पुढील 12 पैकी 9 दिवस बँका बंद! पाहा उर्वरित ऑक्टोबर महिन्यातील Bank Holidays ची संपूर्ण यादी

Bank Holidays October 2023: ऑक्टोबरचा अर्ध्याहून अधिक महिना सरला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये मोजून 12 दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील 12 दिवसांमध्ये तुम्ही बँकेसंदर्भातील काही काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या महिन्यातील शेवटच्या 15 दिवसांपैकी 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. 

वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्ट्या

भारतामधील बँकांची बँक म्हणजेच केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. या यादीमध्ये यंदाच्या महिन्यामध्ये दसऱ्याच्या सुट्टीसहीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणकोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणासाठी सुट्ट्या आहेत याची यादीच देण्यात आली आहे. देशातील वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध कारणांसाठी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन व्यवहार सुरु

अर्थात या दिवसांमध्ये ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना व्यवहार करता येतील. किंवा बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन करावी लागणारी कामं वगळतं सर्वच कामं करता येतील. मात्र या उर्वरित महिन्यात नेमक्या कधी आणि कशामुळे तसेच कुठे बँका बंद असणार आहेत पाहूयात…

हेही वाचा :  ऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद; आतच पाहून घ्या 'बँक हॉलिडे'ची यादी

कधी, कुठे आणि का आहेत सुट्ट्या पाहा यादी…

21 ऑक्टोबर (शनिवार) – दु्र्गा पूजा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल.

23 ऑक्टोबर (सोमवार) – महानवमी, आयुध पूजा, दुर्गा पूजा, विजय दशमीनिमित्त त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, झारखंड आणि बिहारमध्ये बँका बंद असतील.

24 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा म्हणजेच विजयादशमी, दुर्गा पूजेनिमित्त आंध्र प्रदेश, मणिपूर सोडून सर्व राज्यांमधील बँकांचे व्यवहार बंद असतील. महाराष्ट्रातही या दिवशी बँकांना सुट्टी असेल.

25 ऑक्टोबर (बुधवार) – दूर्गा पूजा (दसैन) या दिवशी सिक्कीममध्ये बँका बंद असतील.

26 ऑक्टोबर (गुरुवार) – दूर्गा पूजा (दसैन)/ विलय दिवस – या दिवशी सिक्कीम, जम्मू-काश्मीरमधील बँका बंद असतील.

27 ऑक्टोबर (शुक्रवार) – दूर्गा पूजा (दसैन) सिक्कीममध्ये बँका बंद असतील.

28 ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा- बंगालमध्ये बँका बंद असतील.

29 ऑक्टोबर (रविवार) – सर्व बँका आठवडी सुट्टीनिमित्त बंद असतील.

31 ऑक्टोबर (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील सर्व बँका महिन्याच्या शेवटच्या दिवशी बंद असतील.

हेही वाचा :  सुट्टयांमध्ये बाहेर फिरायला जायचा प्लान करताय, सावधान! हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली अशी होते फसवणूक

म्हणजेच 19 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंतच्या 12 दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तब्बल 9 दिवस बँका बंद असणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …