Samsung चा जबरदस्त Holi Sale; एक-दोन नव्हे, तर तब्बल 60 टक्के कमी किमतीत करा मनसोक्त खरेदी

Samsung Holi Sale: नवा फोन खरेदी करायच्या विचारात आहात? सॅमसंगचे डिवाईस चांगला पर्याय आहेत असा सल्ला तुम्हाला अनेकदा देण्यात आला असेल. दमदार कॅमेरा, फिचर्स या आणि अशा अनेक गोष्टींनी मोबाईल वापरण्याचा अनुभव अद्वितीय करणाऱ्या याच सॅमसंगचे टीव्ही, लॅपटॉप आणि इतर electric, Home Appliances सुद्धा कायमच अनेकांच्या घरात , मनात जागा मिळवताना दिसते. 

 बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार सातत्यानं उपकरणांमध्येही नवे आणि महत्त्वपूर्ण बदल करणाऱ्या याच सॅमसंगचे प्रोडक्ट आता तुम्ही किमान किमतीत आणि मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. निमित्त ठरणार आहे ते म्हणजे सॅमसंगचा Holi Sale. ज्यामध्ये तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावरून मनसोक्त खरेदी करू शकता. 

किती टक्के आणि कोणत्या Product वर मिळतेय सवलत? 

सॅमसंगच्या या सेलमध्ये गॅलेक्सी स्मार्टफोन 60 टक्के सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर, इतर काही डिवाईसवर 48 टक्के सवलत दिली जात आहे. या सवलतीमध्ये तुम्ही सॅमसंगच्या प्रिमियम आणि लाईफस्टाईल प्रोडक्टचीही खरेदी करू शकता. 15 मार्च 2015 पासून हा सेल सुरु होत असून, यामध्ये स्मार्टफोनपासून टॅबलेट, लॅपटॉप, टीव्हीची खरेदी करू शकता. सॅमसंगची दुकानं, Samsung.com आणि कंपनीमार्फत अधिकार देण्यात आलेल्या स्टोअरमध्ये ही सवलत सुरु आहे. 26 मार्चपर्यंत या सवलतीतून तुम्ही खरेदी करू शकता. 

हेही वाचा :  Iphone चाहत्यांसाठी खुशखबर; Apple कडून सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच

सॅमसंगच्या Galaxy Book या लॅपटॉपवर कंपनीकडून 45 टक्क्यांची सवलत मिळत आहे. तर, Galaxy Book 4 Pro, Galaxy Book 4 Pro 360 सह Galaxy Book 4 360 वरही कमाल ऑफर दिल्या जात आहेत. टॅबलेटही सवलतीसह 55 टक्के कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतात. सॅमसंग वॉच घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी कंपनीनं Samsung Galaxy Watch 6 आणि Galaxy Fit 3 असे पर्याय 55 टक्के सवलतीसह उपलब्ध करून दिले आहेत. तर, Samsung TV च्या किमती 48 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. 

नवा फोन कमी किमतीत खरेदी करण्यासाठी सज्ज आहात ना? 

Samsung कडून स्मार्टफोनवर तब्बल 60 टक्के सवलत असल्यामुळं अनेकांचाच कल मोबाईल खरेदीकडे दिसू शकतो. कंपनीकडून लेटेस्ट मॉडेल Galaxy S24 वरही मोठी सूट मिळणार असून, याआधीच्या फ्लॅगशिप डिवाईसही तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. कुतूहलाचा विषय ठरणारे फ्लिप अँड फोल्ड असे फोनही या सवलतीत खरेदी करण्याची संधी सॅमसंगकडून देण्यात आली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …