धुळवडीच्या रंगाची भीती जीवावर बेतली ; इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू | The unfortunate death of a young man after falling from a building msr 87


या घटनेमुळे अंबरनाथ शहरातील धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.

धुळवडीत रंग लावण्यासाठी आलेल्या मित्रांपासून दूर पळणाऱ्या एका तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात समोरील एका इमारतीत ही घटना काल(शुक्रवारी) घडली. या प्रकरण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे अंबरनाथ शहरातील धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागलेले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर परिसरात राहणारा अविनाश पाटील (२६) धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या लहान भावासोबत शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या समोर निर्माणाधिन असलेल्या इमारतीखाली उभे होते. त्याचवेळी अविनाश पाटील याचे काही मित्र त्याला रंग लावण्यासाठी आले. मात्र रंग लावण्याच्या भीतीने अविनाश आणि त्याचा भाऊ समोरील इमारतीत लपण्यासाठी पळाले. अविनाशचा लहान भाऊ हा पहिल्या मजल्यावरचा जाऊन थांबला. मात्र अविनाश आणखी वर गेला. मित्रांनी अविनाशच्या भावाला रंग लावून इमारतीखाली आणले. त्याचवेळी काहीतरी पडण्याचा आवाज आला. इमारतीच्या गच्चीवरून अविनाश पाटील जमिनीवर पडल्याचा जोरदार आवाज आल्याचे अविनाशच्या भावाने सांगितल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. मात्र अविनाशचा तोल कसा गेला? यावेळी गच्चीवर आणखी कोणी होते का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा :  शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात? महायुतीचा उमेदवार स्वॅपिंग फॉर्मुला

या घटनेनंतर अविनाशचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …