ताज्या

राजकारण ही रेल्वेगाडी, अनेक चढतात-उतरतात! – गडकरी

गेल्या पाच वर्षांत जनतेने काम करण्याची संधी नगरसेवकाच्या माध्यमातून दिली हाच तुमच्यासाठी पुरस्कार असल्याचेही गडकरी म्हणाले. नागपूर : महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  राजकारण हे मुळातच रेल्वे गाडीसारखे आहे. त्यात अनेक चढतात आणि उतरतात. त्यामुळे प्रभागामध्ये ज्याच्यामागे जनता आहे त्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गेल्या पाच वर्षांत जनतेने काम करण्याची …

Read More »

आम आदमी पक्षाचे विकासकामांबाबत महापौरांना १५ प्रश्न ; महापौरांचा सत्कारही केला

नागपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण शुक्रवारी महापालिकेचा पाच  वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे आम आदमी पक्षाने महापौर दयाशंकर तिवारी यांना शहराच्या विकास कामासंबंधी पंधरा प्रश्न असलेले शुभेच्छा पत्र देत जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी मागणी केली. मात्र महापौरांनी हे शुभेच्छापत्ररूपी निवेदनच स्वीकारले नाही. यावेळी महापौरांचा सत्कारही करण्यात आला.  गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजपची सत्ता आणि केंद्रात …

Read More »

तोकडय़ा कपडय़ांमुळे युवतींना मारहाण ; पुण्यातील धक्कादायक प्रकार; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा

पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडे कपडे परिधान केल्यामुळे शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी  खराडी भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या तीन महिलांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत. अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण …

Read More »

ऊस अतिरिक्त ठरण्याची भीती वाढली ; उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले

औरंगाबाद : राज्यातील १८९ साखर कारखान्यांकडून ९५३ लाख ९४ हजार उसाचे गाळप झाले असले, तरी मराठवाडय़ातील बहुतांश उसाला आता तुरा आला आहे. जालना जिल्ह्यात ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता असून आता ऊस देयकांची रक्कम मिळू लागली असली, तरी मराठवाडा व खानदेशातील ५२ साखर कारखान्यांकडून गाळपातील २९५ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम देणे अद्यापि बाकी आहेत. उसाचे अमाप पीक आणि गाळपक्षमता याचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आगामी निवडणुकांबाबत संभ्रम

हिंगोली : इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) तूर्ततरी राजकीय आरक्षण लागू होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाविना निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली तर राज्य सरकार निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे. या सर्व घडामोडींमुळे हिंगोली जिल्ह्यातील तीन नगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला …

Read More »

रिद्धपुरात डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाची विटंबना

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले. त्यामुळे रिद्धपुरात तणाव निर्माण झाला होता. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना कळताच पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. याच दरम्यान काही गावकऱ्यांनी मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर असलेल्या बसस्थानकावर एकत्र येऊन टायर जाळून घटनेचा निषेध केला.  …

Read More »

सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजचा सोलापूरचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी एकत्र येऊन राज्यपालांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. स्वामी विवेकानंद केंद्राच्या जुळे सोलापुरातील नव्या वास्तूचे …

Read More »

वीजप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा भडका

कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा शुक्रवारी भडका उडाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती. विजेच्या विविध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या एका कोपऱ्यात आंदोलन सुरू असल्याची टीका …

Read More »

विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित

देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांचे मत पुणे : करोना काळात सर्वसामान्य नागरिकांना विदाचे (डेटा) महत्त्व कळले. रुग्णसंख्या, वाढणारी रुग्णसंख्या, लाटांचे अनुमान या विषयी नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली. विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित झाल्याचे मत, देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांनी शुक्रवारी मांडले. गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेतील लोकसंख्या संशोधन केंद्र, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब …

Read More »

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : पंतचा झटपट पंथ! ; भारताची ६ बाद ३५७ अशी शानदार मजल; विहारीचे अर्धशतक

मोहाली : विराट कोहलीच्या शतकी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऋषभ पंतच्या फटकेबाजीने छाप पाडली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ऋषभने काढलेल्या ९६ धावांच्या बळावर भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दिवशी ६ बाद ३५७ अशी शानदार मजल मारली. कोहलीचा १०० वा कसोटी सामना पाहण्यासाठी पाच हजार क्रिकेटरसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला होता. कोहलीने डावाला उत्तम सुरुवात केली. परंतु ४५ धावांवर तो बाद होताच …

Read More »

गव्हातील तेजी फायद्याची; पण खाद्यतेलात कोंडी ; रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

दत्ता जाधव, लोकसत्ता पुणे : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गहू आणि मक्याचे दर तेजीत आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकरी आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होणार आहे. मात्र, भारतात युक्रेन आणि रशियातून मोठय़ा प्रमाणावर सूर्यफूल तेल आयात होत असल्यामुळे खाद्यतेलाच्या बाबत कोंडी होणार आहे. आयात घटून सूर्यफूल तेलाच्या दरात वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गव्हाच्या उत्पादनात युक्रेन आणि रशिया हे …

Read More »

अनधिकृत कारखान्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गाला आगीचा धोका

विनापरवाना दुकानांत अग्नीसुरक्षेचे नियमही धाब्यावर, पालिकेकडून कारवाई नाहीच विरार : वसई विरारजवळील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणात भंगारची दुकाने, फ्रिज, एसी तयार करणारे कारखाने आहेत. अग्नीसुरक्षेचे कोणतेही नियम येथे पाळले जात नाहीत. त्यामुळे महामार्गाला आगीचा धोका निर्माण झाला आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई पूर्वेला महामागार्वर अतिक्रमण झाले आहे. त्यात प्रामुख्याने भंगारचे कारखाने आहेत. मागील वर्षभरापासून या परिसरात १०० हून अधिक …

Read More »

‘सेन्सेक्स’मध्ये ७६९ अंश घसरण

मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि रशिया-युक्रेनमधील तणावात दिवसेंदिवस अधिकच भर पडत असल्याने जगभरातील भांडवली बाजारांनी धसका घेतला आहे. परिणामी शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण कायम राहिली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १,२१४.९६ अंशांच्या घसरणीसह ५३,८८७.७२ अंशांचा तळ गाठला होता. मात्र उत्तरार्धात तो सावरत, दिवसअखेर ७६८.८७ अंशांच्या घसरणीसह ५४,३३३.८१ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर …

Read More »

मध्य रेल्वेवर रविवारी आठ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण दरम्यानच्या दोन्ही धीम्या मार्गावर येत्या रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम होईल. ठाणे येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकच्या वेळी दिवा ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर कल्याणहून ठाण्याच्या …

Read More »

“आठवणींसाठी धन्यवाद”; रणवीर सिंगपासून शिल्पा शेट्टीपर्यंत शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलीवूडने व्यक्त केला शोक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. शेनच्या व्यवस्थापन संघाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत तो कोह सामुई, थायलंड येथील त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध पडला असल्याचे सांगितले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही. शेनच्या मृत्यूच्या वृत्ताने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांना विश्वास …

Read More »

Russias attack on Ukraine : “बॉम्ब हल्ले होत असताना जिवंत परतण्याची शाश्वती नव्हती” ; वसईच्या ऐश्वर्याचा थरारक अनुभव

आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं, असंही सांगितलं आहे. “शहरात बॉम्ब हल्ले होत असताना आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. सुखरूप परतायची आशा नव्हती, पण सुदैवाने मी माझ्या घरी पोहोचली. अशा शब्दात युक्रेन मधून सुखरूप परतलेल्या वसईच्या ऐश्वर्या राठोड या तरुणीने युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितले. वसईच्या वसंत नगरी येथे राहणारी ऐश्वर्या राठोड …

Read More »

शेन वॉर्नसाठी भारत राहिला कायमच खास; पदार्पणापासून ते आयपीएलच्या पहिल्या जेतेपदापर्यंत

क्रिकेट चाहत्यांसाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आता या जगात नाही. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ वर्षीय वॉर्नचा थायलंडमधील कोह सामुई येथे मृत्यू झाला. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. १४५ कसोटी सामन्यात …

Read More »

‘झुंड’ निमित्त चित्रपटगृहाबाहेर लागले अमिताभ बच्चन सोबत नागराज मंजुळेचे भव्य कटआउट

हाताने रेखाटलेले हे भले मोठे कटआउट चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ झुंड ‘ चित्रपट सोलापुरात चित्रपटगृहात धुमधडाक्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सार्वत्रिक कौतुक होत असताना सोलापुरात ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्या चित्रपटगृहाबाहेर अमिताभ बच्चन यांच्यासह नागराज मंजुळे यांचे हाताने रेखाटलेले भले मोठे पोस्टर उभारण्यात आले आहे. …

Read More »

Blog : 90’s Kids… क्रिकेट… अन् शेन वॉर्न…

स्वप्निल घंगाळे शेन वॉर्नचं निधन झाल्याचं कळतंय… असा मेसेज ऑफिसच्या ग्रुपवर पाहिला आणि मोर्चा लगेच ट्विटरकडे वळवला तर बातमी खरी निघाली… खरं तर त्याला ना कधी भेटलो, ना त्याचे रेकॉर्ड तोंडपाठ आहेत ना मी ऑस्ट्रेलियन टीमचा चाहता आहे. पण त्याच्या निधनाच्या बातमीने इतर सेलिब्रिटी डेथच्या बातम्यांप्रमाणे पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झाली की आयुष्य फारच अनसर्टन आहे…. दुसरा त्याहून महत्वाची …

Read More »

Shane Warne Died : युक्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांवर शेन वॉर्नने दिली होती प्रतिक्रिया, म्हटले होते की…

जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह अनेकांनी शेन वॉर्नच्या निधानवर शोक व्यक्त केला आहे. जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे आज वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेट जगातीशी निगडीत असलेल्या तसेच अन्य क्षेत्रांमधील व्यक्तींनी देखील शेन वॉर्नच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेन वॉर्नने आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया- …

Read More »