क्रिकेट

 भारताविरोधातील सामन्यात सहा महिन्याच्या मुलीला कडेवर घेत मैदानात उतरली पाकिस्तानची कर्णधार

Bismah Maroof return in Cricket: कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आई झाल्यानंतर मैदानावर परतणे सहजासहजी शक्य नाही. पण वेळेनुसार बदलत अनेक महिला क्रिकेटपटू आई झाल्यानंतर कठोर मेहनत करत मैदानावर परतल्या आहेत. फक्त परतल्या नाहीत तर चॅम्पियन होऊन दाखवले आहे. सध्या पाकिस्तान संघाच्या महिला कर्णधाराचे विशेष कौतुक होत आहे. कारण, सहा महिन्याच्या चिमुकलीला घेऊन पाकिस्तानची कर्णधार मैदानावर उतरली होती. हा फोटो सोशल मीडियावर …

Read More »

Ashwin Test Record : अश्विनने मोडला कपिल देवचा विक्रम, ठरला भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज

Ashwin Test Record : रविचंद्रन अश्निनने (R Ashwin) माजी क्रिकेटपटू कपिल देवचा (Kapil Dev) रिकॉर्ड मोडला आहे. अश्विनने 435 विकेट घेत कपिल देवचा 434 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आर अश्विनने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 435 विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत त्याने कपिल देवला (Kapil Dev) मागे टाकले आहे. श्रीलंकन खेळाडू चरिथ …

Read More »

रविंद्र जाडेजाच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद

IND vs SL Test Match, Day 3 : सध्या मोहाली येथ भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून मोहाली कसोटीत श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 174 धावांत ऑलआऊट झाला. त्या आधी भारताने पहिला डाव 574 धावांवर घोषित केला होता. आता त्यांनी श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन दिला आहे. टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने शानदार गोलंदाजी करत पाच …

Read More »

अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी, भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज होण्याच्या जवळ

IND vs SL Test : रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) पहिल्या कसोटीत एक खास विक्रम नावावर केला. भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी अश्विनने पथुम निसांकाची विकेट घेत कसोटीत आपल्या 434 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यामुळे अश्विनने आता माजी दिगग्ज क्रिकेटपटू कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सध्या हे दोन्ही गोलंदाज कसोटीत प्रत्येकी 434 विकेट घेणारे भारताचे दुसरे यशस्वी गोलंदाज …

Read More »

श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांवर गुंडाळला, जडेजाने घेतल्या पाच विकेट

IND vs SL Test Match, Day 3 : मोहालीत भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. कारण, श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 174 धावांवर आटोपला आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने 41 धावात 5 बळी घेतले आहेत. त्यामुळे भारताकडे या पहिल्या …

Read More »

IND vs PAK Women World Cup : भारतीय महिला संघाचं पाकिस्तानला 245 धावांचं आव्हान

 IND vs PAK Women World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला 245 धावांचं आव्हान दिलं आहे. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 (Womens world cup 2022) स्पर्धेत भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात आज दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता भारत आणि पाकिस्तान …

Read More »

IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारताची खराब सुरुवात

IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत आणि पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना) कोणत्याही खेळात समोरासमोर आले तरी संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडेच असतात. विशेषत: जेव्हा सामना विश्वचषकातील असतो, तेव्हा त्याची उत्कंठा शिगेला असते. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येणार असून यावेळी दोन्ही देशांच्या महिला एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 (Womens …

Read More »

भारतीय महिला पाकिस्तानविरुद्ध करणार वर्ल्डकपचा शुभारंभ, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs PAK : जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी संघ म्हणजे भारत-पाकिस्तान (India vs Pakistan). या दोन्ही संघाचा सामना त्यांच्या देशवासियांसाठीच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतासाठी पर्वणी असतो. दरम्यान भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येणार असून यावेळी दोन्ही देशांच्या महिला एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 (Womens world cup 2022) स्पर्धेत भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार …

Read More »

AFC U-23 Asian Cup : कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय संघात, आशियाई स्पर्धेत मैदानात उतरणार

Aniket Jadhav : मागील काही वर्षात भारतात फुटबॉल खेळाला ‘अच्छे दिन’ येत आहेत. इंडियन सुपर लीग सारखी मोठी स्पर्धा भारतात खेळवली जात आहे. आता अंडर 19 आशियाई कप संघात भारत खेळणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आघाडीचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याचं भारतीय फुटबॉल संघात (Indian Football Team) सिलेक्शन झालं आहे. अनिकेतच्या या सिलेक्शननंतर अनेकांनी त्याला ट्वीट करत शुभेच्छा …

Read More »

रिद्धिमान साहाने धमकी देणाऱ्या पत्रकाराच्या नावाबद्दल BCCI कडे केला खुलासा, म्हणाला…

Wriddhiman Saha : भारतीय क्रिकेटपटू रिद्धिमान साहा  (Wriddhiman Saha) याला एका पत्रकारकडून धमकी मिळाल्याचं प्रकरण मागील काही दिवसांपासून चांगलच चर्चेत आहे. साहाच्या मते पत्रकाराची सर्व माहिती त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिली आहे. दरम्यान साहाने बीसीसीआयसोबत चर्चा केली असून संबधित पत्रकाराच्या नावाचा खुलासा करायचा की नाही? यावरही चर्चा झाली. दरम्यान अजूनतरी बीसीसीआयने याबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही. पण संबधित पत्रकाराचं …

Read More »

कुस्तीपटू सुशील कुमार जेलमध्ये देणार कुस्तीचे धडे, तिहार जेल प्रशासनाची माहिती

Sushil Kumar : प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) ज्याने एकदा नाही तर दोन वेळेस ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं. तो सध्या कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. दरम्यान आता जेलमध्ये राहून तो जेलमधील इतर आरोपींना कुस्तीचे आणि व्यायामाचे धडे देणार आहे. तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली असून जेलमध्ये कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यामुळे आता हा उपक्रम …

Read More »

आधी जाडेजाची धमाकेदार फलंदाजी, मग फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी,भारताकडे दिवसअखेर 466 धावांची आघाडी

IND vs SL, Day 2 Stumps: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीत येथे पहिला कसोटी सामना पार पडत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड दिसत आहे. पहिल्या दिवशी दिवसभर फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही भारताने बराच काळ फलंदाजी केली. ज्यानंतर अखेर 574 धावांवर डाव घोषीत केला. त्यानंतर गोलंदाजीमध्येही पटपट विकेट मिळवत दुसरा दिवस संपताना भारताकडे 466 धावांची …

Read More »

महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांच्या निधनानं जगभरात हळहळ,वाळुशिल्प साकारत वाहिली अनोखी श्रद्धांजली

सिंधुदुर्ग : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू ज्याच्या फिरकीनं अवघ्या क्रिकेट विश्वाला वेड लावलं होत त्या शेन वॉर्न(Shane Warne) यांचं गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी शेन यांचे अचानक झालेले निधन सर्वच क्रिकेट जगताला चटका लावणारे आहे. ऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगात शेन यांचे लाखो चाहते होते. भारतातही शेन वॉर्नचे अनेक चाहते होते. दरम्यान त्यामुळे भारतातही अनेकांनी वॉर्न …

Read More »

VIDEO : विराटची शंभरावी कसोटी टीम इंडियाकडून आणखी खास, गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मान

मोहाली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी मोहालीमध्ये सुरु असलेला कसोटी सामना खास आहे. हा विराटच्या कसोटी कारकीर्दीतील शंभरावा सामना आहे. ही मॅच आणखी खास बनवण्यासाठी टीम इंडियाने खास पद्धत अवलंबली. पहिला डाव घोषित केल्यानंतर जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला तेव्हा विराट कोहलीला संघाच्या सदस्यांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. भारतीय संघाने मोहाली कसोटीत आपला पहिला डाव 574 …

Read More »

IND vs SL : मोहाली कसोटीत रिषभ पंतच्या नावावर खास रेकॉर्ड, रोहित शर्माला मागे टाकलं

<p style="text-align: justify;"><strong>IND vs SL : मोहाली :</strong> भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डाव 574 धावांवर घोषित केला. टीम इंडियाच्या या डावात रविंद्र जाडेजा आणि रिषभ पंत यांचं मोलाचं योगदान होतं. जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला तर पंतने 96 धावांची खेळली रचली. रिषभ पंतने या …

Read More »

रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा ‘हा’ विक्रम मोडला

IND vs SL, 1st Test, Mohali : मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. हा दुसरा दिवस गाजवला तो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने. रविंद्र जडेजाने 175 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला आहे. दरम्यान, या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नावावर एक नवा विक्रम …

Read More »

भारताचा लंकेसमोर धावांचा डोंगर; 574 धावांवर पहिला डाव घोषीत, जडेजाची दमदार खेळी

IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारताने दमदार कामगिरी करत आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला. यामध्ये रविंद्र जडेजाने दमदार खेळी केली आहे. जडेजा 175 धावांवर नाबाद राहिला आहे. तर मोहम्मद शमी 20 धावांवर नाबाद राहिला आहे. 8 विकेटच्या मोबदल्यात भारताने श्रीलंकपुढे 574 धावंचा डोंगर …

Read More »

रविंद्र जडेजाचं शानदार शतक, श्रीलंकेविरुद्ध भारत मजबूत स्थितीत

<p>IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने दमदार खेळी करत शतक पूर्ण केले आहे. सध्या भारताच्या 7 विकेटच्या मोबदल्यात 465 धावा झाल्या आहेत. जडेजा 100 धावांवर खेळत असून त्याच्याबरोबर जयंत यादव खेळत आहे.</p> <p>भारत आणि श्रीलंकेदरम्यान कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी …

Read More »

चेंडू वळवणारा सर्वात मोठा कलाकार गमावला, विराट कोहलीकडून शेन वॉर्नला आदरांजली

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपट्टू शेन वॉर्नचे (Shane Warne) काल वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने शेन वॉर्नचे निधन झाले. शेन वॉर्नचे निधन हा ऑस्ट्रेलियासह सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी धक्का मानला जात आहे. त्याच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. भारतीय खेळाडूंनी देखील शेन वॉर्नच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आयुष्य हे खूप अनपेक्षित असते. आपल्या …

Read More »

शेन वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ पाहिलाय का? कोणताही गोलंदाज करू शकला नाही अशी गोलंदाजी

Shane Warne Ball of the Century : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी आज निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेन वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 708 बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. परंतु, त्याची ओळख एवढीच नाही, तर वॉर्न आपल्या गोलंदाजीने चांगल्या-चांगल्या फलंदाजांना चकमा देत असे. एकदा त्याने असा चेंडू …

Read More »