भाऊ कदमची मुलगी मृण्मयीच्या अदा अभिनेत्रींवरही करतायत मात

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम असो अथवा चित्रपट असो भाऊ कदमने आपल्या अभिनयाने आणि साधेपणाने सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे. मात्र भाऊ कदम यांची मोठी मुलगी मृण्मयी कदमदेखील आता चर्चेत येऊ लागली आहे. लहान वयात काढलेला ब्रँड आणि त्यातही तिची फॅशन आणि स्टाईल यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

मृण्मयी कदमचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. तिची स्टाईल ही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. पारंपरिक कपड्यांपासून ते अगदी मॉडर्न लुकपर्यंत मृण्मयी अत्यंत सुंदररित्या फॅशन कॅरी करताना दिसून येतेय. पाहा मृण्मयीचे लुक्स (फोटो सौजन्य – @manu_kadam_ Instagram)

चिकनकारी सलवार कमीज

चिकनकारी सलवार कमीज

लाल रंगाचा सलवार सूट मृण्मयीने घातला असून यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. यासह तिने ऑक्सिडाईज्ड मोठे कानातले मॅच केले असून कपाळावर लहानशी टिकली लावत अगदी Girl Next Door लुक केलाय. तर ड्रेसला मॅचिंग अशा लाल बांगड्याही घातल्या आहेत. कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही अशी स्टाईल कॅरी करू शकता.

हेही वाचा :  Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला

व्हाईट क्रॉप टॉप आणि जीन्स

व्हाईट क्रॉप टॉप आणि जीन्स

कम्फर्टेबल आणि अत्यंत सोपी अशी स्टाईल कोणती असेल तर टॉप आणि जीन्स. मृण्मयीने घातलेला व्हाईट क्रॉप टॉप आणि जीन्स मॉडर्न लुकसाठी परफेक्ट आहे. बाहेर मित्रमैत्रिणींसह जाताना अशी स्टाईल कधीही कॅरी करता येते.

(वाचा – मलायकाने ब्लॅक बॅकलेस गाऊनमध्ये तापवलं इंटरनेटचं वातावरण, ४८ व्या वर्षीही तरूणीना लाजवेल असा ग्लो)

साडीतील पारंपरिकता

साडीतील पारंपरिकता

रॉयल ब्लू साडी आणि त्यावर लाल ब्लाऊज असा पारंपरिक लुक मॉडर्न हेअरस्टाईलसह मृण्मयी अत्यंत सुंदर दिसत आहे. बारीक निऱ्यांचा पदर काढून त्यासह लाल लिपस्टिक आणि बेसिक मेकअप करत तिने हा लुक केला आहे. कोणत्याही सणाला वा लग्नाला समारंभाला असा लुक करू शकता.

(वाचा – ‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ )

पैठणी साडीचा ड्रेस

पैठणी साडीचा ड्रेस

पैठणी साडीचा ड्रेस आजकाल अधिक ट्रेंडमध्ये आहे. सणासाठी वेगळा लुक हवा असेल तर अशी स्टाईल नक्कीच आकर्षक ठरते. मल्टीकलर पैठणी साडीचा हा ड्रेस मृण्मयीने स्टाईल केला आहे. त्यासह मोठे सिल्व्हर कानातले आणि मोकेळ केस सोडून केलेली स्टाईल अतिशय सुंदर दिसत आहे.

हेही वाचा :  शारीरिक संबंधांसाठी सहमतीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होणार? मुंबई हायकोर्टने मांडली स्पष्ट भूमिका

(वाचा – ग्लॅमरस ड्रेसवर पायात पैंजण, अनुष्काच्या फॅशनवर इंप्रेस झालेत चाहते)

पेस्टल लेहंगा

पेस्टल लेहंगा

पेस्टल रंगही सध्या ट्रेंडमध्ये आहेत. साधेपणा आणि सुंदरतेचे आधुनिक समीकरण म्हणजे मृण्मयी असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कदाचित यामुळेच तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यासह केवळ कानातले आणि बेसिक मेकअप असा लुक तिने केला आहे.

व्हाईट टॉप आणि ब्लॅक लेदर स्कर्ट

व्हाईट टॉप आणि ब्लॅक लेदर स्कर्ट

व्हाईट टॉप आणि त्यासह ब्लॅक लेदर स्कर्ट असा केलेला मृण्मयीचा लुक खूपच सटल आहे. मॉडर्न आणि तरीही आपलासा वाटणारा हा लुक तुम्हीही कोणत्याही पार्टीसाठीही करू शकता. यासह अधिक काही करायची गरजही भासणार नाही. सध्या लेदर स्कर्ट ट्रेंडमध्ये असून ही स्टाईल उत्तम वाटते.
मृण्मयीची ही स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता. साधेपणात सौंदर्य आहे हेच तिच्या स्टाईलमधून दिसून येतंय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …