सौर वादळ आले तर जीव वाचवण्यासाठी हातात असतील फक्त 25 मिनीट; NASA ने दिली भितीदायक वॉर्निंग

Solar Storm 2023 : पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य. याच सूर्याच्या पृष्ठभागावर मोठं वादळ निर्माण झालंय. या वादळामुळे पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आले आहे. या सौरवादळाच्या रुपाने एक महाभयंकर विनाशकारी संकट पृथ्वीच्या दिशेनं झेपावत आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी याबाबतचा धोक्याचा इशारा दिला. सौर वादळ पृथ्वीवर धडकल्यास मोठा विध्वंस होऊ शकतो. सौर वादळ आले तर जीव वाचवण्यासाठी हातात फक्त 25 मिनीट असतील. NASA ही भितीदायक वॉर्निंग दिली आहे.

तळपत्या सूर्याचा मोठा तुकडा तुटला

सौरमंडळात एक धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. तळपत्या सूर्याचे मोठा तुकडा तुटला होता. या तुटलेल्या तुकड्यामुळे एक मोठी सौरज्वाळा तयार झाली. ही सौरज्वाळा प्रचंड वादळी वेगानं सूर्याभोवतीच फिरतेय. या विध्वंसक सौरज्वाळेमुळे पृथ्वीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपमध्ये ही खगोलीय घटना रेकॉर्ड झाली होती.

सौर वादळाचे परिणाम काय

या वादळाचा विमानाची यंत्रणा, रेडिओ सिग्नल, कम्युनिकेशनची माध्यमं जसेची फोन नेटवर्क, कृत्रिम उपग्रह आणि पाऊस या घटकांवर विपरित परिणाम होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :  Video : स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि...

2025 वर्ष धोक्याचे

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षांच्या सौर चक्रादरम्यान सामान्यपणे सूर्याच्या 55 डिग्री अक्षांशाजवळ असामान्य गोष्टी घडल्याचं पहायला मिळतं आहेत.  2020 पासून ‘सोलर 2025’ नावाची नवी सायकल सुरु झाली आहे. 11 वर्षाच्या कालावधीच्या या सौरचक्रात 2025 वर्ष अत्यंत धोक्याचे असणार आहे. सूर्याच्या आंतरिक भागात होणाऱ्या चुंबकीय बदलांमुळे पृष्ठभागावर होणाऱ्या स्फोटांमुळे सौरवादळ तयार होते. याचा परिणाम पृथ्वीर देखील होतो. 1989 मध्ये कॅनडा क्युबेक शहरात सौरवादळ आले होते. त्यावेळेस येथे 12 तासांसाठी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. 

सौरवादळाचा सामना करण्यासाठी तयारी

सौरवादळ पृथ्वीवर धजकल्याय त्याची तयारी करण्यासाठी एक यंत्रणा विकसीत केली जात आहे. वैज्ञानिकांनी  DAGGER  नावाने प्रशिक्षण सुरु केले आहे. ACE, WING, IMP-8 आणि Geotai या उपग्रहांच्या माध्यमातून सूर्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे. नासाच्या टीमला याचे सर्व अपडेट दिले जात आहेत. यामुळे सौरवादळाचा धोका कधी येवू शकतो याचा अंदाज लावता येवू शकतो. यासह कोणत्या भागांना सौरवादळाचा अधिक धोका निर्णाम होवू शकतो यावर देखील संशोधन सुरु असून याचा देखील डेटा गोळा केला जात आहे. सौर वादळ पृथ्वीवर धडकल्यास बचावासाठी हातात  फक्त 25 मिनीट असतील असा इशारा NASA च्या टीमने दिला आहे. 

हेही वाचा :  हा कॅन्सर लक्षणं न दाखवता जन्मापासून शरीरात कणाकणाने वाढतो, मेंदू व हाडांत पसरण्याआधी दाखवतो फक्त हे एकच लक्षण

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …