चेह-यावरील म्हातारपणाच्या खुणा होतात छुमंतर,ताबडतोब करा अभ्यंग,आयुर्वेदिक डॉ. सांगितली पद्धत

शरीरातील पेशींचे कार्य मंदावले की म्हातारपण सुरू होते. जसं जसे वय वाढू लागते आणि आपण म्हातारपणाच्या जवळ जातो तस तशी ही प्रक्रिया जलद गतीने सुरू होते, परंतु आजच्या युगात लहान वयातच अकाली वृद्धत्व (Premature Aging) येऊ लागले आहे. तारुण्यात येणाऱ्या काही समस्या त्याचीच साक्ष देतात. म्हातारपण आल्यावर डोळे कोरडे पडणे, ओठ कोरडे पडणे, सुरकुत्या, केस सफेद होणे, सांध्यामधून कट-कट आवाज येणे, झोप न येणे, चिंता, अस्वस्थता, न्यूरो डीजनरेटिव्ह डिसऑर्डर, नर्व्स एट्रोपी अर्धांगवायूचा झटका, कंबरेमध्ये वेदना होणे, हर्निएटेड डिस्क, सर्वाइकल स्पॉन्डलाइटिस, पार्किंसन, स्मृतीभंश अशा आणि यांसारख्या अजून 17 समस्या निर्माण होऊ शकतात.

योग टीचर आशिष चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला तारुण्यात वरीलपैकी कोणतीही समस्या जाणवत असेल तर याचा अर्थ तरुण वयातच तुम्हाला वृद्धत्व आले आहे असे म्हणावे लागेल. हेच अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे रोज आयुर्वेदिक अभ्यंग प्रक्रिया (Ayurvedic Abhyang Massage) सुरू करा. (फोटो सौजन्य :- iStock, Pexels, Freepik.com)

हेही वाचा :  लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

आयुर्वेदिक अभ्यंग प्रक्रिया म्हणजे नक्की काय?

आयुर्वेदिक अभ्यंग प्रक्रिया म्हणजे नक्की काय?

योग टीचर आशिष चौधरी यांच्या मते, अभ्यंगाला आयुर्वेदात अभ्यंगम असेही म्हणतात. या प्राचीन आयुर्वेद पद्धतीचा सध्याच्या जगाला विसर पडला आहे. पूर्वी याच पद्धतीने लोक सुदृढ आणि निरोगी राहायचे व अकाली वृद्धत्वाचे तेव्हा साधे नामोनिशान देखील नव्हते. आयुर्वेदिक अभ्यंग या प्रक्रियेत तुम्हाला शरीराच्या सर्व अवयवांचा कोमट तेलाने मसाज करावा लागतो ज्यामुळे असंतुलित दोष शांत होऊ शकतात.
(वाचा :- केसांवर ३ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, हेअरफॉल आणि कोंड्यापासून मिळेल सुटका)​

अभ्यंग मसाज करण्याची योग्य पद्धत

अभ्यंग मसाज करण्याची योग्य पद्धत

अभ्यंग (How to do Abhyangam Massage) हा एक आयुर्वेदिक मसाज आहे, जो शरीराच्या केसांची वाढ ज्या दिशेने आहे त्या दिशेने केला पाहिजे. यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण शरीराच्या अगदी आतल्या आत असणाऱ्या आणि दूर दूर असणाऱ्या सर्व अवयवांपर्यंत देखील पोहोचते.
(वाचा :- सौंदर्यासाठी नाही तर या कारणासाठी म्यानमार आणि थायलंडमधील महिला वर्षानुवर्षे गळ्यात घालतात धातुच्या काड्या)​

अभ्यंग मसाज कोणत्या वेळी करावा?

अभ्यंग मसाज कोणत्या वेळी करावा?

आयुर्वेदिक अभ्यंग मसाज तुम्ही दररोज करू शकता. तुम्ही अंघोळ करण्यापूर्वी हा मसाज करू शकता आणि थोडा वेळ उन्हात बसू शकता. पण जरी रोज शक्य नसले तरी जसा वेळ मिळेल तसा आणि आपल्या कामचे नियोजन करून तुम्ही दैनंदिन किंवा साप्ताहिक प्रमाणात अभ्यंग मसाज घ्यायलाच हवा.
(वाचा :- ४० व्या वर्षात मिळेल Teenager Look, मेकअप करताना वापरा या सोप्या टिप्स)​

हेही वाचा :  Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? 'मविआ'च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी

या लोकांनी करू नये अभ्यंग मसाज

या लोकांनी करू नये अभ्यंग मसाज
  1. गरोदरपणात
  2. मासिक पाळी दरम्यान
  3. दुखापत झाल्यावर
  4. संधिवात
  5. रूमेटाईड अर्थरायटिस
  6. उच्च रक्तदाब असताना
  7. कर्करोगाचे रुग्ण असाल तर
  8. शस्त्रक्रिया बरी होईपर्यंत
  9. ताप आल्यावर
  10. उलट्या होत असताना
  11. जुलाबाची समस्या असेल तर
  12. पचनाच्या आजारांनी ग्रस्त असताना
  13. पंचकर्म झाल्यावर लगेच
  14. फॅटी लिव्हरमध्ये
  15. एक्यूट इंफ्लामेशनमध्ये
  16. लठ्ठपणाचा सामना करत असताना

अभ्यंग मसाज न घेतलेला उत्तम!

(वाचा :- केसगळतीवर घाबरून जाऊ नका, एका आठवड्यात थांबेल केस गळणं, बाबा रामदेव यांनी सांगितला रामबाण उपाय)​

शरीराच्या मसाजसाठी कोणते तेल चांगले आहे?

शरीराच्या मसाजसाठी कोणते तेल चांगले आहे?

आशिष चौधरी यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते आणि त्यानुसारच तेलाची (Best Oil for Ayurvedic Massage) निवड करावी. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तथापि, वात दोषामध्ये तिळाचे तेल आणि वात-पित्त दोषामध्ये खोबरेल तेल चांगले मानले जाते.
(वाचा :- ऋजुता दिवेकर यांनी सांगितले सौंदर्य खुलवण्याचे तीन घरगुती उपाय, करिना कपूर ही करते या गोष्टीचे पालन)​

अभ्यंग मसाज झाल्यावर काय करावे?

अभ्यंग मसाज झाल्यावर काय करावे?

अभ्यंग मसाज केल्यानंतर शरीराला डाळीचे चूर्ण किंवा बेसन पीठ पाण्यात मिसळून त्या मिश्रणाने उदवर्तनम करावे. यानंतर कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला आरामदायी वाटेल.
(वाचा :- घरीच बनवा डार्क काजळ अलर्जीची राहणार नाही भिती, ऑर्गेनिक काजळ घालेल सौंदर्यात भर)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  मुख्यमंत्री नाराज आहेत का? अजित पवार म्हणतात, 'जबाबदारीने बोलायला हवं'

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करताय का? तुम्हीच नाही तर प्रत्येक दुसरा भारतीय नव्या नोकरीच्या शोधात, पण कारण काय?

Job News : शिक्षणाची पायरी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण मनाजोग्या नोकरीच्या शोधात असतो. सरकारी असो वा खासगी, …

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics :  महायुतीत प्रचंड तणाव असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अजित पवारांना महायुतीतून …