Kangana Ranaut : सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल, कंगना रनौत सोशल मीडियावर ट्रोल!

Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजकाल तिच्या ‘लॉक अप’ शोचा बोलबाला आहे. दरम्यान, कंगनाने तिची हेअरस्टाईल बदलली आहे, ज्यामध्ये तिला एका नजरेत ओळखणे देखील कठीण झाले आहे. त्याच वेळी, काही लोकांनी कंगनाला सोशल मीडियावर तिच्या या लूकबद्दल प्रचंड ट्रोल केले आहे. याचवेळी सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल लगावल्याने देखील तिला नेटकरी सुनावत आहेत.

कंगना रनौतचा व्हिडीओ हा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. कंगना रनौत मंगळवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान तिचा लूक पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसत होता. तिचे केस पूर्वीपेक्षा खूपच लहान दिसत होते. एअरपोर्टवर कंगना फ्लोरल ड्रेसमध्ये दिसली, पण काही लोकांनी तिच्या लूकची तुलना आमिर खानची माजी पत्नी किरण रावशी करायला सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ :

कंगना रनौतचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये कंगना प्रचंड ट्रोल होत आहे. वास्तविक यावेळी तिने सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाला ‘आप रेहने दो..’ असे उद्धटपणे म्हटले. यावर आता युझर्स कंगनाला बोल लगावत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘हिला सुरक्षा का देण्यात आली आहे. तिने देशासाठी काय केले?’ दुसर्‍याने लिहिले की, ‘माझ्या कराचा पैसा हिच्या सुरक्षेत गुंतवला जात आहे.’

हेही वाचा :  विक्रम गोखले यांच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

आमिरच्या पूर्व पत्नीशी तुलना

कंगना रनौतच्या हेअरस्टाइलबद्दलही काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले, ‘आता हिने किरण रावची कॉपी करायला सुरुवात केली का?’ आणखी एका युझरने कमेंट केली की, ‘पुढचं टार्गेट आमिर खान.’ आणखी एकाने लिहिले की, ‘कंगना आमिरच्या एक्स पत्नीसारखी दिसतेय.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …