कथित बॉयफ्रेंडचा हात धरुन जान्हवी कपूरने वाढवला इंटरनेटवरचा पारा

जान्हवी कपूर नेहमीच तिच्या फॅशनेबल लुकमुळे चर्चेत असते. ती कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला हजेरी लावते, तिथे तिच्या परिधान केलेल्या पोशाखाची चर्चा नक्कीच होते. याचे कारण म्हणजे तिचा फॅशन सेन्स, कधीच अपयशी ठरत नाही. असेच काहीसे फेमिना ब्युटी अवॉर्ड्स नाईटमध्ये दिसले, जिथे ती तिचा अफवा असलेला बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणीसोबत निऑन ग्रीन गाऊनमध्ये दिसली. लिंबू रंगाच्या या ड्रेममध्ये जान्हवी समोरुन कोणाच्याच नजरा हलल्या नाहीत. (छायाचित्रे सौजन्य- योगेन शहा, इन्स्टाग्राम @janhvikapoor)

​जान्हवी कपूर खास मैत्रासोबत सर्वांसमोर

जान्हवी कपूर या इव्हेंटमध्ये लिंबू हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती, यावेळी ती तिचा कथित प्रियकर आणि खास मित्र ओरहान अवत्रामणी सोबत आली होती. यावेळी तिने सर्वांसमोर त्याच हात पकडला. यावेळी ओरहानच्या चेहऱ्यावरील हस्य कोणासमोरुन लपून राहिले नाही.

​या डिझायनरने बनवला ड्रेस

जान्हवीने फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांच्या कलेक्शनमधून हा मरमेड लुक गाऊन निवडला होता, ज्यामध्ये तिची फिगर चांगली हायलाइट केलेली दिसत होती. या सुंदर ड्रेसमध्ये ती ग्लॅमलस दिसत होती. अभिनेत्रीच्या या ड्रेसवर पोपट हिरव्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मणी जोडले गेले होते. तर गाऊनमध्ये हॉल्टर नेकलाइनसह रॅपओव्हर जोडण्यात आला होता, ज्यामध्ये तिचा टोन्ड मिड्रिफ फ्लॉंट करताना दिसत होता.

हेही वाचा :  Holi Special Train: रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; कधी- कुठून सुटणार? पाहा...

​नेक डिटेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

या ड्रेसच्या बस्टच्या भागावरील कट-आउट देण्यात आला होता. एखाद्या पार्टीला तुम्ही असा ड्रेस परिधान करु शकता. या ड्रेसला खाली स्कर्ट देण्यात आला होता. या ड्रेसमध्ये ती अगदी जलपरी प्रमाणे दिसत होती. जान्हवीचा हा ड्रेस बॅकलेस ठेवण्यात आला होता. यामध्ये ती अगदी एखाद्या अप्सराच वाटत आहे.

​मेकअपने वाढवला लुक

हा लुक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने फाउंडेशन, शार्प कॉन्टर ब्राऊन आयशॅडो, मस्करा, न्यूड शेड लिप्स आणि ब्रॉन्झ ब्लश घातला होता. तिच्या या फोटोमध्ये या गोष्टी स्पष्टपणे दिसत आहे. तुम्ही देखील असा लुक ट्राय करु शकता.

​ओरहानच्या स्माईलने वेधले सर्वांचे लक्ष

ओरहानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तो ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला होता. काळ्या जीन्स, लक्झरी ब्रँडचे चमकदार जॅकेट आणि काळ्या शूजसह टी-शर्टमध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या स्माईन त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …