Bank Strike: बँकेची कामं असतील तर शुक्रवारीच उरकून घ्या; पुढील अनेक दिवस बँका राहणार बंद

बँकेतील एखादं महत्त्वाचं काम तुम्ही प्रलंबित ठेवलं असेल तर तातडीने उरकून घ्या. कारण शुक्रवारपासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्यातही उद्या म्हणजेच गुरुवारी 26 जानेवारी असल्याने बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुमच्याकडे बँकेचं एखादं महत्त्वाचं काम असेल तर फक्त शुक्रवारच उपलब्ध आहे. त्यानंतर पुढील चार दिवस देशातील सर्व बँका बंद असणार आहेत. युनिअन फोरम ऑफ बँक युनिअनने संपाचा इशारा दिला असल्या कारणाने बँकेची अनेक कामं अडकून राहण्याची शक्यता आहे. 

बँका पाच दिवस बंद असणार आहेत – 

26 जानेवारी – प्रजासत्ताक दिनाची सुट्टी
28 जानेवारी – चौथा शनिवार
29 जानेवारी – रविवार
30, 31 जानेवारी – युनिअन फोरम ऑफ बँक युनिअन्सचा संपाचा इशारा

यामुळे शुक्रवारनंतर सलग चार दिवस सरकारी बँकांच्या व्यवहारावर मोठा परिणाम अपेक्षित आहे

या मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप

1) सर्व आठवडे पाच दिवसांचा आठवडा असावा
2) प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा 
3) मोठ्या प्रमाणात रिक्त असणाऱ्या जागांवर भरती प्रक्रिया राबवावी 
4) जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा
5) वेतन वाढीसाठी पुन्हा वाटाघाटी तात्काळ सुरु व्हाव्यात

हेही वाचा :  Maharashtra Politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितली पडद्यामागची कहाणी

SBI चा ग्राहकांना इशारा

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 30 आणि 31 जानेवारीला संप पुकारला जाणार असल्याने अनेक शाखांमधील कामावर परिणाम होऊ शकतो असा इशारा ग्राहकांना दिला आहे. एसबीआयने स्टॉक एक्स्चेंजला याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की “आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशनने (Indian Banks Association) सूचित केले आहे की युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संपाची नोटीस बजावली आहे. संपात AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC सहभागी असणार आहे. आपल्या मागण्यांसाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याचा प्रस्ताव आहे”.

बँकेचं काम सुरळीत व्हावं यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान संपाचा परिणाम कामकाजावर होऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …