ताज्या

काळे झेंडे दाखवत ‘स्वभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रोखला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा वाहन ताफा!

राजू शेट्टींच्या आंदोलनाकडे महाविकास आघाडी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप कृषी पंपास दिवसा १० तास वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करत असलेल्या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप करत गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना आज(रविवार) हातकंणगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी काळे झेंडे दाखवत व त्यांचा …

Read More »

नालासोपाऱ्यातही नंदी दूध पित असल्याची अफवा; मंदिराबाहेर नागरिकांची मोठी गर्दी

मंदिरात नंदी दूध पित असल्याचे लोन समाजमाध्यमावर पसरल्याने नालासोपारा परिसरात अचानक नागरिकांनी नंदीला दूध पाजण्यासाठी मंदिरात एकच गर्दी केली. काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीने गणपती दूध पित असल्याची घटना समोर आली होती. २१ सप्टेंबर १९९५ रोजी गणपती दूध पित असल्याची बातमी देशभर नव्हे तर देशाबाहेर ही पोहचली होती. असाच प्रकार रविवारी नालासोपारऱ्यातही समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील गुरु गोविंद सिंग शाळेच्या …

Read More »

“… अरे त्या ‘ईडी’ पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त” ; धनंजय मुंडेंचं विधान!

“भाजपाचा अंगातला आणखीही माज गेलेला नाही”, असंही म्हणाले आहेत. ; शरद पवारांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात बोलत होते. उस्मानाबाद तालुक्यातील आकुबाई पाडूळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या जिल्हा परिषद गटातील विवीध विकासकामांचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी यावेळी ईडीच्या …

Read More »

स्वभिमानीचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना काळे झेंडे; उर्जा मंत्र्यांना बैठकीचे पत्र

शेतीपंपास दिवसा १० तास वीज द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी करत असलेल्या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत पालकमंत्री सतेज पाटील यांना हातकंणगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी रविवारी काळे झेंडे दाखवित निदर्शन केली. कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयावर विजेच्या विविध या मागणीसाठी शेट्टी २२ फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन करीत आहेत. जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर, चक्का जाम, …

Read More »

विश्लेषण : झेलेन्स्कींना युद्धात पाठिंबा देणाऱ्या युक्रेनच्या फर्स्ट लेडी कोण आहेत; जाणून घ्या

रशियाने आक्रमक हल्ले सुरूच ठेवले असताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि त्यांची पत्नी ओलेना झेलेन्स्का खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. युक्रेनमधील लोकांना त्या केवळ पाठिंबाच देत नाही तर टेलीग्राम चॅनलद्वारे युद्धग्रस्त भागातील लोकांना मदत करण्याचे काम करत आहेत. ओलेना या राजकारणात सक्रिय नाहीत. त्या व्यवसायाने आर्किटेक्ट आणि पटकथा लेखक आहे. ओलेना या क्रिवी रिह नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्टच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी …

Read More »

राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजित पवारांनी केलं – अमोल कोल्हे

“हे गरजेचे होते व ते फक्त अजित पवारच करू शकतात!” असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसोबतच इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं. यावेळी पुण्यात एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भाषणं झाली. यावेळी बोलतान अजित पवार यांनी नव्याने उद्घाटन झालेल्या प्रकल्पांविषयी समाधान …

Read More »

जेव्हा श्रीदेवी यांनीच मुलगी जान्हवी कपूरला सर्वांसमोर केलं होतं ट्रोल, वाचा नेमकं काय घडलं

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला एकदा तिच्या आईनेच सर्वांसमोर ट्रोल केलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज २५ वा वाढदिवस. जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवीनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आजही अनेकदा श्रीदेवी आणि जान्हवी यांच्यात तुलना होताना दिसते. जान्हवी तिच्या आईसारखी दिसते असं नेहमीच बोललं जातं. अनेकदा जान्हवी देखील आईच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना, फडणवीस म्हणतात असे….

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्यावतीने (Pimpri Chinchwad Municipal Corporation)  करण्यात आलेल्या विविध विकासकामांचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पण पिंपरी शहरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आक्रमक कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. देवेंद्र फडणवीस पूर्णा नगर इथं अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनाला आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर …

Read More »

IPL 2022 चं बिगुल वाजलं ; CSK विरुद्ध KKR यांच्यातील सामन्याने होणार १५ व्या हंगामाची सुरुवात

२६ मार्च ते २९ मे दरम्यान मुंबई आणि पुण्यात ७० लीग सामने खेळवले जाणार बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२२ चे सर्व लीग सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जातील. ६५ दिवसांच्या कालावधीत एकूण ७० लीग सामने आणि ४ प्लेऑफ सामने खेळवले जातील. वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी चेन्नई सुपर …

Read More »

IND Vs SL 1st Test Match: श्रीलंकेला धूळ चारली ! पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा एक डाव २२२ धावांनी विजय

मोहाली येथे झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी समना अनेक अंगांनी चर्चेचा विषय ठऱला. भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयासाठी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठे योगदान दिले. १७५ धावा करुन त्याने भारताचा धावफलक ५७४ पर्यंत नेऊन ठेवला. तसेच गोलंदाजीमध्येही त्याने ९ बळी घेऊन भारतासाठी विजय आणखी सोपा केला. भारताने या विजयासह श्रीलंकेविरोधात १-० …

Read More »

VIDEO : पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल

पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. या कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी तणाव निर्माण झाल्यानंतरे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला होता. याआधी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते …

Read More »

“राजकीय वातावरण बदलेल तेव्हाच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न मार्गी लागेल”

ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ यांचं विधान महाराष्ट्राच राजकीय वातावरण बदलेल तेव्हाच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉ. सुधीर रसाळ यांनी आज येथे सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात काही राजकारण आहे की काय? अशी मला शंका, असे ते म्हणाले.तसेच, नंदी दूध पितो यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, श्रद्धा ठेवण म्हणजे अंधश्रद्धेचा भाग आहे, परमेश्वरांवर …

Read More »

PM मोदींनी या गोष्टीला दिले ‘ऑपरेशन गंगा’च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले

पुणे : युक्रेन आणि रशिया (Ukraine-Russia War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. मोदी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ असे याला नाव दिले आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन गंगा’च्या (Operation Ganga) यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. (PM modi in Pune) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका …

Read More »

‘सर तुम्ही मराठी खूप छान बोलता’; त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांना म्हणाले…

गरवारे शाळा आणि महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मेट्रोत प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. त्यावेळी त्यांनी स्वतः ई तिकीट काढून मेट्रोत प्रवास देखील केला. यावेळी पुण्यातील सौ. विमला बाई गरवारे शाळा आणि महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. या प्रवासाबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला …

Read More »

“रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास?”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी तिकीट काढून मुलांसोबत मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांनी काही शाळकरी मुलांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींना बघून आणि त्यांच्याशी बोलताना मुलांना खूप आनंद झाला. प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधील काही विद्यार्थ्यांनी तसेच शालेय गणवेश घालतेल्या मुलांशीही संवाद साधला. मेट्रोच्या प्रवासात मोदींनी सोबत असलेल्या …

Read More »

“..तर राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस्स झाला”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान!

पुणे मेट्रोच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे” महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये राज्यात सत्तापालट झाल्यापासून सुंदोपसुंदी सुरूच आहे. राज्य सरकारचे अनेक प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळून लावले आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वादा उभा राहिला …

Read More »

हटके फॅशनच्या नादात करीना कपूर झाली ट्रोल, युजर्स म्हणाले…

आपल्या स्टाइलमुळे करीना कपूर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. फॅशनच्या बाबतीत तर करीना बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वात पुढे असते. अगदी तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळीही तिच्या फॅशनची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. मात्र काही वेळा तिला तिच्या हटके फॅशनसाठी ट्रोलही व्हावं लागलं आहे. आताही असंच …

Read More »

अश्विनने मोडला कपिल देव यांचा खास विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज

अश्विनने चरिथ असलंकाला विराट कोहलीकरवी झेलबाद करून ही कामगिरी केली. मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कपिल देवचा विक्रम मोडला. अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. कपिल देव यांचा विक्रम मोडून त्याने हा पराक्रम केला. अश्विनने चरिथ असलंकाला विराट कोहलीकरवी झेलबाद करून ही कामगिरी …

Read More »

“आणि काय गं?” फॅन्सी ड्रेस स्पर्धेतला चिमुकल्याचा Video Viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत १.५ दशलक्ष लोकांनी हा व्हिडीओ बघितला. प्रत्येकाच्या लहानपणात एकदा तरी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा अनुभव घेतलाच असेल. आई बाबा किंवा मोठे भाऊ बहिणीने आपल्याला यासाठी तयार केलं असेलच. हा स्पर्धेत फक्त कपडे घालून तयार न होता ज्या पात्राचे आपण कपडे घातले आहेत त्याबद्दल काही तरी बोलूनही दाखवावं लागत. स्टेजवर ते फॅन्सी ड्रेस …

Read More »

VIDEO : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत ओवेसींनी केलं भाकीत म्हणाले, “७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चला सकाळी…”

“…आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं?” असंही ओवेसींनी बोलून दाखवलं. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल येण्यापूर्वीच मोठा दावा केला आहे. ७ मार्च किंवा १० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सरकार या मागे युक्रेन-रशिया युद्धाचं कारण पुढे करणार आहे. कारण त्यांचे लोक तर …

Read More »