Bhagavadgita in Textbook: सहावी, सातवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद भगवद्गीतेचा समावेश

Srimad Bhagavadgita in School Textbook: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) पाठ्यपुस्तकांमध्ये आता श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करण्यात आला आहे. सहावी आणि सातवीतील पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद भगवद्गीतेचा संदर्भ आणि इयत्ता अकरावी आणि बारावीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकांमध्ये त्यातील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे.शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देताना याबद्दल माहिती दिली.

केंद्रीय शिक्षण विभागाने भारतीय ज्ञानाच्या सर्व पैलूंवर आंतरविषय आणि ट्रान्स-डिसिप्लिनरी संशोधनाला चालना देण्यासाठी २०२० मध्ये ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) मध्ये इंडियन नॉलेज सिस्टम्स (IKS) विभागाची स्थापना केली. आंतरविद्याशाखीय आणि आंतर-विषय संशोधनाला चालना देण्याच्या आणि संशोधन आणि सामाजिक अनुप्रयोगांसाठी IKS ज्ञान जतन आणि प्रसारित करण्याच्या यामागे उद्देश होता.

NEP: सात वर्षांत पदवी पूर्ण करण्याचे बंधन, यूजीसीकडून सुधारित श्रेयांक आराखडा आणि अभ्यासक्रम जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी सुरुवात केली आहे. तळागाळातील विविध उपक्रम मंत्रालय, विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह विविध भागधारकांकडून सूचना मागविण्यात आल्याचे अन्नपूर्णा देवी म्हणाल्या.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ४.२७ पॅराग्राफमध्ये टिकाऊ आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतातील पारंपारिक ज्ञानाचा संदर्भ असल्याचे त्या म्हणाल्या. या शतकात ज्ञान शक्ती बनण्यासाठी, आपण आपला वारसा समजून घेतला पाहिजे आणि जगाला ‘भारतीय गोष्टी करण्याची पद्धत’ शिकवली पाहिजे, असे शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या.

हेही वाचा :  करोनाकाळात ८,७७४ शाळांनी केली शुल्कमाफी

बीए, बीएससी, बीकॉमची पुस्तके मराठीतून; यूजीसीची पुस्तक प्रकाशकांसोबत बैठक
मराठीतून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होतोय फायदा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …