ताज्या

ऊर्जा विभागाची ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर ; ३२ लाख ग्राहकांना लाभ होणार

अकोला : कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत व त्यांना पुन्हा वीज जोडणी देणाऱ्या विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली. या योजनेमुळे राज्यातील ३२ लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महावितरणचे तीन कोटींहून अधिक वीज ग्राहक आहेत. वारंवार मागणी …

Read More »

आयटी परिषदेचे राजकीय आखाडय़ात रूपांतर

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर हल्लाबोल नाशिक : आडगाव शिवारात प्रस्तावित आयटी पार्क प्रकल्पास चालना देण्यासाठी आयोजित परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माहिती तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याऐवजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर आपल्या खास शैलीत हल्ले चढविल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी चकित झाले. राणे यांच्या भाषणास उपस्थित भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत गेला, तसे राणेंच्या भात्यातून वाग्बाण सुटत होते. आरोप आणि …

Read More »

वीज प्रश्नावरून आघाडी सरकारसमोर पेच

मित्रपक्षाकडूनच कोंडी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन दयानंद लिपारे, लोकसत्ता  कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल सवलत योजनेला ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला मित्रपक्षांनी वीज प्रश्नावरून आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. जनता दलाचे प्रधान महासचिव, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी शेती पंप ग्राहकांच्या …

Read More »

…तर पुणे महापालिकेचं महापौरपद ‘आरपीआय’ला मिळावं अशी मागणी करणार : रामदास आठवले

“ अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपासोबत यावे”, असं देखील आठवले म्हणाले आहेत. “ आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि आरपीआय युती होणार आहे. शहरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून या निवडणुकीत आरपीआयला २५ जागा दिल्या जाव्यात, अशी मागणी करणार आहे. त्यानंतर महापालिकेत सत्ता आली आणि त्यावेळी जर अनुसूचित जातीचे आरक्षण आले तर, महापौरपद रिपाइंला …

Read More »

Russia Ukraine War : प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली मुलं वाचवा ; सुप्रिया सुळेंचं मोदी सरकारला आवाहन

“आज दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत” असं देखील सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं मागील पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरूच आहे. युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियाला प्रत्युत्तर देत आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येत भारतीय विद्यार्थी व नागरीक असल्याने, त्या सर्वांना तिथून सुरक्षितपणे भारतात परत …

Read More »

“तुमचं एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो…”, ‘ती परत आलीये’ मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

सध्या ते ‘छुमंतर’ या विनोदी नाटकात काम करत आहे. झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘ती परत आलीये.’ या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणून देवेंद्र सरदार यांना ओळखले जाते. देवेंद्र सरदार यांनी या मालिकेत लोखंडे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सध्या देवेंद्र हे ‘छुमंतर’ या विनोदी …

Read More »

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; साकेत पुलाजवळ वाहतूक बदल!

ठाण्यातील साकेत पुलाजवळील वाहतुकीत बदल करण्यात आला असून येत्या ६ तारखेपासून हे बदल लागू होतील. मुंबई – नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे . यामुळे ठाणे वाहतूक शाखेने मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळील साकेत संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या अंतर्गत मार्गिका बंद करण्याचा निर्णय घेतला …

Read More »

विश्लेषण : क्रीडा क्षेत्राकडून रशियावर बहिष्कारास्त्र!कोणकोणत्या खेळांतून रशिया हद्दपार?

इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये रशियाची कोंडी किंवा विलगीकरण अधिक वेगाने सुरू आहे. सिद्धार्थ खांडेकर रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये रशियाची कोंडी किंवा विलगीकरण अधिक वेगाने सुरू आहेत. हे करत असताना युक्रेनला सर्वतोपरी पाठिंबाही दिला जातोय. फिफा, युएफा, ऑलिम्पिक समितीकडून काय कारवाई? – आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि युरोपिय फुटबॉल महासंघ (युएफा) यांनी रशियाच्या सर्व संघांवर …

Read More »

“पप्पा खूप काही खरेदी करू शकतात पण…”, कंगना रणौतने आलिया भट्टवर अप्रत्यक्ष टीका

पण नुकतंच कंगना रणौतने आलिया भट्टवर टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. पण नुकतंच कंगना रणौतने आलिया भट्टवर टीका केली आहे. कंगना रणौतने बहिण रंगोलीची एक पोस्ट शेअर करत आलियावर …

Read More »

Russia Ukraine War : युद्धभूमीत अडकलेल्या पत्नी व मुलासाठी लंडनच्या शिक्षकाने नोकरी सोडली अन् गाठलं युक्रेन!

प्रवासादरम्यान सोशल मीडियाद्वारे आपल्या वन मॅन मिशनचे वेळोवेळी दिले आहे अपडेट “माझी पत्नी आणि मुलगा युक्रेनमध्ये असताना मी इथे बसून राहू शकत नाही. युक्रेनचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता पुतीन यांच्यामुळे धोक्यात आली आहे.” अशी फेसबुकवर पोस्ट करत लंडनमधील इयान उमने नावाचा इंग्रजी विषयाचा एक शिक्षक नोकरीचा राजीनामा देऊन, स्वत:च्या कुटुंबाला वाचवण्यासाठी युद्धग्रस्त युक्रेनकडे रवाना झाला आहे. त्याने हे वन मॅन मिशन …

Read More »

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान का होतेय व्लादिमीर पुतिन यांच्या टेबलची चर्चा?

गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी क्रेमलिन येथे पुतिन यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीदरम्यान लोकांचे लक्ष ते ज्या टेबलावर बसले होते त्याकडे वेधले गेले. रशिया आणि युक्रेनदरम्यान अद्याप युद्ध सुरूच आहे. रशियाचे सैन्य सातत्याने पुढे येत असून ते युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ पोहचले आहे. दोन्ही देशांमधील तणाव संपवण्यासाठी अनेक देश मध्यस्थीसाठी पुढाकारही घेत आहेत. गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल …

Read More »

“…म्हणून आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

किरीट सोमय्यांबाबत न बोललेलंच बरं, असंही जयंत पाटील म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिसंवाद मेळावा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महापालिका निवडणुकीत आघाडी बाबत आधी उपमुख्यमंत्री आणि शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा करेन, त्यानंतर बोलेन, असं ते म्हणाले. यूक्रेनमध्ये अडकेल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, …

Read More »

“माझे अनेक बॉयफ्रेंड होते पण नागार्जुन…”, अभिनेत्री तब्बूचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून तब्बूला ओळखले जाते. तब्बूच्या अनेक चित्रपट आजही हिट आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिससोबतच चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. वयाची ५० ओलांडूनही तब्बू अद्याप अविवाहित आहे. तिने लग्न का केले नाही? याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. सिनेसृष्टीत एकेकाळी तब्बूच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. दाक्षिणात्य सुपरस्टार अक्कीनेनी नागार्जुन याच्यासोबत …

Read More »

“आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास….”; पुतिन यांचा जगभरातील देशांना पुन्हा इशारा

रशियाकडून युक्रेनवर हल्ला सातत्याने सुरू आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष कायम आहे. तर, ब्रिटन आणि अमेरिका या रशियाला या युद्धाच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांना इशारा दिला की, “रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास …

Read More »

“सुखरूप परत येईन याची खात्रीच नव्हती”, अलिबागच्या पूर्वानं सांगितला युक्रेनमधला थरारक अनुभव!

रशियानं हल्ला केल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून परतलेल्या पूर्वानं तिथला थरारक अनुभव सांगितला आहे. हर्षद कशाळकर “युक्रेनमधील युद्ध परिस्थिती भयावह आहे. घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे. या परिस्थितीत घरी सुखरूप परत येईन याची शाश्वतीच राहिली नव्हती. पाच दिवसांच्या खडतर प्रवासानंतर आज सुरक्षित घरी पोहोचले याहून समाधानाची बाब नाही”, अशा शब्दांत अलिबागच्या धेरंड येथील पूर्वा पाटील …

Read More »

Russia Ukraine war: …जेव्हा कुत्र्याचे पिल्लू युक्रेनच्या सैनिकांसाठी देते पहारा

या छोट्या गार्डच नाव रॅम्बो असं आहे. याचा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे. सर्व तणावाच्या परस्थितीत, युद्धाच्यामध्ये असा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे जो चांगलचं चर्चेत आला आहे. युक्रेनियन सैनिकांच्या दयाळूपणाने सर्वांचे मन जिंकले. मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, युक्रेनियन सैनिक थंडीत बाहेर एकट उभ्या असलेल्या एका पिल्लाला आतमध्ये घेतना, त्यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. हे …

Read More »

“ती मुलगी जर शरद पवारांपर्यंत पोहोचली, तर…”, पुणे बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया!

चित्रा वाघ म्हणतात, “ती मुलगी सगळ्यांकडे गेली, पण तिला शरद पवारांपर्यंत पोहोचू दिलं नाही”. दोन आठवड्यांपूर्वी समोर आलेल्या पुणे बलात्कार प्रकरणावरून सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळातलं वातावरण तापलं आहे. कारण या गुन्ह्यामध्ये शिवसेना नेते रघुनाथ कुचिक हे आरोपी आहेत. कुचिक यांच्याविरोधात १६ फेब्रुवारी रोजी २४ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि नंतर तिचा गर्भपात करवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर लागलीच त्यांना …

Read More »

प्रेरणादायक : खडतर परिस्थितीवर मात करत रूपाली शिंदे गाजवतेय कुस्तीचं मैदान ; गावातील यात्रांपासून राज्य पातळीपर्यंत मारली मजल!

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे धडपड हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गोंडाळा येथील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या रूपाली शिंदे या मुलीने आपल्या जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर कुस्ती सारख्या पुरुष प्रधान खेळातही नाव कमावलं आहे. ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील असलेल्या रूपाली शिंदे हिने वयाच्या दहाव्या वर्षी दंगल चित्रपट पाहून आणि त्यातून प्रेरणा घेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीपटू होण्याचे …

Read More »

“पावनखिंड चित्रपटगृहात जाऊन पाहणाऱ्या…”रितेश देशमुखनं केलं चित्रपटाचं कौतुक

रितेश देशमुखने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळे सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. या चित्रपटाचं कौतुक बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण …

Read More »

लहान मुलांचं आधार बनवण्यासाठी ही कागदपत्र पुरेशी, UIDAI ने जारी केली यादी

आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. मुलाला शाळेत प्रवेश देण्यापासून ते विविध सरकारी योजनांतर्गत लाभ मिळवण्यापर्यंत आधार कार्डची मागणी केली जाते. यावरून आधार कार्डचे महत्त्व किती आहे, याचा अंदाज येतो. मुलाकडे आधार नसेल, तर ठराविक वेळेत आधार बनवून घ्या, असे शाळेकडून सांगण्यात येतं. मुलांचं आधार कार्ड कसं तयार …

Read More »