Cause of Belly Fat : दररोज पोटावरची चरबी वाढतेय, शर्टच्या बटनातून ढेरी डोकावतेय? तुमच्या ७ चुकाच याला कारणीभूत

संपूर्ण शरीरयष्ठी बारिक मात्र पोटाची ढेरी बाहेर लटकते? हा हाय अलर्ट आहे. तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा अनेक कारणांमुळे होतो. मात्र त्याच मुख्य कारण आपण स्वतः आणि आपली जीवनशैली असते. अनेकदा आपण कळत नकळत अशा चूका करतो ज्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढवण्याचे काम करते.

आपल्या वजन वाढीला किंवा शारीरिक त्रासाला आपण स्वतःच कारणीभूत असतो. अशावेळी शरीरातील ७ महत्वाचे बदल करून तुम्ही लठ्ठपणा म्हणजेच बेली फॅट कमी करू शकतो. त्यामुळे हे बदल जाणून घेणे गरजेचे आहे.

​प्रोसेस्ड फूडचे सेवन

प्रोसेस्ड फूड तुमचं संपूर्ण शरीर बिघडवण्याचं काम करत असतं. रिसर्च गेटमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, प्रोसेस्ड फूडमध्ये कॅलरीज सर्वाधिक असतात. तसेच यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या पोषणतत्वे देखील नसतात. यामुळे जंक फूडमुळे शरीराला कोणताच फायदा होत नाही. बाहेरचा फास्ट फूड खाणाऱ्या लोकांची पोटाची ढेरी बाहेर लोमकळत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. तुम्हाला जर पोटाच्या चरबीपासून सुटका मिळवायची असेल तर पोटाच्या बाजूचा घेर जमा होण्यापासून रोखलं पाहिजे.

(वाचा – Weight Loss Story: लठ्ठपणामुळे PCOD चा त्रास बळावला, रोज आवळा शॉट्स पिऊन 6 महिन्यात कमी केलं 15 किलो वजन))

हेही वाचा :  हे 8 पदार्थ मनसोक्त खाल्ले तरी वाढणार नाही टिचभरही वजन, 40 पेक्षाही कमी कॅलरीने भरलेत ठासून

​चांगल्या फॅटची कमतरता

गुड फॅट म्हणजे चांगली चरबी देखील शरीराला आवश्यक असते. सोबतच या फॅटमुळे खराब कोलेस्ट्रॉलवर मात मिळवण्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी मदत होते. जर तुम्ही आहारातून खराब फॅटचे सेवन करत असाल तर पोटाची चरबी जमा होणे ही सामान्य बाब आहे. यामुळे तुम्ही आहारा ऍवोकाडो, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, सूर्यफुलाच्या बियांचा समावेश केल्यास तुम्हाला चांगल्या फॅटचा समतोल राखण्यास मदत होईल.

(वाचा – Weight Loss Story : ५ महिन्यात ३१ किलो वजन कमी करून डायबिटिजवर अशी केली मात, डाएट प्लान महत्वाचा))

​कमी झोप

मायो क्लिनिकनुसार, अपर्याप्त किंवा कमी झोप ही चरबी वाढवण्यास कारणीभूत असते. अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, गरजेपेक्षा कमी झोप झाल्यास पोटात एकूण ९% चरबे आणि पोटाच्या आतड्यांमध्ये ११% चरबी वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जर तुम्ही कमी झोपत असाल तर याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो.

(वाचा – Foods for Lower Cholesterol: नसांमध्ये जमा झालेलं घाणेरड फॅट कमी करून HDL चांगल्या फॅटला वाढवतील हे ५ सुपरफूड)

​फिजिकल ऍक्टिविटीची कमी

बॉडी फॅट रोखण्यासाठी नियमित शरीराची हालचाल आवश्यक आहे. मग व्यायाम असो किंवा चालणे महत्वाचे आहे. तुम्ही दिवसभर बसून असाल किंवा तुमच्या कामाची पद्धत बैठी असेल तर याचा शरीरावर आणि लठ्ठपणावर भरपूर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक हालचाल अत्यंत महत्वाची आहे.

हेही वाचा :  Quick Weight loss : आळशी आहात पण झटपट वेटलॉस करायचंय? झोपूनच करा 'ही' 5 साधीसोपी कामं, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीराची चरबी!

(वाचा – Foods for Lower Cholesterol: नसांमध्ये जमा झालेलं घाणेरड फॅट कमी करून HDL चांगल्या फॅटला वाढवतील हे ५ सुपरफूड)

​दारूचे सेवन

अधिक प्रमाणात दारूचे सेवन हे लठ्ठपणा, वजन वाढणे आणि खासकरून पोटाच्या चरबीला कारणीभूत आहे. अशात जर तुम्ही २ पेगपेक्षा जास्त सेवन करत असाल तर बेली फॅट वाढण्याची आणि इतर आजारांची जोखीम सर्वाधिक असते.

(वाचा – बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याकरता सर्वोत्तम ठरते ‘ही’ भाजी, हाडांना १०० टक्के करेल मजबूत)

​गरजेपेक्षा जास्त टेंशन

ताण-तणाव प्रत्येकाला आहे. पण अधिकचा ताण हा तुमच्या पोटाच्या चरबीला देखील कारणीभूत आहे. कामाशी संबंधित तणावाच्या स्थितीत शरीरात कोर्टिसोलचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढत आणि या जाळ्यातून बाहेर पडणे कठीण होते. कोर्टिसोल रिलीज होण्यापासून रोखण्यासाठी आयुष्यातील ताण आणि तणाव कमी करणे आवश्यक आहे.

(वाचा – NARCO Test मध्ये पटापट कसं खरं बोलतो आरोपी? काय असते या चाचणीची प्रक्रिया, याचा दुष्परिणाम काय?))

​हार्मोनल इश्यू

महिलांमध्ये सामान्यपणे लठ्ठपणा हा प्रेग्नेंसी, मेनोपॉज सारख्या कारणांमुळे झालेल्या हार्मोनल असंतुलन जाणवतो. याप्रमाणेच इतर हार्मोनल संबंधित समस्या जसे की, हायपोथायरायडिज्म, अंडाशयात अल्स पोटाला वाढवू शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या समस्यांनावर उपाचर करून तुम्ही पोटावरील लटकती चरबी कमी करू शकता.

हेही वाचा :  Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!

(वाचा – सायनसला हलक्यात घेऊ नका, नसांना फोडून मेंदू-डोळा करेल खराब, ५ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

(फोटो सौजन्य – istock Photo)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …