Chaitra Navratri 2023: देवी दुर्गेच्या नावावरून ठेवा आपल्या मुलीचे नाव, अर्थासहित नामावली

सुरूवात होते. यावर्षी गुढीपाडवा २२ मार्च, २०२३ रोजी साजरा करण्यात येत आहे. २२ मार्चपासून ते ३० मार्च, २०२३ पर्यंत देवी दुर्गेचा हा नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. धार्मिक ग्रंथ आणि पुराण कथेनुसार देवी दुर्गेची अनेक रूपे आणि नावं आहे.

Goddess Durga Baby Girl Names: देवी दुर्गेच्या नावामागे अनेक अर्थ लपले आहेत. तुमच्याही घरी या काळात मुलीचा जन्म झाला असेल अथवा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या घरी बाळाचे आगमन झाले असेल तर देवी दुर्गेची ही नावे नक्कीच तुम्हाला आवडतील. अर्थासह मुलींची ही नावे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Canva)

अनिका

अनिका

आई दुर्गाच्या या नावाचा अर्थ सुंदर आणि प्रतिभाशाली असा असून तुम्ही आपल्या मुलीसाठी हे नाव निवडू शकता. युनिक नावाच्या शोधात असाल तर दुर्गेचे हे नाव तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

नित्या

नित्या

नित्या एक संस्कृत नाव असून शाश्वत अथवा सदैव असा या नावाचा अर्थ आहे. दुर्गा म्हणजेच या जगातील शाश्वत असे मानण्यात येते. त्यामुळे तुम्ही मुलीचे नाव नित्या असेही ठेऊ शकता.

हेही वाचा :  Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

भाविनी

भाविनी

जगाला जन्म देणारी स्त्री अर्थात दुर्गा. भाविनी अर्थात दुर्गेचे एक स्वरूप. सुंदरता आणि मनाला भावणारी असाही या नावाचा अर्थ होतो. दुर्गेचे हे नाव अत्यंत युनिक असून अजूनही कॉमन झालेले नाही.

(वाचा – श्रीकृष्णाच्या मुलांची नावं माहीत आहेत का? मुलांसाठी युनिक नावांचा शोध असल्यास व्हाल आनंदी)

भव्या

भव्या

प्रत्येक गोष्टीची सुरूवात भव्यतेने अर्थात प्रचंड वेगाने करणारी अशी मुलगी. दुर्गेचे प्रचंड रूप असा याचा अर्थ असून तुमच्या मुलीचे आद्याक्षर भ आले असेल तर भव्या हे नाव वेगळे असून तुम्हाला दुर्गेच्या नावाच्या या अर्थाचा नक्कीच वापर करता येईल.

(वाचा – हनुमानाची ही नावं आहेत अगदी आधुनिक, मुलासाठी निवडा ही नावं राहील मारूतीची कृपादृष्टी)

नियती

नियती

नियती हा शब्द आपण बऱ्याचदा उच्चारतो. मात्र आपल्या मुलीचे नावही तुम्ही ठेऊ शकता. भाग्य, नशीब असा या नावाचा अर्थ असून दुर्गा हीच नियती मानली जाते.

(वाचा – ठेवा बाळांची नावे थोर संतांवरून, मूळ नावाचा जपा वारसा)

नारायणी

नारायणी

भगवान विष्णूचे एक नाव नारायण आहे आणि त्याची पत्नी लक्ष्मी अर्थात नारायणी. ज्या व्यक्तीच्या रोमरोमात नारायणाचा वास आहे त्याला नारायणी असे म्हटले जाते. दुर्गेशी संबंधित हे नाव आहे.

हेही वाचा :  आदित्य नारायणच्या गोड मुलीचे नाव त्विशा, त वरून मुलींची नावे

साध्वी

साध्वी

ज्या स्त्री मध्ये अनेक आशा असतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाने प्रभावित करणारी अशी स्त्री म्हणजे साध्वी. दुर्गेचे तेज ज्यामध्ये सामावले आहे असा या नावाचा अर्थ असून तुम्ही तुमच्या मुलीचे नाव ठेवण्याचा विचार करत असाल तर या युनिक नावाचा आधार घ्या.

इंद्राणी

इंद्राणी

देवतांची मुख्य अथवा इंद्राची पत्नी असा त्याचा अर्थ होतो. याशिवाय दुर्गेचे एक रूप असाही इंद्राणीचा अर्थ होतो. महाराणी असणारी इंद्राणी.

प्रत्यक्षा

प्रत्यक्षा

वास्तविकता मानणारी स्त्री. प्रत्येक गोष्टीची अनुभूती घेऊन सारासार विचार करणारी स्त्री असा या नावाचा अर्थ असून दुर्गेच्या नावांपैकी एक आहे.

कौशिकी

कौशिकी

देवी दुर्गेचे समानार्थी नाव आणि रेशमी वस्त्र नेसणारी स्त्री असाही या नावाचा अर्थ होतो. कौशिकी हे नाव युनिक असून तुमच्या मुलीसाठी नक्कीच वरदान ठरू शकते.

तोशानी

तोशानी

दुर्गेचे गौरव रूपातील नाव म्हणजे तोशानी. संपूर्ण समाधानी असणारी अशी स्त्री म्हणजे तोशानी असाही त्याचा अर्थ होतो. तुम्हाला मुलींसाठी युनिक आणि वेगळ्या नावाचा शोध असेल आणि आद्याक्षर त आले असेल तर तुम्ही या नावाचा आधार घेऊ शकता.
देवी दुर्गेची अनेक रूपे आहेत आणि नावंही अनेक आहेत. त्यापैकी ही ११ युनिक नावे तुमच्यासाठी आम्ही दिली असून तुम्हाला ही नावे कशी वाटली नक्की कळवा.

हेही वाचा :  Chaitra Navratri 2023 Fasting Tips: वजन कमी करायचंय? ही आहे नामी संधी, फॉलो करा 'या' टिप्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …