ताज्या

कंगना रणौतने शेअर केला धोनी आणि कोहलीसोबतचा ‘तो’ फोटो, म्हणाली “मी यापुढे….”

कंगना ही सध्या ‘लॉक अप’ या शोमध्ये काम करत आहे. कंगना रणौतला सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी आलेल्या कंगना रणौतला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तिच्या या खडतर प्रवासाला ‘क्वीन’ चित्रपटाच्या रुपाने यशाचा मार्ग गवसला. ७ मार्च २०१४ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘क्वीन’ हा चित्रपट तिच्या करिअरमधील महत्त्वाचा …

Read More »

अॅपआधारित विनापरवाना सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांची कोर्टाकडून दखल; परवान्यासाठी अर्ज करण्याची सूचना

महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असलेला शहरात वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अ‍ॅप आधारित सगळ्या टॅक्सी कंपन्या परवान्याशिवाय चालवल्या जात असल्याने उच्च न्यायालयाकडून याबाबत विचारणा करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत कॅब एग्रीगेटर्सना १६ मार्च पर्यंत राज्य सरकारसमोर मोटर वाहन कायद्यांतर्गत त्यांच्या टॅक्सी […] (प्रातिनिधीक छायाचित्र) महाराष्ट्र सिटी …

Read More »

वाईन शॉप मालकाला बंदुकीचा धाक दाखवून, पाच लाख रुपये लुटले ; डोंबिवली जवळील सोनारपाडा येथील प्रकार

मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील सोनारपाडा येथे एका वाईन शॉप मालकाच्या अंगावर मिरचीपूड फेकून आणि नंतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या जवळील ५ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, दोघांनी लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, किशोरकुमार काररा हे गोळवली …

Read More »

कथित गर्लफ्रेंड सबा अझादच्या व्हिडीओवर हृतिक रोशनची कमेंट चर्चेत, म्हणाला…

हृतिक रोशननं कथित गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर केलेली कमेंट सध्या बरीच चर्चेत आहे. अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून असं काही ना काही करताना दिसत आहे. ज्यामुळे त्याच्या आणि सबा आझादच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण येतं. कधी दोघंही लंच किंवा डिनरला जाताना दिसतात तर कधी एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. याशिवाय दोघंही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटो किंवा व्हिडीओवर कमेंट करताना …

Read More »

विश्लेषण : जगनमोहन रेड्डींना हव्या तीन राजधान्या; हायकोर्ट म्हणते एक पुरे! काय आहे हा वाद?

संतोष प्रधान आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर हैदराबाद शहर हे तेलंगणाच्या ताब्यात राहील अशी तरतूद विभाजन प्रक्रियेत करण्यात आली. दहा वर्षांपर्यंत हैदराबाद हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या राजधानीचे संयुक्त शहर असेल. या काळात आंध्रने स्वतःची राजधानी विकसित करावी ही अपेक्षा होती. विभाजनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती हे राजधानीचे शहर असेल असे जाहीर केले. अमरावतीच्या भूसंपादनाकरिता विशेष …

Read More »

सरकार अनेक सूरज जाधव तयार करतंय, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Maharashtra Budget Session :  राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. ‘पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही’, असं म्हणत सोलापूरातल्या एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. सोलापूरातल्या मगरवाडी इथं सुरज जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने चार मार्चला फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा मुद्दा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

तैमूरने वडील सैफ अली खानवर उचलला हात, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अमीर बाप की…”

तैमूर आणि सैफ अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा लाडका लेक तैमूर हा लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. तैमूरची लोकप्रियता कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाही. तैमूरचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तैमूरचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने …

Read More »

“लतादीदींचा आशीर्वाद म्हणून मी हे कायम जपणार…”; हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या निमित्ताने हेमांगी धुमाळ हिने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगी कवी हिने फेसबुकवर भारतरत्न …

Read More »

अशा लोकांशी कधीच शत्रुत्व करू नका, अन्यथा…, काय सांगते चाणक्यनीति वाचा

आचार्य चाणक्य एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार होते. त्यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रात संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा सखोल उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो त्याची प्रगती होते, असे मानले जाते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात काही लोकांचा उल्लेख केला आहे, त्यांच्याशी …

Read More »

वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेंग्नेंट असताना मंदिरा बेदीची झाली होती ‘अशी’ अवस्था

प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर एकच प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे, आम्हाला गूड न्युज कधी मिळणार. असेच काही तरी बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मंदिरा बेदी सोबत घडली होती. मंदिराने वयाच्या ३८ व्या वर्षी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मंदिराने प्रेग्नेंसी आणि नैराश्यवर वक्तव्य केले आहे. मंदिरा वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेग्नेंट होती. पिंकव्हिलाला दिलेल्या …

Read More »

Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अनेकजण धडपडत असतानाच येथील एका भारतीयाने मात्र एक अजब तर्क देत भारतात न परतण्याचा निर्णय घेतलाय. या भारतीयाने पाळलेला एक बिबट्या आणि ब्लॅक पँथर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सोडून भारतात परतण्यास नकार दिलाय. तो सध्या डोनबास शहरामधील त्याच्या घराखालील बंकरमध्ये या पाळीव प्राण्यांसाहीत जीव मुठीत घेऊन राहतोय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स […] युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून …

Read More »

टाकी आजच फूल करा; पेट्रोल- डिझेल १५ ते २० रुपयांनी महाग होऊ शकतं

रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम कच्चा तेलाच्या किमतींवर होत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम कच्चा तेलाच्या किमतींवर होत आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन होण्याची शक्यता आहे. यामुळे इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल १५ ते २२ …

Read More »

“एक स्वप्न आहे, जे माझ्या मनात…” ६७व्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी व्यक्त केली ‘ती’ इच्छा

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. आजवर अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. आज अनुपम खेर यांचा ६७वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनुपम खेर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते अगदी फिट दिसत आहेत. अनुपम खेर यांनी आपल्या …

Read More »

“शरद पवारांचं भाषण ऐकून अवाक, थोरल्यापणाची मानाची अपेक्षा अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी”

“बहुजन हितचिंतक देवेंद्र फडवणीस शरद पवारांच्या नजरेत खुपतात” पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यात आले होते. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना शरद पवार यांनी या मुद्द्यावरून खोचक शब्दांत निशाणा साधत काम झालेलं नसतानाही पुणे मेट्रोचं उद्घाटन होत असल्याची टीका केली होती. तसंच उस्मानाबादमध्ये बोलताना राज्यपालांच्या विधानांचा पुन्हा एकदा समाचार घेतला. दरम्यान पवारांच्या टीकेवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर …

Read More »

विश्लेषण : आपत्कालीन व्यवस्थापनात रुग्णालये किती सिद्ध? दिरंगाई का?

प्रसाद रावकर जगभरातील मोठ्या शहरांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळविणाऱ्या मुंबईतील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. केवळ महाराष्ट्राच्या गाव-खेड्यातूनच नव्हे तर परराज्यांतील रुग्णही मुंबईत येतात. त्यामुळे मुंबईतील सरकारी, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कायमच रुग्ण आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी असते. खासगी रुग्णालयांमध्येही काही अंशी तशीच स्थिती असते. डॉक्टर, परिचारिका, अन्य रुग्णालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय ऐरणीवर आला आहे. …

Read More »

गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “फालतू लोक….”

यांची बुद्धी तपासून पाहिली पाहिजे, फडणवीसांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. यावेळी पोलिसांना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जदेखील केला. नेमकं काय झालं? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी …

Read More »

“हिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग…”; नितेश राणेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान

जागोजागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमात हाती घेऊ, नितेश राणेंचा इशारा पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जदेखील केला. भाजपा …

Read More »

‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?;’ संतापलेल्या इम्रान खान यांचा भर सभेत सवाल

युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी पाकिस्तानला पत्र पाठवलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादस्थित पाश्चात्य दूतांवर संतापल्याची बातमी समोर आल आहे. या दूतांनी इम्रान खान यांना गेल्या आठवड्यात युक्रेनमधील रशियाच्या कृतींचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला आग्रह केला होता. यावर संतापलेल्या इम्रान खान यांनी ‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?,’ असा सवाल केला आहे. युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह …

Read More »

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारतीय महिला त्रिकुटाची सुवर्णकमाई

कैरो (इजिप्त) : राही सरनोबत, इशा सिंग आणि रिदम सांगवान या भारतीय त्रिकुटाने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक ठरले. रविवारी सुवर्णपदकाच्या लढतीत भारताच्या त्रिकुटाने सिंगापूरवर १७-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या लढतीच्या पहिल्या टप्प्यात भारताने १५ पैकी सहा वेळा अचूक वेध साधताना २-० अशी आघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर …

Read More »

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : तीन हंगामांनंतर मुंबई उपांत्यपूर्व फेरीत

अहमदाबाद : शाम्स मुलानीच्या (५/६४) प्रभावी फिरकीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह मुंबईने ड-गटात सर्वाधिक १६ गुणांसह अग्रस्थान पटकावतानाच तीन हंगामांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठली. मुंबईच्या पहिल्या डावातील २४८ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ओडिशाने ५ बाद ८४ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. परंतु मुलानी आणि तनुष कोटियन (३/३१) या …

Read More »