‘पूर्णपणे सहमत’; नारायण मुर्तींच्या ’70 तास काम करा’ वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

Bhavish Aggrawal on Narayan Murthy: काही दिवसांपुर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी एक विधान केले होते ज्याची बरेच दिवस चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. जगाशी स्पर्धा करायची असेल तर तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवं यावर त्यांनी आपलं मतं माडलं होतं. त्यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया येयला सुरूवात झाली होती. अनेक सेलिब्रेटींनी आणि विचारवंतांनी यावर आपली मतं मांडायला सुरूवात केली होती.

त्यातून काही जणं त्यांच्याशी सहमत होती तर त्यातील काहींनी त्यांच्या या विधानावर आपली अहमती दर्शवली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. आताही त्यांच्या या विधानावर मतंमतांतरे येण्यास सुरूवात झाली आहे. त्यात आता अशाच एका उद्योगपतीनंही आपलं मतं माडले आहे. ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी यावर आपलं मतं मांडले आहे. 

आत्तापर्यंत वीर दास, चेतन भगत, अश्रीर ग्रोवर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यात भावेश अग्रवाल यांनीही आता उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी आपल्या X अकांऊटवरून त्यांनी लिहिलं आहे की, यावेळी ते म्हणाले की, ”मी नारायण मुर्ती यांच्या विचारांशी सहमत आहे. आता ही वेळ नाही की आपण कमी काम करावं आणि आपलं मनोरंजन करावं. त्यापेक्षा आता हीच वेळ आहे की आपण एकत्र येत आपल्या या एका पिढीत ते सगळं वाढवावं जे इतर देशांनी अनेक पिढ्यांपासून तयार केले आहे.” असं मतं त्यांनी यावेळी मांडले आहे. त्यामुळे त्यांना नारायण मुर्तीं यांचा हा विचार पटला आहे. त्यामुळे आता भावेश यांचीही सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे. 

हेही वाचा :  'या नोटांचे ढीग पाहा आणि...'; काँग्रेस नेत्याकडे 220 कोटींची कॅश सापडल्यानंतर PM मोदींचा हसत टोला

हेही वाचा : अखेर वायूचा चेहरा दिसला; सोनम कपूरनंच शेअर केला लेकाचा फोटो

मध्यंतरी नारायण मुर्ती यांनी करीना कपूरवरही एक विधान केले होते. ते ज्या विमानातून प्रवास करत होते त्याच विमानातून अभिनेत्री करीना कपूरही प्रवास करत होती. तेव्हा तिला पाहताच अनेक जणांनी तिच्याशी बोलण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी करीनानं त्यांना अजिबातच भाव दिला नाही.

त्यामुळे त्यावर नाराज होत जेव्हा आपल्याला कोणतरी प्रेम देत असेल तर त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. मलाही असे अनेक लोकं भेटतात आणि मी त्यांच्याशी काही वेळ तरी भेटतो, बोलतो परंतु करीनानं कसलाच परिचय दिला नाही. मी म्हणत नाही की तूम्ही नेहमी तसंच करावं परंतु योग्य पद्धतीनं तुम्ही ते साध्य करण्याचा प्रयत्न करू शकता, असं म्हणत त्यांनी करीनावर टीका केली होती. तेव्हा सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. त्यांनी अजून एक ट्विट केले आहे ज्यात फक्त 70 तास नाही तर 140 तास असं म्हटलं आहे. 

हेही वाचा :  36 लाख 33 हजार रुपये Per Day Salary वर काम करते 'ही' भारतीय महिला; संभाळते 98 हजार कोटींची कंपनी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …