”मला स्वत:वर विश्वास होता…”, सलामीच्या रणजी सामन्यात शतक ठोकल्यावर अर्जुन तेंडुलकर म्हणाला.

Arjun Tendulkar : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने रणजी स्पर्धेच्या डेब्यू मॅचमध्येच शतक झळकावल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्याने वडिलांप्रमाणे फर्स्ट क्लास क्रिकेटची दमदार सुरुवात केली आहे. कारण सचिन तेंडुलकरनेही 11 डिसेंबर 1988 रोजी गुजरातविरुद्धच्या प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होते. अर्जुनने गोव्याकडून राजस्थानविरुद्ध खेळताना 207 चेंडूत 120 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या शतकानंतर आपली प्रतिक्रिया देताना अर्जुनने सांगितले की, ‘मला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे.’

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणाला, “मला नेहमीच माझ्या क्षमतेवर विश्वास होता आणि मला माहित होते की जर मी सेट झालो तर मी मोठी धावसंख्या करू शकेन. मला फक्त पहिला तास नाटी खेळायचं होता आणि नंतर त्याचा फायदा घ्यायचा होता. जेव्हा मी खेळायला गेलो तेव्हा मी बहुतेक चेंडूंचा सामना केला कारण सुयश 80 धावांवर खेळत होता आणि माझे काम त्याला साथ देणं होतं. पुढे बोलताना अर्जून म्हणाला, “पहिला तास महत्त्वाचा असतो. कारण नवीन चेंडूने सकाळी गोलंदाजाला काही फायदा देतो. सुरुवातीचा टप्पा झाल्यानंतर फलंदाज चांगली कामगिरी करु शकतात. 

हेही वाचा :  मनिका बत्रानं इतिहास रचला; आशियाई कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकलं

अर्जुनने गोव्याकडून खेळताना पहिल्या डावात शतक झळकावले. सातव्या क्रमांकावर येऊन त्याने हे शतक केले होते. याच डावात संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सुयश प्रभुदेसाईने द्विशतक झळकावले. त्याने 416 चेंडूंत 29 चौकारांच्या मदतीने 212 धावांची खेळी केली. अर्जुन तेंडुलकर गोव्यासाठी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम सुमिरन आमोणकर यांनी केला होता. 

एमसीएकडून NOC नंतर अर्जूनचं पदार्पण

News Reels

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) अर्जुन तेंडुलकरला राज्य बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिन विपुल फडके यांनी माहिती देताना सांगितले की,, अर्जुन तेंडुलकरला आगामी हंगामात गोव्याकडून खेळायचे होते. त्यासाठी त्यांने संपर्क साधला. आम्ही यावर उत्तर देत आधी एमसीएकडून एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र द्या ज्यानंतर आम्ही तुमचे कौशल्य आणि फिटनेस तपासू, अशी माहिती फडके यांनी दिली. ज्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यावर अखेर अर्जूननं गोवा संघात पदार्पण केलं.  

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …