इंग्लंड-पाकिस्तान मुल्तान कसोटीपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज सामन्याला मुकण

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुल्तान येथे 9 ते 13 डिसेंबर असा खेळवला जाणार आहे. पण या सामन्या पूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे. रावळपिंडी कसोटीत क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. दरम्यान यामुळे दुसऱ्या कसोटीला रौफची अनुपस्थिती हा पाकिस्तान संघासाठी मोठा धक्का आहे. कारण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे कसोटी मालिकेचा भाग नाही, त्यात हॅरिसही सामन्याला मुकणार असल्याने मोठा तोटा पाकिस्तान संघाला होऊ शकतो.

क्षेत्ररक्षण करताना रौफ दुखापतग्रस्त

इंग्लंडच्या पहिल्या डावात हॅरिस रौफला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. 29 वर्षीय वेगवान गोलंदाज रौफला एमआरआय स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर तो मैदानावर परतला नाही. पहिल्या डावात त्याने फलंदाजी केली पण दुसऱ्या डावात गोलंदाजी करायला तो आला नाही. त्याने सामन्याच्या पहिल्या दिवशी 13 षटकात 78 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज म्हणून कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इतक्या धावा देणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला, आता दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे.

हेही वाचा :  Pakistan Crisis : इम्रान खान यांना मोठा दिलासा; अटक बेकायदा, तात्काळ सुटका करण्याचे आदेश

पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभूत

News Reels

रावळपिंडी स्टेडियममध्ये (Rawalpindi Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. पण अखेरीस ओली रॉबिन्स आणि अँडरसनच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. हा सामना इंग्लंडच्या संघानं 74 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 342 धावांची गरज होती. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 268 धावांवर ढेपाळला. महत्वाचं म्हणजे, इंग्लंडच्या संघानं तब्बल 22 वर्षानंतर पाकिस्तानला त्यांच्या मायदेशात कसोटी सामन्यात नमवलं. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात साऊद शकलीनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 159 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तर, इमाम उल हकनं 48 धावांचं योगदान दिलं. याशिवायस, सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि अजहर अलीनं क्रमश:48 आणि 40 धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघाला 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. 

 हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …