CEED 2022: IIT डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल ‘या’ तारखेला

CEED 2022 Result: आयआयटीमध्ये डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षा सीईईडी २०२२ मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology, IIT) मुंबईद्वारे आयोजित डिझाइन पीजी/पीएचडी प्रवेश परीक्षा- कॉमन एन्ट्र्न्स एक्झाम फॉर डिझाइन(Common Entrance Exam for Design, CEED) च्या निकाल ८ मार्च २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे.

CEED २०२२ चा निकाल आयआयटीची अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाहीर केला जाणार आहे. आयआयटी मुंबईतर्फे १२ मार्च रोजी परीक्षेच्या वेबसाइटवर CEED २०२१ स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात येणार आहे.

मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, रुरकी येथील आयआयटी आणि IIITDM मधून चालविल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ डिझाईन (M.Design) आणि PhD अभ्यासक्रम २०२२ मध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी CEED २०२२ घेतली जाते. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती.

RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

मुंबई पालिकेच्या विद्युतपुरवठा आणि परिवहन विभागात भरती, दीड लाखापर्यंत मिळेल पगार
यानंतर संस्थेने २५ जानेवारी रोजी तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर ३१ जानेवारी रोजी अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर, CEED २०२२ चा निकाल ८ मार्च रोजी जाहीर होणार होता.

हेही वाचा :  MBBS Seats: खुशखबर! राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ५२० जागा वाढल्या

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये तरुणांना नोकरीची संधी
१० मार्च रोजी UCEED २०२२ चा निकाल
दुसरीकडे, विविध आयआयटीमध्ये आयोजित केलेल्या डिझाईनमधील अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या UCEED २०२२ चा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षांसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज आले होते आणि ही परीक्षा २३ जानेवारीला झाली होती.

यानंतर तात्पुरती उत्तरतालिका २५ जानेवारीला आणि अंतिम उत्तरतालिका ३१ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यूजी प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड १४ मार्चपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील
इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …