सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने


सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजचा सोलापूरचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी एकत्र येऊन राज्यपालांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

स्वामी विवेकानंद केंद्राच्या जुळे सोलापुरातील नव्या वास्तूचे लोकार्पण करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांचा दौरा ठरला होता. परंतु औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन हाती घेतले आहे. सोलापुरातही त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीसह इतर शिवप्रेमी संघटना एकवटल्या होत्या. राज्यपाल जोपर्यंत रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना सोलापूरसह राज्यात कोठेही फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता.

राज्यपालांच्या विरोधात आंदोलनासाठी होटगी रोड विमानतळाबाहेर व इतरत्र हजारो कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे नियोजन आखण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. विमानतळापासून ते आसरा चौक व जुळे सोलापुरात पोलिसांच्या बंदोबस्ताला छावणीचे स्वरूप आले होते. दुसरीकडे आसरा चौकात एका रस्त्यावर महाविकास आघाडीसह अन्य संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे घेऊन राज्यपालांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. राज्यपाल कोश्यारी यांचा ताफा तेथून पुढे जात असताना त्यांच्यासमोर निदर्शने करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर पद्माकर काळे, काँग्रेसचे पालिका गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, दास शेळके, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, आदींचा या आंदोलनात सहभाग होता. निदर्शने झाल्यानंतर शेवटी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

हेही वाचा :  'पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का'; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं

दरम्यान, जुळे सोलापुरातून सुमारे २० किलोमीटर अंतरावर पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमासाठी जाताना राज्यपाल कोश्यारी यांना हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. मात्र त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला आंदोलनास सामोरे जावे लागले. डेमाक्रेटिक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष सोहम लोंढे व पृथ्वीराज मोरे आदींनी पुणे रस्त्यावर निदर्शने केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

The post सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …