India China Conflict: युद्धाचं सावट! 300 चिनी सैनिकांची घुसखोरी? सीमाभागात भारतीय लष्कर सतर्क

Chinese Army infiltration attempt in Tawang: भारतीय सीमाभागात एकिकडून पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती सुरु असतानाच तिथे लडाख (Ladakh) आणि तवांग (Tawang) मध्ये चीनकडून सीमाभागात काही अशा कारवाया करण्यात आल्या, की ज्यामुळं युद्धाची ठिणगी पडणार का? असाच प्रश्न उपस्थित राहू लागला आहे. एका मार्गानं वारंवार भारतीय सीमाभागात घुसखोरी किंवा तत्सम कारवाया करत सैन्याचं लक्ष वेधण्यामध्ये चीन मग्न असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे भारताशी युद्ध पुकारून देशातील नागरिकांचं लक्ष कोरोना आणि कमकुवत अर्थव्यवस्थेकडून युद्धाकडे वळवण्यासाठी चीन हा मार्ग अवलंबताना दिसत आहे. 

कोरोना परिस्थितीवरून चीनच्या नागरिकांमध्ये असंतोष 

सूत्रांच्या माहितीनुसार चीनमध्ये फोफावलेल्या कोरोना महामारीला (Corona Crisis) नियंत्रणात आणण्यासाठी देशातील सत्ताधाऱ्यांना, शी जिनपिंग सकरारला सपशेल अपयश मिळालंले आहे. ज्यामुळं नागरिकांचा सरकारला कडाडून विरोध आहे. अनावश्यक प्रतिबंधांचं उदात्तीकरण आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठीचा अट्टहास यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण असून, त्यांच्याकडून जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. 

हेही वाचा :  'काश्मीर फाइल्स'ला प्रोपगेंडा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांचे ट्विट, सिनेकलाकारांकडून प्रतिक्रिया

मागणी- पुरवठ्याची साखळी तुटली… 

चीनमध्ये (China Corona) अद्यापही कोरोना प्रतिबंधात्मक नियम असल्यामुळं इथं मोठाले कारखाने पूर्णपणे बंद आहेत. परिणामी मागणी आणि पुरवठ्याची साखळी यामुळं प्रभावित झाली आहे. नुकसान टाळण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांनी अनेकांना नारळ दिला आहे. ज्यामुळं चीनमध्ये बेरोजगारांची संथ्याही झपाट्यानं वाढताना दिसत आहे. 

चीनकडून भारतावर हल्ला होणार? (India china war)

देशातील नागरिकांचं या सर्व मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी चीन सरकार आणि लष्कर युद्धाची कूटनिती वापरू शकतं. यासाठी भारतावर हल्ला करण्याचा पर्यायही ते निवडू शकतात. लडाखमध्ये साधारण 2 वर्षांपासून युद्धजन्य परिस्थितीसाठी चीनकडून सातत्यानं वातावरण निर्मिती करण्याची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी चीननं तवांगकडून कुरापतींना वाव देण्याचा पर्याय निवडला आहे. 

तवांगकडूनच हल्ला का करतंय चीन? 

तज्ज्ञांच्या मते, तवांगकडून हल्ला करण्यामागे चीनचे दोन मनसुबे असू शकतात. पहिलं म्हणजे भूतानच्या तिन्ही बाजूंनी हल्ला करणं आणि दुसरं म्हणजे अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) भारताकडून हिसकावून घेणं. सध्याच्या घडीला भूटानच्या पश्चिमेला असणाऱ्या डोकलामच्या (Doklam) समोर आणि उत्तरेला चीनची सैन्य तैनात आहेत. तवांगवर चीननं वर्चस्व प्रस्थापित केल्यास भूतानच्या पूर्वेलाही चीनची हजेरी असणार आहे. 

हेही वाचा :  आईने टेडी धुवून सुकत घातला, मुलींनी 2 महिन्याच्या बहिणीला बाथरुमध्ये नेऊन आईचं अनुकरण केलं... अंगावर शहारे आणणारी घटना

भारतीय सैन्य पूर्वोत्तर भागात तैनात… 

तिथे चीनचा कावेबाजपणा सुरु असतानाच इथे भारतीय लष्करातील (indian armed forces) तिन्ही सैन्यदलं सध्याच्या घडीला सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहेत. पर्वतीय भागांमध्ये युद्धाभ्यासाचा सराव असणारे आणि त्यात तरबेज असणारे जवान घेत भारतीय सैन्यानं या भागत काही रेजिमेंट्स तैनात केल्या आहेत. शिवाय या भागात तोफा, ड्रोन आणि इतर महत्त्वाचा शस्त्रसाठाही सज्ज ठेवण्यात आला आहे. त्यामुळं आता येत्या काळात चीन नेमकी काय पावलं उचलतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

भारत- चीन झटापटीचे राज्यसभेत पडसाद 

दरम्यान, अरूणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांत झालेल्या झटापटीचे पडसाद आज संसदेत उमटतील. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी आज स्थगन प्रस्ताव मांडणार आहेत. 9 डिसेंबरला भारत आणि चीनचे सैनिक तवांगमध्ये आमनेसामने आले. तब्बल 300 चिनी सैनिक सीमेवर चाल करून आले होते. मात्र भारतीय सैनिकांनी मोठ्या शिताफीने त्यांना पिटाळून लावलं. या झटापटीबाबत केंद्र सरकारने देशाला अंधारात ठेवल्याचा ओवेसींचा आरोप आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …