बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला!

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ने (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर आपली जबरदस्त कमाई सुरूच ठेवली आहे. 11 दिवस जोरदार कमाई करणारा हा चित्रपट 12व्या दिवशी काहीसा मंदावला आहे. बाराव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घसरण झाली आहे, असे असूनही चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 200 कोटींपासून काही पावलेच दूर आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे 12व्या दिवसाचे कलेक्शन शेअर केले आहे.

त्यांनी लिहिले की, ‘#TheKashmirFiles चित्रपट अजूनही धडाकेबाज कामगिरी करत आहे,  चित्रपट आठवड्याच्या दिवसातही चांगली कमाई करत आहे… उद्या चित्रपट 200 कोटींचा आकडा पार करेल. शुक्रवारी 19.15 कोटी, शनिवारी 24.80 कोटी, रविवारी 26.20 कोटी, सोमवारी 12.40 कोटी, मंगळवारी 10.25 कोटी, एकूण 190.10 कोटी.’

 


‘बच्चन पांडे’वर पडला भारी! 

तरण आदर्शचा हा अंदाज कितपत खरा ठरतो, हे लवकरच कळेल. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात म्हणजे सात दिवसांत 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता दुसऱ्या आठवड्यातही त्याचा दबदबा कायम आहे. या चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’लाही मागे टाकले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ने कमाईच्या बाबतीत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. 

हेही वाचा :  'डेट भेट' मध्ये सोनाली, संतोष अन् हेमंतची प्रमुख भूमिका;

कमी बजेटमध्ये जोरदार कमाई!

कमी बजेट चित्रपट आणि कमी स्क्रीन असूनही ‘द कश्मीर फाइल्स’ने चांगली ओपनिंग केली होती. 3.55 कोटींपासून सुरू झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवसापासून दुहेरी अंकात कमाई करणे सुरूच ठेवले आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी स्टारर या चित्रपटाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता आता त्याच्या स्क्रीन्सचा आकडा 4000 वर पोहोचला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …