अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर हे आरोप केले होते. या सर्व आरोपांमुळे सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी बिग बॉस १६ कार्यक्रमातून साजिद खानला बाहेर काढण्याची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर ‘एव्हिक्ट साजिद खान’ (#EvictSajidKhan) आणि रिमूव्ह साजिद खान (#RemoveSajidKhan) ट्रेंड झालं आहे. सोशल मीडियावर त्याच्या विरोधातील याचिकेवर स्वाक्षरी घेण्यााची मोहीमही सुरू झाली आहे.
हे वाचा-प्रवीण तरडेंच्या फेसबुकवरुन पाठवले जातायंत भलतेच मेसेज; नेमकं काय घडलं?
अभिनेत्रीनं बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय
अभिनेत्री मंदना करीमी हिनं साजिद खान याला बिग बॉस १६ कार्यक्रमात घेण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात तिनं लिहिलं आहे की, ‘मी बॉलिवूड सोडत आहे. सध्या बॉलिवूमध्ये मी काम करत नाही. ज्या जागेवर महिलांचा सन्मान केला जात नाही, अशा ठिकाणी मी राहूच शकत नाही.’ त्यानंतर मंदना हिनं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे.
हे वाचा-बिग बॉसच्या शूटिंगवेळी ‘गॅलेक्सी’त नव्हे इथे राहतो सलमान; महालापेक्षा कमी नाहीये घर
शहनाज गिल ही देखील झाली ट्रोल
एकीकडे साजिदला घराबाहेर काढण्याची माागणी होत असताना, बिग बॉस फेम शहनाज गिल हिनं काही दिवसांपूर्वी साजिद खान याला समर्थन देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. शहनाजनं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, त्यानं कार्यक्रमात खूप मजा मस्ती करायला हवी. फक्त भांडू नये. परंतु चाहत्यांना, अनेक नेटकऱ्यांना मात्र तिचं असं हे बोलणं खटकलं. त्यामुळे अनेकांनी शहनाजच्या विरोधात कॉमेन्ट करत तिला ट्रोल केलं आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या