ताज्या

पुणे: शिवनेरी किल्ल्यावर २०० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला; २५ जण रुग्णालयात दाखल | Pune Bees attack 200 tourists at Shivneri Fort 25 hospitalised- vsk 98

स्थानिक पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांना रुग्णालयात दाखल केलं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी गेलेल्या किमान २०० पर्यटकांना रविवारी दुपारी मधमाश्यांनी चावा घेतल्याची माहिती राज्याच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी २५ जणांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती आणि त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडियन …

Read More »

अमिताभ यांच्या ‘झुंड’ चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य | jhunds producer savita raj defended kapil sharma on controversy about the movie

अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेला कपिल शर्मा हा बऱ्याचवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतो. कपिल सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. पण यावेळी कपिलने त्याच्या शोमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील कलाकार किंवा त्यांच्या संपूर्ण टीमला आमंत्रन दिले नाही असा आरोप चाहत्यांनी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

“…तुम्हाला लाज वाटायला पाहिजे”; योगींचा उल्लेख करत प्रणिती शिंदेंची मोदी सरकावर टीका | Yogi And Maharaj belongs to Temples not Politics praniti shinde slams modi government over farmers law scsg 91

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर प्रणिती शिदेंचा टोला सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केलीय. शेतकऱ्यांसमोर भाषण देताना प्रणिती शिंदेंनी योगी आणि महाराज राजकारणात आल्यावर देशाचं वाटोळं होतं, असं म्हणत टीका केलीय. “उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकरी कायदे रद्द केले. …

Read More »

These Vehicle Pay More Fees on Renew Registration | ‘या’ वाहनांची नोंदणी आठ पटीने महागणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त शुल्क भरावे लागणार आहे. देशात १ एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे महागणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर२०२१ मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. यानुसार १ एप्रिल २०२२ पासून देशभरातील १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे आठ पटीने महाग होईल, असे नमूद केले …

Read More »

“मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच, पण भाजपाने…,” संजय राऊत स्पष्टच बोलले | Shivsena Sanjay Raut on PM Narendra Modi BJP sgy 87

सत्ताधारी आणि विरोधक महाभारत आहे कौरव-पांडवांचं अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात, संजय राऊतांची टीका राज्याचे, देशाचे आणि लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी दोन्ही बाजूंनी काम होणं लोकशाहीत महत्वाचं असतं. पण दुर्दैवाने गेल्या सात, आठ वर्षात हे चित्र पहायला मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू आहेत, पराकोटीचं वैर आहे, महाभारत आहे कौरव-पांडवांचं अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात. हे चित्र देशाच्या …

Read More »

“…तर २०२४ मध्ये भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”; शिवसेनेनं सांगितलं भाजपाच्या विजयाचं सूत्र | Shivsena Slams BJP Over Win in 4 state elections scsg 91

असदुद्दीन ओवेसी, मायावती, लालू प्रसाद यादव, बाबा राम रहिम यांचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधलाय. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. पंजाबमधील आपची सत्ता वगळता उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुललं आहे. भाजपाच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय. पाच राज्यांमधील निवडणुकीमधील भाजपाच्या विजयावर भाष्य …

Read More »

“बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी राजकारणात आलेलो नाही”; विरोधकांच्या टीकेवरुन इम्रान खान संतापले| Didnt join politics to check prices of aloo tamatar says Pakistan PM Imran Khan- vsk 98

आपल्या उर्वरित कार्यकाळात पाकिस्तान एक महान देश बनणार आहे, असंही इम्रान खान म्हणाले आहेत. बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही, असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. संसदेत आपल्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडल्याबद्दल आणि त्याच्यावर अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याचा आरोप केल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. “मी बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी राजकारणात सामील …

Read More »

“मुंबईला दाऊदपासून कोणी वाचवलं?”, सांगतायत मोदी आणि व्यासपीठावर शरद पवार; अमोल मिटकरींनी शेअर केला जुना व्हिडीओ | amol mitkari shared video of prime minister narendra modi praising sharad pawar- vsk 98

“महाराष्ट्रात शरद पवार हेच दाऊदचा माणूस,” असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला होता. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची अटक आणि त्याचा कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिमशी जोडला जाणारा संबंध यामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार हेच दाऊदचा माणूस …

Read More »

Ukraine War: “…तर रशियाची क्षेपणास्त्रं ‘नेटो’च्या सदस्य देशांवरही पडतील”; युक्रेननं दिला इशारा | Ukraine President Volodymyr Zelenskyy urges Ukraine no fly zone or Russian rockets will fall on NATO soil scsg 91

पोलंडच्या सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या याव्होरिव्ह येथे रविवारी क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर युक्रेननं दिला इशारा पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जखमी झाले. पोलंड ‘नेटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने या तळावर हल्ला केला. …

Read More »

विश्लेषण : विद्यापीठ कायद्यातील दुरुस्त्यांचे भवितव्य काय? कुलगुरू निवडी लांबणार का?

– उमाकांत देशपांडे  राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षामुळे विद्यापीठ कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. यातील कळीचा मुद्दा काय, दुरुस्तीतील तरतुदी व परिणाम काय, याचा आढावा.  विद्यापीठ कायद्यातील दुरुस्त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता न दिल्याने त्यांचे भवितव्य व परिणाम काय?   कुलगुरू नियुक्तीच्या राज्यपाल व कुलपतींच्या अधिकारांवर बंधने आणणारे आणि अन्यही महत्त्वपूर्ण बदल करणारे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये दुरुस्ती …

Read More »

विश्लेषण : सक्तवसुली संचालनालयाची कारवाई भाजपविरोधकांविरुद्धच होते का? | ED is being used to suppress BJP opponents History and Facts print exp 0322 scsg 91

केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हाही या यंत्रणेचा विरोधकांविरुद्ध वापर केला गेला होता. मात्र आता ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, त्यामुळे फक्त भाजपविरोधकांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. – निशांत सरवणकर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सक्तवसुली संचालनालयाची कारवाई वाढू लागली आहे. फक्त भाजपविरोधकांविरुद्धच कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रात काँग्रेसचे …

Read More »

four warkaris killed 19 injured after truck hits tractor trolley zws 70 | पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या ट्रक्टरला ट्रकची धडक; चार ठार, १९ जखमी

या अपघातातील मृत व जखमी असे सर्वजण वारकरी सांप्रदायातील असून तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील राहणारे आहेत. सोलापूर : एकादशीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुळजापूरहून निघालेल्या भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीला पाठीमागून मालमोटारीची जोरात धडक बसून घडलेल्या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले. यापैकी सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूरजवळ कोंडी येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातातील …

Read More »

devendra fadnavis reaction after police recored statement in phone taping zws 70 | आरोपांची धुळवड सुरूच ; गैरव्यवहार बाहेर काढल्यानेच चौकशी : फडणवीस

‘पोलिसांनी पूर्वी पाठविलेली प्रश्नावली वेगळी होती आणि आजच्या चौकशीत मीच गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघन केले गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरध्वनी टॅपिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रविवारी पुन्हा आरोपांची धुळवड रंगली़  राज्य सरकारचे गैरव्यवहार बाहेर काढल्यानेच चौकशी करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला़  मात्र, कायद्यापुढे सर्व समान असताना हा तमाशा …

Read More »

shiv sena mp sanjay raut none above law over devendra fadnavis statement zws 70 | ‘कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?’

नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपवर राजकीय भांडवल करत असल्याची टीका केली. मुंबई : काही लोक आणि काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का, असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिल़े  दुसरीकडे, फडणवीस यांच्याकडून माहिती घेण्यात पोलिसांनी काहीही चुकीचे केलेले नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे …

Read More »

vishwas utagi lodge complaint with mumbai police commissioner over mumbai bank scam zws 70 | मुंबै बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याकडे दुर्लक्ष

सहकार आयुक्तांनी २२ पत्रे मुंबईच्या विभागीय सहनिबंधकांना पाठवली होती. तरीही तत्कालीन सहनिबंधकांनी हे आदेश दडपून ठेवले. मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनेक घोटाळय़ांच्या नवनवीन मालिका उघडकीस येत असतानाच अशाच एका घोटाळय़ानंतर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले होते. त्यावर सहकार आयुक्तांनी २२ पत्रे मुंबईच्या विभागीय सहनिबंधकांना पाठवली होती. तरीही तत्कालीन सहनिबंधकांनी हे आदेश दडपून ठेवले. बँकेवर …

Read More »

country should follow example of bmc for environmental conservation cm uddhav thackeray zws 70 | पर्यावरण संवर्धनाबद्दल मुंबई पालिकेचे अनुकरण देशाने करावे- मुख्यमंत्री

मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई वातावरण कृती आराखडय़ाच्या लोकार्पण प्रसंगी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून ठाकरे बोलत होते मुंबई: वातावरणीय बदलामुळे सर्वासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आणि कडक उन्हाळा याबरोबरच दरडी कोसळण्यासारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर नरिमन पॉइंटचा ८० टक्के भाग, शहरातील अन्य चार ठिकाणचा ७० टक्के भूभाग पाण्याखाली जाण्याचा इशारा देण्यात आल्याच्या …

Read More »

delivery boys requires police clearance certificate mumbai police chief zws 70 | ‘डिलिव्हरी बॉइज’साठी चारित्र्य पडताळणी आवश्यक

यर, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी शनिवारी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बैठक घेतली होती. मुंबई: कुरियर, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉइजची (बटवडा कर्मचारी) नियुक्ती करताना त्यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल असणे आवश्यक आहे. चारित्र्य पडताळणी न केलेला ‘डिलिव्हरी बॉय’ एखाद्या गुन्ह्यांत सहभागी आढळल्यास कंपनीलाही जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी शनिवारी दिल्या. कुरियर, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी शनिवारी …

Read More »

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : कसोटीवर पकड मजबूत

दुसऱ्या दिवशी ६ बाद ८६ वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांतच आटोपला. भारताच्या पंत, श्रेयस यांची अर्धशतके; श्रीलंकेपुढे ४४७ धावांचे आव्हान बंगळूरु : भारताच्या ऋषभ पंतला जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक का मानले जाते, याचा रविवारी पुन्हा प्रत्यय आला. एम. चिन्नास्वामीच्या अवघड खेळपट्टीवर पंतने (३१ चेंडूंत ५० धावा) फटकेबाज अर्धशतक झळकावले. तसेच श्रेयस अय्यरने (८७ चेंडूंत ६७) …

Read More »

bjp national general secretary ct ravi slams shiv sena over hindutva stance zws 70 | शिवसेनेने हिंदूत्व सोडले,

महाविकास आघाडीचे सरकार करोना उपाययोजनांसह सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले असून प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. उमाकांत देशपांडे, लोकसत्ता मुंबई : शिवसेनेने हिंदूत्व सोडले, आता भगवा ध्वजाचाही विसर पडेल व हिरवा झेंडा हाती घेतला जाईल, असे टीकास्त्र भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी   लोकसत्ता  ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सोडले. राज्यात भाजप आता युतीचे राजकारण करणार नसून स्वबळावर सत्ता …

Read More »

villagers become aggressive, over water issue zws 70 | पाणी द्या नाहीतर मानवी हक्क आयोगाकडे जाणार

सतत चार दिवस गावात पाणी आलेले नाही. त्यामुळे गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे. हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग- अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामस्थांना सध्या भिषण पाणी समस्येला तोंड द्यवे लागत आहे. आठ दिवस गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरु आहे. अर्ज विनंत्या करून जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग दाद देत नसल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. पाणी द्य …

Read More »