Bad News! 2 एप्रिलपासून बंद होणार गुगलचे हे अॅप; लगेचच ट्रान्सफर करा डेटा

Google Podcast: गुगलचे एक दोन नव्हे तर अनेक प्रोडक्ट आहेत. यातीलच एक सेवा बंद होणार आहे. कंपनीने अलीकडेच या संदर्भात माहिती दिली आहे. गुगल पॉडकॉस्टही नवीन सेवा कंपनीने अलीकडेच सुरु केली होती. मात्र, ही सेवा सुरू होण्याच्या आधीच बंद होणार आहे. पॉडकास्ट हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि गुगलसाठी आधीपासूनच लोकप्रिय आहे. त्यामुळंच गुगलला असं वाटतं की त्यासाठी वेगळ्या अॅपची गरज नाहीये. त्यामुळं गुगल पॉडकास्ट अॅप सेवा 2 एप्रिलपासून बंद केली जाणार आहे. 

मात्र, कंपनी पूर्णपणे पॉडकास्ट बंद करणार नाहीये. तर युट्यूब म्युझिक पॉडकास्टसाठी लोकप्रिय प्लेटफॉर्म असणार आहे. कारण कंपनी दोन अॅपच्या ऐवजी एकाच अॅपमध्ये इतर सर्व सुविधा समाविष्ट करु शकतात. गुगलने पॉडकास्ट जून 2018 रोजी लाँच केले होते. गुगलने म्हटलं आहे की, ज्या युजर्सने गुगल पॉडकास्टसाठी सब्सक्रप्शन घेतलं आहे. त्यांचे सबस्क्रिप्शन YouTube Music म्युझिकवर मुव्ह करण्यात आले आहे. पॉडकास्ट बंद होत असल्याची माहिती युजर्सना ई-मेलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 

गुगलने पॉडकास्टचे फिचर्सना हळूहळू युट्यूब म्युझिकसोबत इंटिग्रेट करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत युट्युब म्युझिक आणि पॉडकास्ट एकाच अॅपवर दिसत आहेत. अन्य देशातही लवकरच जारी केले जाणार आहे. जगभरात 50 कोटीपेक्षा अधिक जणांनी गुगल पॉडकास्ट डाउनलोड केले आहे. एका रिपोर्टनुसार, पॉडकास्ट अॅपच्या तुलनेत युट्यूब म्युझिकच वापरण्यास पसंत करतात. गुगल युट्यूब म्युझिकमध्ये पॉडकास्टचे फिचरदेखील अॅड करत आहेत. ज्यात RSS फीडदेखील आहे. 

हेही वाचा :  WhatsApp वर Good Morning मेसेज पाठवताय? सावध व्हा, नाहीतर अकाऊंटच Block होईल

दरम्यान, मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये गुगलने जीमेलच्या 10 वर्ष जुने फिचर बंद करण्याची घोषणा केली होती. गुगलने जीमेलचे बेसिक HTML व्ह्यूला जानेवारी 2024पासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. Gmail चा बेसिक HTML व्ह्यू युजर्सला ई-मेल वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. 

या मोडमध्ये सर्च, इमेजेस, नकाशे यासारखे गूगलचे ॲप्स जीमेल पेजवरच सपोर्ट करतात. HTML मोड स्लो इंटरनेट कनेक्शन आणि जुन्या ब्राउझरसाठी डिझाइन केले होते. या मोडमध्ये Gmail छोट्या मजकुरात दिसते. हा खूप जुना मोड आहे जो आता वापरला जात नाही.

गुगल पॉडकास्टचा डाटा आणि सब्सक्रिप्शन असा करा ट्रान्सफर

– सगळ्यात पहिले आपल्या पॉडकास्ट अॅप सुरू करा

– आता मेन्यूवर जाऊन एक्सपोर्ट सब्सक्रिप्शनच्या पर्यायावर क्लिक करा

– येथे तुम्हाला एक्सपोर्ट युट्युब म्युझिक हा पर्याय निवडा

– आता इथे तुम्हाला एक्सपोर्ट पर्याय निवडा

– त्यानंतर Continueच्या पर्यायावर क्लिक करा

– त्यानंतर तुमचे सब्सक्रिप्शन युट्यूब म्युझिक अॅपवर ट्रान्सफर होईल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …