गौतमीच्या आडनावाचा वाद; चंद्रकांत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की…

Chandrakant Patil On Gautami Patil : महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद चांगलाच  रंगला आहे. गौतमीनं पाटील आडनाव लावू नये, अन्यथा तिचे कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. तर, दुसरीकडून काहींनी तिची पाठराखण सुरू केली आहे. या वादात आता भाजप नेते तथा जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

पाटील हे एक आडनाव असून हा शब्द समाज दर्शवत नाही असं मत जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसंच कोणतीही कला सुसंस्कृतपणे सादर केली जावी, असभ्यपणे करू नये. कलाकारालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून, त्यांचे कार्यक्रम बंद करणं न पटणारं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा गौतमीला पाठिंबा 

गौतमी पाटीलला आता आमदार दिलीप मोहिते पाटलांनीही पाठिंबा दिला आहे. गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु असताना दिलीप मोहिते पाटलांनी तिचं समर्थन केले आहे. गौतमी पाटीलला संपवू नका असं आवाहनही त्यांनी राज्यकर्त्यांना केले आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपतींनी गौतमीवरुन यु टर्न घेतला. तर, दुसरीकडे दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीचं कौतुक करत तिचं समर्थन केलं आहे.

हेही वाचा :  महापालिका निवडणुका कधी होतील? राज ठाकरे यांचं निवडणुकीबाबत भाकीत

गौतमी मराठा समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप

गौतमी पाटील… आणि वाद होतील… हे आता समीकरणच बनलंय… गौतमीच्या पाटील आडनावावरून सुरू झालेला कलगीतुरा तिच्या डान्ससारखाच रंगलाय… गौतमीचं खरं आडनाव चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती मराठा समाजाची बदनामी करतेय, असा आक्षेप मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतलाय. तिचे कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराच संघटनेनं दिला आहे.

दुसरीकडं जळगावातल्या मराठा सेवा संघानं मात्र गौतमीची बाजू लावून धरलीय.. मराठा सेवा संघातर्फे गौतमी पाटीलला मराठा भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणीच करण्यात आली आहे. पाटलांमध्ये असा राडा रंगला असताना, गौतमी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पाटील आडनाव वापरणारच, असं तिनं ठणकावून सांगितल आहे.

संभाजीराजेंचे घुमजाव 

गौतमी पाटीलच्या पाठिंब्यावरून संभाजीराजेंनी घुमजाव केलंय. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा कलेला संरक्षण नको अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. त्यांनी याबाबत एक ट्विट केलंय. याआधी त्यांनी कलाकारांना संरक्षण द्यायला हवं असं म्हटलं होतं. मात्र नाकारात्मक पडसाद उमटल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …