Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण

Kerala Ernakulam Blast Updates : केरळमधील ख्रिश्चन धार्मिक मेळाव्यात बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात स्फोट (Kerala Convention Centre Blasts) झाला होता, ज्यात सुमारे 45 लोक जखमी झाले होते, एकाचा मृत्यू झाला आहे. इतर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटांची जबाबदारी डॉमिनिक मार्टिन (Dominic Martin) नावाच्या व्यक्तीने घेतली. स्वत:ला पोलिसांच्या हवाली करण्याआधी डॉमिनिक मार्टिन याने चक्क फेसबूस लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं आहे. त्यामुळे पोलीस देखील चक्रावल्याचं दिसून आलंय. नेमकं काय म्हणाला मार्टिन पाहा…

डोमिनिक मार्टिनने फेसबुक लाईव्ह दरम्यान त्याला शोधण्याची गरज नाही, असं सांगितलं. मी यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणीशी सहमत नाही, असं मार्टिन म्हणतो. यहोवाची विचारधारा धोकादायक आहे. ते लोक लहान मुलांच्या मनात विष पसरवत आहेत. आज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेदरम्यान जे काही घडले त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे, असं डोमिनिक मार्टिनने एफबी लाईव्हमध्ये म्हटलंय. त्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस (Kerala Police) खात्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

मार्टिनच्या आत्मसमर्पणानंतर केरळमधील 14 जिल्ह्यांतील पोलीस प्रमुखांना त्यांच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरही बारीक लक्ष ठेवलं जातंय. संवेदनशील पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशारा केरळ पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा :  अजितदादांचं नाव घेत छोट्या पुढारीने दिला गौतमी पाटीलला इशारा, म्हणाला...

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

देवेंद्र फडणवीस म्हणतात…

दरम्यान, महाराष्ट्रात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. आम्ही नेहमी सतर्क आहोत, वेगळा इशारा देण्यात आलेला नाही, परंतु मुंबई आणि पुणे सारखी मोठी शहरे महाराष्ट्रात असल्यानं आम्ही सावध आहोत. आम्हाला सतत काळजी घ्यावी लागेल की चुकीच्या कारवाया होणार नाहीत. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …