Breaking News
  • Bank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद
  • ED ऑफिसर बनायचं आहे? किती पगार असतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
  • VISA म्हणजे काय आणि किती प्रकारचा असतो? अर्ज कसा करावा, जाणून घ्या
  • अचानक बेत बदललाय, Railway Ticket रद्द करताय? थांबा… वाचा फायद्याची बातमी
  • Home Loan चा EMI संपल्यानंतर या 5 बाबी लक्षात ठेवा, नाहीतर याल अडचणीत

BARC Recruitment 2022: भाभा अणू संशोधन केंद्रात नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

BARC Recruitment 2022: वैद्यकीय/विज्ञान शाखेत शिक्षण झालेल्या आणि मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई (Bhabha Atomic Research Centre) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (BARC Mumbai Job 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये मेडिकल/सायन्टिफिक ऑफिसरच्या २५ आणि टेक्निकल ऑफिसरच्या एकूण ३५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मेडिकल/सायन्टिफिक ऑफिसरअंतर्गत न्यूक्लिअर मेडिसिन, जनरल मेडिसिन, ईएनटी सर्जन, रेडिओलॉजी, हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन, पेड्रेशियन,वेटरनरी सर्जन, जनरल ड्युटी/कॅज्युल्टी मेडीकल ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विभागात एमडी/एमएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. उमेदवाराला संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.

टेक्निकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विभागात बीएससी आणि एमएससीमध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणे आवश्यक आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये ग्रंथपाल ते प्राचार्यपर्यंत विविध पदांची भरती
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा ५६ हजार १०० ते ७८ हजार ८०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

३० सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज
MahaGenco Job: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत बंपर भरती, मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous पुण्यात मिसळ खाल्ल्यानंतर मला…अक्षय कुमारनं सांगितल्या जुन्या आठवणी
Next रोहित शर्मा फलंदाजीमध्ये सतत अपयशी का ठरतोय, जाणून घ्या हे सर्वात मोठं कारण…

Check Also

शाळांतील ग्रंथालये नावापुरतीच, शिक्षण विभागाच्या तपासणीत धक्कादायक खुलासा

म. टा. प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील २० टक्के माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालये कार्यान्वित असून, ८० …

Metro Recruitment: मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, ही घ्या अर्जाची थेट लिंक

Maha Metro Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड …