Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price in Maharashtra : भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो.  आज पुन्हा एकदा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज, 28 जून रोजी पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ब्रेंट क्रूड तेलाची प्रति बॅरल किंमत $74.31 आहे. त्याच वेळी, WTI कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत $ 69.37 वर पोहोचली आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोलची (maharashtra petrol diesel price) विक्री सरासरी 106.88 रुपयांनी होत आहे. तर डिझेल  93.47 रुपयांनी विकले जाणार आहे. गेल्या महिन्यात 31 मे 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती सरासरी 106.88 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. 

हेही वाचा :  Nepal Plane Crash : नवस फेडून परतताना फेसबुक लाईव्ह सुरु केलं आणि... विमान अपघातात 'त्या' भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू

वाचा : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून 10 टक्के पाणीकपात

राज्यातील प्रमुख शहरातील दर…

मुंबईमध्ये पेट्रोल 106.49 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24  रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.04  तर डिझेल 92.59  रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर
परभणी पेट्रोल 108.79 तर डिझेल 95.21 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोल105.77 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर 

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोलचे नवीन दर

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करतात. मात्र तुम्ही घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर चेक करु शकता. यासाठी ग्राहकांना त्यांच्या फोनवरून 92249 92249 वर RSP <space> पेट्रोल पंप डीलरचा कोड टाईप करून एसएमएस पाठवावा लागेल, त्यानंतर त्यांना अपडेट केलेले दर कळू शकतील. पण तुम्ही दिल्लीत राहत असाल तर तेलाचे नवीनतम दर जाणून घेण्यासाठी तुम्ही RSP 102072 वर 92249 92249 वर एसएमएस करू शकता. 

हेही वाचा :  साम्ययोग : स्त्रीशक्ती आणि गीता



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …