BAFTA Award 2023 : बाफ्टा’ पुरस्कार सोहळ्यात ‘ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट’चा बोलबाला

BAFTA Award 2023 : ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठा ‘बाफ्टा पुरस्कार’ (BAFTA Award 2023) सोहळा नुकताच पार पडला आहे. बाफ्टा पुरस्कार सोहळ्यांचं यंदाचं 76 वर्ष होतं. लंडनमधील साऊथबॅंक येथील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्टिन बटलर (Austin Butler) आणि अभिनेत्रीचा केट ब्लैंचेटला (Cate Blanchett) मिळाला आहे. तर ‘ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न’ (All Quiet On The Western Front) या जर्मन सिनेमाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.

ड्यूक आणि डचेसच्या कमाल सादरीकरणाने ‘बाफ्टा पुरस्कार’ सोहळ्याची सुरुवात झाली. अॅरियाना डेबोस, अॅडी रेडमायने, जेमी ली कर्टिस, डेरिल मॅककॉमैक, प्रिन्स विल्यम, केट मिडलटन, मिशेल येओह, अॅंजल बॅसेट, पॅट्रिक स्टीवर्ट, एम्मा थॉम्पसन, जेसिका हेनविक आणि फॅशल डिझायनकर वेरा वांगसह अनेक मान्यवरांच्या उपस्थित यंदाचा ‘बाफ्टा पुरस्कार सोहळा’ पार पडला. 

एरियाना डेबोस, एडी रेडमायन, जेमी ली कर्टिस आणि डॅरिल मॅककॉर्मॅक यांच्यासह अनेक नामांकित व्यक्ती, प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन ते मिशेल येओह यांच्यानंतर सादरकर्ते होते. एंजल बॅसेट, पॅट्रिक स्टीवर्ट, एम्मा थॉम्पसन, जेसिका हेनविक आणि फॅशन डिझायनर वेरा वांग देखील रेड कार्पेटवर दिसले.

‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या…

सर्वोत्कृष्ट सिनेमा : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट (All Quiet On The Western Front)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : केट ब्लैंचेट (टार) (Cate Blanchett)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ऑस्टिन बटलर (एल्विस) (Austin Butler)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : एडवर्ड बर्ज (ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : केरी कॉन्डन (द बंशीज ऑफ इनिशरिन) (Kerry Condon)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : बैरी केघन (द बंशीज ऑफ इनिशरिन) (Barry Keoghan)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफी : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट (All Quiet On The Western Front)
सर्वोत्कृष्ट पटकथा : एडवर्ड बर्जर, लेस्ली पैटर्सन, इयान स्टोकेल (ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग : पॉल रोजर्स (एवरिथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स) (Everything Everywhere All At Once)
सर्वोत्कृष्ट माहितीपट : नवलनी (डैनियल रोहर) (Navalny)
सर्वोत्कृष्ट लघुपट : एक आयरिश अलविदा (An Irish Goodbye)

हेही वाचा :  'The Legend Of Maula Jat' पाकिस्तानी सिनेमा भारतात प्रदर्शित होणार?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Entertainment News Live Updates 20 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …