Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे ५ ‘गोल्ड’ निश्चित, पाहा कोण आहे ते खेळाडू!

| Maharashtra Times | Updated: Jul 28, 2022, 4:24 PM

Birmingham 2022 Commonwealth Games: बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आज २८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताला पहिला झटका बसला आहे. भालाफेक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पण त्याशिवाय अनेक जबरदस्त खेळाडू भारताकडून मैदानात उतरणार आहेत, जे सुवर्णपदकासाठी कामगिरी करण्याची आशा आहे. नीरज चोप्रा CWG मधून बाहेर पडला असला, तरी भारताकडे असे अनेक खेळाडू आहेत जे या खेळात भाग घेऊन सुवर्ण कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, वेटलिफ्टर मीराबाई चानू, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, कुस्तीपटू रवी दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन यांच्याकडून भारताला मोठी अपेक्षा आहे. आजपासून सुरू होणारी ही स्पर्धा ८ ऑगस्टपर्यंत असणार आहे.

 

commonwealth games 2022 expected gold medals from these indian players
Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे ५ ‘गोल्ड’ निश्चित, पाहा कोण आहे ते खेळाडू!

बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू

भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने (Badminton Player PV Sindhu) जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धेत बाजी मारत अनेक पदकांची कामगिरी केली आहे. पण सिंधूने आतापर्यंत राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत एकेरी सामन्यात एकही सुवर्ण पदक जिंकलं नाही. कॉमनवेल्थ स्पर्धेत ४ वर्षांपूर्वी सिंधू सायनाकडून पराभूत झाली होती. त्यावेळी पी. व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. आता यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधू महिला एकरीत सुवर्णपदकाची कामगिरी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कुस्तीपटू रवी दहिया

कुस्तीपटू रवी दहियाने (Wrestler Ravi Kumar Dahiya) ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आपल्या नावे केलं आहे. तसंच त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदही कमावलं आहे. त्याशिवाय याचवर्षी त्याने एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकही मिळवलं आहे. आता राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाच्या दिशेने (Birmingham 2022 Commonwealth Games) कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ५७ किलो गटात तो या स्पर्धेत उतरणार आहे. ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट दहिया यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात आहे.

बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन

आसामची बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचा (Boxer Lovlina Borgohain) यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाच्या दिशेने कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. याआधी लव्हलिनाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. विजेंदर सिंग आणि मेरी कोमनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी बॉक्सर आहे. २०२१ मध्ये अर्जुन पुरस्काराने लव्हलिनाला सन्मानित करण्यात आलं होतं. हा सन्मान मिळवणारी ती आसाममधील पहिली महिला बॉक्सर आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत लव्हलिनाकडून सुवर्णपदकाची आशा केली जात आहे.

टेबल टेनिसपटू मनिका बात्रा

ग्लासगो (Glasgow) खेळातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या मनिका बात्राने २०१८ मध्ये (Table Tennis Player Manika Batra) २ सुवर्ण पदकं, १ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवली आहेत. आता मनिका बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करण्यास उत्सुक असून तिच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. २७ वर्षीय मनिका बात्रा टेबल टेनिस खेळातील सध्या भारतातील टॉपची खेळाडू असून सिंग्लसमध्ये ४१व्या क्रमांकावर आहे.

वेटलिफ्टर मीराबाई चानू

वेटलिफ्टर मीराबाई चानू (Weightlifter Mirabai Chanu) यांचा राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामना आहे. त्यांची ही तिसरी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या तिरंग्याची शान वाढणाऱ्या मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत याआधी दोन पदकं कमावली आहेत. त्यांनी २०१४ मध्ये रौप्य आणि २०१८ मध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. यावर्षीही सुवर्ण पदकाची कामगिरी करुन त्या हॅट्रिक पूर्ण करतील अशा आशा आहे. त्यांनी ४ वर्षांपूर्वी गोल्ड कोस्ट स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती. खेळातील या जबरदस्त योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कराने सन्मानित केलं आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईला क्रिकेटचे वेड लावणाऱ्या सचिनच्या मुलाला का सोडावं लागलं शहर; निर्णय ठरणार गेमचेंजर?

Arjun Tendulkar: क्रिकेटचा देव म्हणून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. सचिनच्या मुलानेही क्रिकेट …

उर्वशी रौतेलासोबतचा वाद सुरू असताना ऋषभ पंतला मिळाली मोठी जबाबदारी; म्हणाला, ही एक…

नवी दिल्ली- भारतीय संघातील उत्कृष्ट फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत (Rishabh Pant) याला ओळखले …