“पावनखिंड चित्रपटगृहात जाऊन पाहणाऱ्या…”रितेश देशमुखनं केलं चित्रपटाचं कौतुक


रितेश देशमुखने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळे सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. या चित्रपटाचं कौतुक बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवरच्या कमाईबद्दल पोस्ट शेअर केली आहे. ते ट्वीट रिट्वीट करत रितेश म्हणाला, “हे अविश्वसनीय आहे!!! पावनखिंड टीमचे अभिनंदन! चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार”, असे ट्वीट रितेशने केले.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत

हेही वाचा :  'सामी सामी' गाण्याच्या 'या' मराठमोळ्या व्हर्जनने घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ! तुम्ही ऐकलत का? | the marathi version of the song sami sami from the movie pushpa girl is appreciated everywhere

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली आहे. तर अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …