Cooking tips: घरी भात नेहमी चिकटच होतो का ? हॉटेल स्टाईल मोकळा भात बनवायचाय…ही घ्या टीप

cooking tips to cook perfect rice: पोट भरण्यासाठी जेवण बनवणं तर सगळेच करतात पण त्यात ती मजा नसते जे जेवण आई बनवते किंवा एखादा शेफ बनवतो.. आपल्याला बऱ्याचदा  हॉटेलमध्ये बनलेलं जेवण पाहून विशेषतः ताटात वाढलेला भात पाहून प्रश्न पडतो कि,एवढा परफेक्ट हा भात कसा शिजवतात जे आपण घरी का नाही शिजवू शकत.   

तुम्ही बनवलेला भात नेहमीच चिकट होतो ? 

जेवण बनवणं ही एक कला आहे. वरवर पाहता आपल्याला वाटतं कि आपण जेवण बनवू शकतो पण योग्य  प्रमाण आणि पद्धत वापरून जेवण बनवणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. यासाठी खूप वर्षांचा अनुभव कामी  येतो.. तुमच्या बाबतीत बऱ्याचदा असं झालं असेल कि घरी तुम्ही भात बनवला असेल पण तरीही तुमचा भात सुट्टा किंवा परफेक्ट  बनत नाही .. तांदूळ कितीही चांगला असला तरी तुम्ही बनवलेला भात नेहमीच चिकट होत असेल तर आता टेन्शन घेऊ नका.. तुमच्या याच त्रासावर उपाय म्हणून आज घेऊन आलोय परफेक्ट हॉटेल स्टाईल मोकळा आणि परफेक्ट राईस कसा शिजवायचा… 

छोट्या छोट्या गोष्टी ठेवाव्यात लक्षात 

भात योग्य रित्या शिजण्यासाठी सर्वात महत्वाचं असत ते म्हणजे बरोबर पाण्याची मात्रा.. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण लक्षात ठेवल्या आणि फोल्लो केल्या कि झालच मग आपलं  सोपं ! 

हेही वाचा :  Multibagger Stock:अवघ्या ३५ पैशांचा शेअर गेला नव्वदीपार, १ लाखांचे झाले २५ कोटी

परफेक्ट भात  बनवण्यासाठी शिजवण्याआधी तो अर्धा तास भिजत ठेवावा

जेवढा भात बनवायचा असेल त्याच्या डिड पट  पाणी घ्यावे, बऱ्याचदा पाण्याचं प्रमाण अधिक होत आणि  भात  चिकट आणि ओलसर होऊन जातो. आणि पाणी कमी जरी झालं तरी भात कच्चा राहून जातो.. 

जेव्हा तुम्ही गॅसवर भात  शिजण्यासाठी ठेवलं तेव्हा पाण्यात सर्वप्रथम अर्ध लिंबू पिळून टाका असे केल्याने भट चिकटणार नाही मोकळा फडफडीत होईल शिवाय जर चुकून पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल तर लिंबामुळे ते बॅलन्स व्हायला मदत होईल. 

बरेच लोक मिडीयम किंवा मंद आचेवर भात शिजवतात पण असं केल्याने भात खराब होतो तो पिठूळ होऊन जातो. म्हणून नेहमी भात फास्ट गॅसवर शिजवावा  आणि उकळी आल्यावर गॅस मंद करावा. 

कुकरमध्ये भात लवकर शिजतो मात्र हे नेहमी लक्षात असुद्या 1 शिट्टी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा आणि दुसऱ्या शिट्टीनंतर गॅस बंद करून टाकावा.. 

वरील टिप्स वापरून तुम्ही एकदा भात करून पाहाच आणि आम्हालाही कळवा तुमचा भात किती परफेक्ट शिजला आहे… (how to cook perfect rice)

हेही वाचा :  शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …