ताज्या

Petrol-Diesel Prices: निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंधनदरवाढ; पाहा आजचे दर

उत्तर प्रदेशसहीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. विशेष करुन उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या शहरांमधील इंधनाचे दर निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील बऱ्याच काळापासून या शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर होते. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा, लखनऊबरोबरच बिहारची राजधानी पटना आणि हरियाणामधील गुरुग्राम …

Read More »

Women’s Day 2022: प्रत्येक भारतीय महिलेला माहिती असायलाच हवेत ‘हे’ सहा कायदे…

कुटुंब न्यायालय तसंच उच्च न्यायालयात महिलांशी संबंधित अनेक खटले यशस्वीपणे लढणाऱ्या ख्यातनाम वकिल अ‍ॅडव्हकेट इशिका तोलानी यांनी अशा सहा प्रमुख कायद्यांची माहिती दिली आहे. भारतीय संविधानाने व संसदेने देशातील प्रत्येक महिलांना सबल आणि सशक्त बनवण्यासाठी काही कायदे बनवलेले आहेत. दुर्दैवाने, या कायद्यांची माहिती प्रत्येक महिलेला असतेच असे नाही. कुटुंब न्यायालय तसंच उच्च न्यायालयात महिलांशी संबंधित अनेक खटले यशस्वीपणे लढणाऱ्या ख्यातनाम …

Read More »

अग्रलेख : तेलाच्या पलीकडले..

केवळ इंधनतेलांचे दर नव्हे; तर गहू, मका, खाद्यतेले, खते यांचेही दर युक्रेनयुद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढू शकतात. इथे स्पर्धा असेल जगभरच्या वाढत्या मागणीशी.. निवडणुका आणि इंधन दर यांतील परस्परसंबंध अलीकडे शालेय स्तरावरील विद्यार्थीही उलगडून दाखवतील इतका तो विषय आपल्या सवयीचा भाग झाला आहे. यावर भाष्य करण्यासाठी त्यामुळे आता तज्ज्ञ, अभ्यासक वगैरे असण्याचीही गरज नाही. त्यामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे गुऱ्हाळ एकदाचे संपल्यानंतर …

Read More »

सार्वजनिक विश्वस्त संस्थांवर नवे निर्बंध

उदय म. कर्वे [email protected] आपापली नोकरी/व्यवसाय सांभाळून, सेवावृत्तीने काम करणारे कार्यकर्ते अनेक सार्वजनिक संस्था चालवत असतात. यापैकी बऱ्याच लहान संस्थांकडे कायदेविषयक पूर्तता करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही नसते. त्यांचे नियंत्रण करताना तारतम्यही हवे. राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी निगडित पूर्तता कराव्या लागणाऱ्या या संस्था, आता केंद्राच्या आयकर खात्यालाही अधिकाधिकबाबतीत वारंवार उत्तरदायी ठरणार आहेत. दरवर्षी नवनव्या केंद्रीय नियमांचाही सामना करावा लागतो आहे.. आपल्या देशात …

Read More »

अन्वयार्थ : नैतिकतेच्या मक्त्याचे ओझे..

‘ती’ची बुद्धिमत्ता सर्वमान्य आणि स्वीकारार्ह आहे. पण ‘ती’ला मानमरातब, सत्तापद, अधिकारवाणी, स्वावलंबनाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा नाके मुरडली जातात. घरासाठी ‘ती’ जे राबते (विना-मोबदला) त्याचे कौतुक नसतेच. मात्र दफ्तरातील तिचे कर्तव्यदक्ष अधिकारपद हे वैरिणीसारखे सलते. बऱ्याचदा ‘ती’ नावडती आणि नकोशी ठरण्यामागची कारणे ही आणि हीच असतात. दूरचे कशाला, अगदी अलीकडे येऊन गेलेल्या बातम्या पाहा. बातमीच्या केंद्रस्थानी असणारी ‘ती’ बळी ठरलेली …

Read More »

विश्लेषण : देशावर खतटंचाईचे सावट

दत्ता जाधव [email protected] रासायनिक खतांच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नाही. निर्मितीमध्येही भारताचा वाटा अतिशय नगण्य म्हणावा असा आहे. त्यामुळे रासायनिक खते आणि खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी बेलारूस, रशिया, युक्रेन, चीन, हॉलंड, इस्रायल आदी देशांतून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. देशाला एका वर्षांत सुमारे ५०० लाख टन खतांची गरज असते. तर राज्याला खरीप आणि रब्बी हंगामात मिळून ४० लाख टन …

Read More »

पहिली बाजू : कठीण समय येता..

अनिल बलुनी (राज्यसभा सदस्य, भाजपच्या माध्यम शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच भारतीयांच्या सुरक्षेचा आणि सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करतात, म्हणूनच आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने प्रतिसाद देतात. युक्रेनहून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका, हेही याच कौशल्य आणि सक्षमतेचे उदाहरण.. रशिया- युक्रेनमधील युद्धामुळे, त्या युद्धग्रस्त प्रदेशात अडकलेल्या काही हजार भारतीयांना सुखरूप परत आणण्याचा प्रश्न भारतापुढे उभा राहिला. यापैकी अनेक भारतीय हे युक्रेनमध्ये शिकणारे …

Read More »

लोकमानस : ‘नदी उत्सव’ ठीक, पण पूररेषा का बदलता?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील मेट्रो लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ‘वर्षांतून एकदा नदी उत्सवाचे आवाहन’ (लोकसत्ता – ७ मार्च ) पुणेकरांना केले आहे. मध्यंतरी ‘विश्व नदी दिन परंपरेशी सुसंगत’ असल्याचे सांगत मोदींनी नद्यांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले होते. मोदींचे नदीप्रेम सर्वश्रुत आहेच. मोदी सरकारने ‘नद्यांना व्यक्तिमत्त्व’ असल्याचा कायदा आपल्या पहिल्याच सत्ताग्रहण काळात केला. पण, त्यानुसार सरकारची कृती मात्र शून्य आहे. मागील पाच …

Read More »

भाषासूत्र : ‘म्हाताऱ्या हरण्या’ आणि ‘म्हाताऱ्याला बाळसे’

– डॉ. माधवी वैद्य [email protected] घरात नातीचा साखरपुडा म्हणून आजींची गडबड सुरू झाली होती. ते पाहून आजोबा त्यांना म्हणाले, ‘‘अहो आजीबाई ! अहो कसली धावपळ चालली आहे तुमची पहाटेपासून? संध्याकाळी आहे ना साखरपुडा? ’’ त्यावर आजीबाई म्हणाल्या, ‘‘अहो! घरात आपल्या कार्य आहे आणि सूनबाई, लेकीबाळी बघाना! कुणालाच त्याचे काही नाहीच मुळी! चटाचटा उठतील, कामाला लागतील.. तर ते सोडाच, लोळत पडल्यात …

Read More »

साम्ययोग : स्त्रीशक्ती आणि गीता

अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com गीता आणि स्त्रिया, असे म्हटले की बरेचदा आक्षेपांची एक यादी समोर येते. सोबत युद्ध, वैश्य, शूद्र, चातुर्वण्र्य, यासारख्या शब्दांचाही उल्लेख होतो. गीता हा हिंसेचा, विषमतेचा पुरस्कार करणारा ग्रंथ आहे, अशीही टिप्पणी केली जाते. गीतेत स्थितप्रज्ञ आहे. योगी आहे. भक्त आहे. हे सगळे ‘पुरुष’( पुल्लिंगी या अर्थाने ) आहेत. गीतेत स्त्रियांना काही स्थान आहे की नाही? विनोबांना …

Read More »

कुतूहल : निर्देशक जीवाश्म

प्राणी वा वनस्पती मृत झाल्यावर काही वेळेस जमा होत जाणाऱ्या अवसादात गाडले जातात. अनुकूल परिस्थिती मिळाल्यास या मृतावशेषांचे जतन होते. खडकात जतन झालेले अतिप्राचीन कालखंडातले सजीवांचे अवशेष म्हणजे जीवाश्म. खडकांमध्ये सापडणारे ‘इंडेक्स फॉसिल्स’ म्हणजेच ‘निर्देशक जीवाश्म’ हे विशिष्ट प्रकारचे पर्यावरण तसेच विशिष्ट भूशास्त्रीय कालखंड अधोरेखित करतात. भूशास्त्रीय कालमापनात हे निर्देशक जीवाश्म महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध भूशास्त्रीय कालखंडांच्या मर्यादा या निर्देशक …

Read More »

महिलांवरील अत्याचाराविरोधातील शक्ती कायद्यात दुरुस्ती ; गुन्हा नोंदविण्याबाबतची संदिग्धता दूर

मुंबई : महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती कायद्यात विधिमंडळाच्या संयुक्त समितीने सुचवलेल्या सुधारणांचा अहवाल सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. त्यामुळे महिला अत्याचारांच्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकिलांची संख्या वाढणार असून, गुन्हा नोंदवण्याबाबतची संदिग्धता संपेल़  त्यामुळे शक्ती कायदा अधिक प्रभावी होणार आहे. सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. ५२ महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित …

Read More »

महिलांविरोधातील गुन्ह्यांत शिक्षेचे प्रमाण १५.३ टक्के ; न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये सुविधा नसल्याने हजारो प्रकरणांत तपास रखडला

मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण १५.३ टक्के इतके असून सुमारे दोन लाख २९ हजार खटले विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. तर न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये अपुरे मनुष्यबळ, सामग्री व अन्य कमतरता आहेत. त्यामुळे बालकांवरील अत्याचारांसंबंधी (पोक्सो कायदा) १६१९ तर महिलांविषयक गुन्ह्यांबाबतची १०५२ प्रकरणे डीएनए चाचण्यांसाठी प्रलंबित असल्याची माहिती  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. …

Read More »

सफाळे उड्डाणपुलावरील वाहतूक सुरूच राहणार

पर्यायी उपाययोजना करण्यासाठी समन्वय साधणार पालघर : सफाळे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक बंद होणार नसून पर्यायी उपाययोजना करण्यासाठी समन्वय साधला जात आहे. यासाठी उड्डाणपुलाच्या आजूबाजूने पर्यायी जागेचा वापर करून याच भागातून वाहतूक सुरू ठेवण्याची सूचना प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर यांनी रेल्वे व स्थानिक पोलीस प्रशासनाला केली आहे. सफाळे कपासे महामार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आगरवाडी दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध त्यासाठी खांब उभारणे …

Read More »

पालिका निवडणुकीबाबत संभ्रम कायम

दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रशासनाने सर्व तयारी केली असताना सोमवारी निवडणुका जाहीर करण्याचे व प्रभाग रचना तसेच आरक्षणाचे अधिकार सरकारकडे देणारे विधेयक एकमताने मंजूर झाल्याने नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र याच वेळी या विधेयकावर राज्यपालांची मोहर उमटण्याअगोदर राज्य निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा वापर …

Read More »

महिला पोलिसांना आठ तासच काम

पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा आदेश मुंबई : महिला दिनानिमित्त नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील महिला पोलिसांना अनोखी भेट दिली आहे. पांडे यांनी मुंबईतील महिला पोलिसांना आठ तासच काम देण्याचे कार्यालयीन आदेश दिले आहेत. कुटुंब आणि कर्तव्य अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला पोलिसांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. विशेष म्हणजे पांडे राज्याचे पोलीस …

Read More »

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश कागदावरच ; प्रस्तावच नसल्याचे उघड

पुणे : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळाच्या पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करूनही मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याबाबत प्रस्तावच सादर झाला नसल्याचे उघड झाले आहे. राज्यात २०२०-२१ पासून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. मराठी न शिकवणाऱ्या …

Read More »

उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा, अन्यत्रही पावसाची शक्यता

पुणे : मध्य भारतामध्ये वाऱ्यांचा संगम होण्याची स्थिती निर्माण झाल्याने उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ मार्चला गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची इशाराही कायम ठेवण्यात आला आहे. उत्तर भारत आणि हिमालयीन विभागामध्ये पश्चिमेकडून बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे हिमालयीन विभागात बर्फवृष्टी सुरू असून, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, चंडिगड, राजस्थान …

Read More »

धक्कादायक : पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून मित्रावर पेट्रोल ओतून पेटवले.

पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरातील दोन मित्रांमध्ये  दारू पिताना वाद झाला. त्यातून एकाने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून, त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली.या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली. सुरज विजय मरळ (वय 28, रा. जीवनधारा सोसायटी, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाच नाव आहे. गोविंदा उर्फ सत्येंद्र यादव (रा. गुजरवाडी, कात्रज) या आरोपीला अटक करण्यात …

Read More »

‘लोकसत्ता तरुण तेजांकित : ग्रामविकासाचा ध्यास

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा.. समर्थ कारभारी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ताई पवार या खालापूर तालुक्यातील मोहपाडा गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी इथपर्यंत वाटचाल केली …

Read More »