Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…”


रशियाने युक्रेनविरुद्धचं युद्ध घोषित करुन एकाच वेळी २५ हून अधिक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रकार संपूर्ण जगाने गुरुवारी पाहिला. आज दुसऱ्या दिवशीही रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर हल्ले केले जात असतानाच दुसरीकडे रशियाची राजधानी असणाऱ्या मॉस्कोमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये भारताविरोधात कुरापती केल्यात.

गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे काल रशियात पोहचले. मात्र तोपर्यंत युक्रेनविरोधात रशियाने युद्ध पुकारलं होतं. कालच इम्रान खान हे पुतिन यांना भेटले. या भेटीदरम्यान पाकिस्तान रशियासोबत ‘दिर्घकालीन आणि बहुआयामी’ संबंधांसाठी वचनबद्ध असल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं. मात्र त्यावेळी त्यांनी काश्मीर मुद्दा थेट रशियन राष्ट्राध्यक्षांसमोर उपस्थित केला. काश्मीर समस्येचं शांततापूर्ण निराकरण करण्याची आवश्यकता आहे, असं इम्रान यांनी पुतिन यांना भेटीदरम्यान सांगितलं.

बुधवारपासून इम्रान खान हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. मागील दोन दशकांमध्ये कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानाने रशियाचा दौरा केलेला नाही. पुतिन आणि इम्रान खान यांच्यादरम्यान तीन ते चार तास बैठक सुरु होती. या बैठकीच्या काही तास आधीच रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली होती. त्यामुळेच अमेरिकेबरोबरच ब्रिटन आणि अन्य युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यामुळेच या परिस्थितीची या बैठकीत चर्चा झाली. या आर्थिक निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सरकारने या बैठकीनंतर जारी केलेल्या पत्रकामध्ये या बैठकीतील महत्वाच्या मुद्द्यामध्ये काश्मीरबरोबरच दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासंदर्भातील विषयांचा समावेश होता. तसेच पाकिस्तानने युक्रेनमधील संघर्षासंदर्भात खेदही व्यक्त केलाय.

हेही वाचा :  नवरीचे कपडे शिवणारे हात आता करतायत सैनिकांंना ‘ही’ मदत, युक्रेनियन फॅशन ब्रँड म्हणतो, “सर्वांनी सोबत…”

“दक्षिण आशियामधील परिस्थितीबद्दल भाष्य करताना पंतप्रधानांनी काश्मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच जम्मू आणि काश्मीर प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण अत्यावश्यक असल्याचं अधोरेखित केलं,” असं पाकिस्तानी सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

यापूर्वीच भारतामधील रशियन दुतावासाने मॉस्को काश्मीर प्रश्नासंदर्भात केवळ लाहोर आणि शिमला कराराचं पालन करणार आहे हे स्पष्ट केलंय. काही आठवड्यांपूर्वीच रशियाने ही भूमिका स्पष्ट केलीय. या करारानुसार काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्वीपक्षीय मुद्दा आहे. असं असतानाही इम्रान खान यांनी मुद्दाम युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर मुद्दा या बैठकीत उपस्थित करुन नेहमीप्रमाणे निराशाच पदरात पाडून घेतलीय.

इम्रान खान यांनी पुतिन यांना आपण अंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचे ब्रॅण्ड अॅबेसिडर होण्यास तयार असल्याचंही सांगितलंय. “पंतप्रधानांनी प्रांतामधील शांतता आणि स्थैर्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचं सांगतानाच या भागामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी निर्णय घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय,” असा उल्लेख पाकिस्तानने जारी केलेल्या पत्रकात आहे.

एकीकडे पाकिस्तानने काश्मीर प्रश्न उपस्थित केल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे रशियाने मात्र या भेटीसंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये काश्मीरचा साधा उल्लेखही केला नाहीय. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये संबंध सुदृढ करण्याबद्दल चर्चा झाली इतकाच उल्लेख रशियाने जारी केलेल्या पत्रकात आहे.

हेही वाचा :  विश्लेषण : रशियापासून ‘स्फूर्ती’ घेऊन कोणते देश बनू शकतात आक्रमक?

The post Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…” appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …