन ऑडिओ सिस्टम, टोयोटा i-Connect 55 Plus, रिमोट क्लायमेट कंट्रोल, लॉक/अनलॉक, स्मार्टवॉच कंपॅटिबिलिटी, व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  Toyota ने आणली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, जबरदस्त मायलेज आणि भन्नाट फिचर्स; पेट्रोलसह CNG व्हेरियंटही लाँच

तसंच कारमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास अलर्ट सर्व्हिस कनेक्ट देण्यात आला आहे. याशिवाय ऑटो कोलिजन नोटिफिकेशन, टो अलर्ट, फाइंड माय कार, पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि क्रूझ कंट्रोल यांसारखे फिचर्स उपलब्ध आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …