दिवसातून फक्त एकदा जेवण, उच्चशिक्षणासाठी नव्हता पैसा; समंथाचा VIDEO VIRAL

मुंबई, 21 ऑगस्ट-   साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ मधील उत्कृष्ट अभिनयानंतर ती हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सोबतच पुष्पा चित्रपटातील ‘ओ अंटावा’ या आयटम सॉन्गद्वारे ती जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. नुकतंच अभिनेत्री करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. शोदरम्यान समंथाने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते. दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तिनं आपल्या शैक्षणिक आयुष्याबाबत खुलासा करत एका शाळेमध्ये प्रेरणादायक असा संवाद साधला होता.

समंथाचा हा व्हिडिओ 2017 मधील आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ‘रंगस्थलम’ अभिनेत्रीने 2012 मध्ये ‘ये माया चेसावे’ मधून अभिनयसृष्टीत पदार्पण केल्याचं सांगितलं आहे. दरम्यान,अभिनेत्रीनं सांगितलं की, ती नोकरीच्या शोधात असताना दोन महिने दिवसातून एकाच वेळी जेवत असे. अभिनेत्रीच्या उच्च शिक्षणासाठी तिच्या पालकांकडे पैसे नसल्याचा खुलासाही तिने यावेळी केला. इतक्या अडचणी असूनही, अभिनेत्रीने 10वी आणि 12वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.

समंथा या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, ‘मी जेव्हा शिकत होते तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं होतं खूप अभ्यास कर आणि तू यापेक्षा चांगलं काहीतरी करुन दाखवशील. त्यानंतर मी खूप मेहनत करुन दहावी, बारावी आणि कॉलेजमध्येसुद्धा टॉप केलं. पण नंतर जेव्हा मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं, तेव्हा माझ्या आई-वडिलांना ते परवडणारं नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे कोणतंच स्वप्न नव्हतं. भविष्य नव्हतं काहीच नव्हतं’. त्यामुळे मी काय करायचं हे कधी ठरवलं नव्हतं’.

(हे वाचा:Bollywood Throwback: चॅलेंज! ओळखा पाहू फोटोतील गोंडस मुलीला; आज बॉलिवूडवर करतेय राज्य )
अभिनेत्री पुढे विद्यार्थ्यांना संबोधित करत म्हणते, ‘मला माहित आहे की, तुमचा विश्वास आहे की, तुम्ही तुमच्या पालकांना तुमच्याकडून अपेक्षित असलेल्या मार्गावर जाल. पण मी आज इथे तुम्हाला स्वप्न बघायला सांगायला आलेय. तुम्हाला जे हवं आहे ते स्वप्न पाहा कारण असं केला तरच तुम्ही ते साध्य कराल. तुम्ही अयशस्वी व्हाल, बहुतांश वेळी तो मार्ग कठीण होईल – पण तुम्ही टिकून राहाल. मी कमीत कमी दोन महिने दिवसातून एकच वेळा जेवण केलं. मी विचित्र नोकर्‍यासुद्धा केल्या आणि मी आज इथे आहे. आणि या सगळ्यातून मी जर हे साध्य करू शकत असें तर तुम्हीसुद्धा नक्कीच साध्य करु शकाल’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous जिया खान प्रकरणात पुरता अडकला सूरज पांचोली? डॉक्टरांचा दावा – अभिनेत्याने सत्य लपवले
Next हृतिक रोशन वादात; ‘महाकाल थाळी’मुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Check Also

‘सुशांतची आत्महत्या नाही हत्याच’, आमिर खानच्या भावाचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई, 16 सप्टेंबर : सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होऊन 2 वर्ष झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर …

ठरलं! ‘या’ दिवशी येणार आयुष्मान खुरानाची ‘ड्रीम गर्ल 2’; इथं पाहा तारीख

मुंबई, 16 सप्टेंबर : 2019 मध्ये आलेला  ड्रीम गर्ल हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटात आयुष्मान …