Dr Vilas Ujawane : ‘वादळवाट’ फेम हरहुन्नरी अभिनेत्याची ब्रेन स्ट्रोकशी झुंझ

Dr. Vilas Ujawane : ‘वादळवाट’ (Vadalvaat) फेम अभिनेते, डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujawane) गेल्या सहा वर्षांपासून ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराचा सामना करताना त्यांचे सर्व पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. ते यातून बाहेर पडावे यासाठी सध्या मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आर्थिक मदतीचं आवाहन करत आहेत. 

ब्रेक स्ट्रोकशी झुंज देताना डॉ. विलास उजवणे यांना आता हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारासाठी त्यांना पैशांची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनी चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे. 

राजू कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,मित्रांनो आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्षे ब्रेन स्ट्रोकशी झुंझ देणारा हा वाघ थोडा थकला आहे. ब्रेन स्ट्रोकशी झुंझ देताना त्याचे सर्व पैसे खर्च झाले आहेत. त्याच्यात सुधारणा होत होती. तो सेकंड इनिंग चालू करणार असं वाटत असताना नियती त्याच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली”. 

हेही वाचा :  सिद्धार्थ आनंदने केली 'पठाण 2'ची घोषणा

News Reels

राजू कुलकर्णी यांनी पुढे लिहिलं आहे,”डॉ. विलास उजवणेचे मोठे ऑपरेशन तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच त्याला काविळचीदेखील लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या ठाण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याकडच्या मेडिक्लेम आणि इतर पॉलिसीदेखील संपुष्टात आल्या आहेत. या चक्रव्युहातून अभिमन्यूची सुटका होण्यासाठी आपण सर्व मित्रांनी खारीचा का होईना वाटा उचलू!”

डॉ. विलास उजवणे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. वादळवाट, चार दिवस सासूचे अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. हरहुन्नरी आणि दिलखुलास अभिनेते म्हणून ते ओळखले जात. मालिकांसह त्यांनी नाटकातदेखील काम केलं आहे. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 13 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …